पं. विनोद डिग्रजकर यांच्या सुश्राव्य गायनाने विष्णु दिगंबर संगीत महोत्सवाचे उद्घाटन
भारतीय संगीतामध्ये विष्णु दिगंबर पलुस्करांचे बहुमोल योगदान – उस्ताद उस्मान खाँ
कोल्हापूर – कुरुंदवाड – अवघे आयुष्य समर्पित पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर यांनी भारतीय संगीत क्षेत्रामध्ये अतुलनीय कामगीरी बजावली आहे. राजाश्रयाच्या आधारे तग धरुन असणाऱ्या संगीत कलेला त्यांनी लोकाश्रय मिळवून दिला. तसेच संगीत कलाकारांना प्रतिष्ठा आणि मान सन्मान मिळवून दिला. स्त्रियांसाठी सुद्धा गायन कला सादर करण्यासाठी त्यांनी व्यासपीठ मिळवून दिले. प्रखर राष्ट्राभिमानी असलेले पंडित विष्णु दिगंबर यांनी स्वातंत्र्यापूर्वी राष्ट्रीय कॉंग्रेसची अनेक संमेलने गाजवली. वंदे मोातरम आणि रघुपती राघव राजाराम यासारख्या गीतांना त्यांनी अजरामर चाली लावल्या. त्यांच्या जन्मगावी कुरुंदवाड येथे पहिल्यांदाच त्यांच्या या भव्य कार्याची दखल घेतली जात असून या संगीत महोत्सवाद्वारे त्यांचे कार्य कुरुंदवाड, सांगली, कोल्हापूर, बेळगांव, मिरज या परिसरामध्ये एक नवीन संगीत जागर निर्माण करेल असा विश्वास जगप्रसिद्ध सतार वादक उत्साद उस्मांन खॉं यांनी या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला. यावेळी मंचावर पंडित विष्णु दिगंबर यांचे नातू वसंराव पलुस्कर, संस्कार भारतीचे शाहीर हेमंतराजे मावळे, विश्व मराठी परिषदेचे प्रा. क्षितिज पाटुकले, शिक्षण प्रसारक मंडळ चे चेअरमन शरद पडाळकर, डॉ. डी. पी. कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आणि पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या १५० व्या जयंतीवर्षानिमित्त विश्व मराठी परिषदेने ७ आणि ८ मे, २०२२ दरम्यान पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत महोत्सवाचे आयोजन त्यांच्या जन्मगावी कुरूंदवाड येथे शिक्षण प्रसारक मंडळाच्या सैनिकी शाळेच्या परिसरामध्ये केले आहे, त्याचा उद्घाटन सोहळा आज सैनिकी शाळेच्या मुख्य सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. महोत्सवाची सुरुवात पं. विनोद डिग्रजकर यांच्या बहारदार गायनाने झाली. त्याला रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर पं. संजय गरुड, डॉ. रेवा नातू, विदूशी मंगलाताई जोशी यांनी आपली सेवा सादर केली. पहिल्या दिवसाचा समारोप उत्साद उस्मान खॉं यांच्या सतारवादनाने झाली. उद्या रविवार ८ मे या महोत्सवाचा अखेरचा दिवस आहे.
Posted inकोल्हापूर
पं. विनोद डिग्रजकर यांच्या सुश्राव्य गायनाने विष्णु दिगंबर संगीत महोत्सवाचे उद्घाटन
भारतीय संगीतामध्ये विष्णु दिगंबर पलुस्करांचे बहुमोल योगदान – उस्ताद उस्मान खाँ
