रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) गटाच्या राधानगरी तालुका उपाध्यक्ष पदी नाथाजी कांबळे यांची निवड..
गुडाळ/ वार्ताहर
पुंगाव तालुका राधानगरी येथील ग्रामपंचायत पुंगाव गावचे माजी सदस्य व पुंगाव विकास सोसायटी पुंगाव या संस्थेचे विद्यमान संचालक नाताजी बंडोपंत कांबळे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( गवई) गटाच्या राधानगरी तालुक्याच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीचे पत्र जिल्ह्याध्यक्ष पांडुरंग कांबळे कुरुकली कर जिल्हा सरचिटणीस भीमराव कांबळे सरवडे कर यांच्या हस्ते देण्यात आले..
नाथाजी कांबळे यांनी राधानगरी तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात, व चळवळीमध्ये चांगले योगदान, आहे आणि दीनदलित समाजासाठी नावलौकिक अशी कामगिरी केली आहे .त्यांच्या या कामाची पोचपावती म्हणून त्यांची बिनविरोध निवड आहे…
यावेळी तुकाराम कांबळे, पी एस कांबळे ,भाऊसो काळे, एम आर कांबळे, अशोक पनोरी कर ,सिद्धार्थ देशमुख ,आर एस कांबळे, प्रकाश कांबळे( शिरसेकर) सातापा कांबळे (कागल) अशोक घाडगे, भिकाजी कांबळे, रंगराव कांबळे (नांदगावकर) अशोक कांबळे कुरुकली )आधी मान्यवर उपस्थित होते
फोटो मेल केला आहे
Posted inकोल्हापूर
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) गटाच्या राधानगरी तालुका उपाध्यक्ष पदी नाथाजी कांबळे यांची निवड..
