जे अन्याय विरोधात लढतात त्यांची एक बिरादरी करून त्यांना बळ देण्यासाठी व कौतुक करण्यासाठीच संघर्षनायक पुरस्कार – डॉ . कुमार सप्तर्षी

जे अन्याय विरोधात लढतात त्यांची एक बिरादरी करून त्यांना बळ देण्यासाठी व कौतुक करण्यासाठीच संघर्षनायक पुरस्कार – डॉ . कुमार सप्तर्षी

संघर्षनायक राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न

पूणे प्रतिनिधी : संदीप शेंडगे

जनसंघर्ष क्रांती मोर्चा, संघर्षनायक मीडिया व समाजभूषण हरिचंद्र कांबळे स्मृती प्रतिष्ठान यांचा एक आगळावेगळा कार्यक्रम आहे ठिकठिकाणच्या तळागाळातल्या लोकांसाठी दुःख मुक्ती करता त्यांची वेदना कमी करण्याकरता जे जे अन्यायाविरोधात लढतात त्यांची एक बिरादरी करून त्यांना बळ देण्यासाठी व त्यांचे कौतुक करण्यासाठीच संघर्षनायक पुरस्कार दिले जातात हे त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ . कुमार सप्तर्षी यांनी केले
जनसंघर्ष क्रांती मोर्चा ,संघर्षनायक मीडिया व समाजभूषण हरिचंद्र कांबळे स्मृती प्रतिष्ठान यांच्या वतीने संघर्षनायक राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2022 वितरण सोहळ्यात डॉ . सप्तर्षी बोलत होते .अध्यक्षस्थानी जनसंघर्ष क्रांती मोर्चाचे संस्थापक फिरोज मुल्ला सर होते . संघर्षनायक मीडिया चे मुख्य संपादक संतोष आठवले, अन्याय अत्याचार विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष दादासाहेब यादव ,कर्मवीर दादासाहेब गायकवाड शेतकरी शेतमजूर संघर्ष समितीचे अध्यक्ष जीवन भालेराव, खान एज्युकेशन फाऊंडेशनच्या अध्यक्षा गौसिया खान आदी विचारपिठावर उपस्थित होते.


डॉ .सप्तर्षी पुढे म्हणाले, जगात जेवढे धर्म आहेत तेवढे धर्म आपल्या देशात आहेत प्रत्येक धर्मात कोणी कोणाला त्रास देऊ नये असे सांगितले आहे त्यामुळे आपल्या धर्मावर अन्याय होत असेल तर त्याचा विरोध केलाच पाहिजे त्या सोबत दुसऱ्याच्या धर्मासाठी लढले पाहिजे . प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवून रस्त्यावर येताना एक भारतीय म्हणून आले पाहिजे असे सांगून पुढे म्हणाले या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्या देशात सातशे राजे होते त्यांचे कायदे वरच्या जातीसाठी आणि खालच्या जातीसाठी असे वेगळे होते मात्र ज्यावेळी ब्रिटीशांना देशा बाहेर काढण्यासाठी एकत्र येण्याचे ठरले त्यावेळी यात बदल करण्याचा निर्णय झाला एक राष्ट्रभक्त म्हणून सर्वांनी एकत्र लढा दिला त्यामुळे आपण सर्वजण एक भारतीय म्हणून जगले पाहिजे .जाती ही जन्माने आणि अपघाताने आलेली आहे ती सोडली पाहिजे . अन्याय विरोधात लढताना आपल्याला सविधान कायदे नियम याची माहिती हवी तरच आपण विरोधात चांगले लढू शकतो सध्या देशात जातीमध्ये फूट पडून सत्ता राखण्याचे काम केले जात आहे .
सत्यशोधक विचारवंत प्रा .डॉ . शरद गायकवाड व पँथर आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष चेतनभाई इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले.
संघर्षनायक राष्ट्रीय गौरव पूरस्कार संतुलन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड . बी एम रेगे व संचालिका अॅड .पल्लवीताई रेगे, प्रा .डॉ . शरद गायकवाड , ज्येष्ठ साहित्यिक बाळासाहेब भडकवाड सोलापूर ,पॅथर आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष चेतनभाई इंगळे, नारीशक्ती सेवा फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा सुमय्या अली (अकोला ) ,डॉ . हसीना शाह ( अमरावती ) ,आदिवासी फासेपारधी संघटनेच्या सुनिता एकनाथ भोसले (शिरूर ),अविनाश कांबळे((पुणे उद्योजक,संस्थापक अध्यक्ष सुखाई प्रतिष्ठान) यांना देऊन सन्मानित करण्यात आले तर मनिष खर्चे पत्रकार ( अकोला )राजेंद्र आण्णा मोहीते ( इचलकरंजी ), रमेशकुमार मिठारे ( पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी बसवा टीव्ही मराठी ) , शाहीर चरण जाधव (औरंगाबाद ) ,राहुल श्रीकांत कांबळे (मुंबई ),जयपाल नामदेव कांबळे (कोल्हापूर ) ,रमेश कांबळे अध्यक्ष माणुसकी फाउंडेशन (अकिवाट ), अनिता सावळे ( पुणे ) ,मल्लिकार्जुन मुलगे (दौंड ), हालिमा शेख (पुणे संस्थापक अध्यक्षा सयंप्रेरणा विकास संस्था),दिपक पंचमुख (पुणे संस्थापक अध्यक्ष प्रबुद्ध फाउंडेशन) संभाजीराव कांबळे पत्रकार दै पूण्य नगरी ( गुढाळ राधानगरी ) डॉ . आयुब विजापूरे ( इचलकरंजी ) यांना संघर्षनायक गौरव पूरस्काराने सन्मानित करण्यात आले .पूरस्कर्त्याना सन्मान चिन्ह व मानपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला . यावेळी रमेश राक्षे ,भिमराव कांबळे(पुणेशहर अध्यक्षASP)रहीमभाई सय्यद (पि.चि.शहर अध्यक्षASP) स्वाती गायकवाड ( पूणे जिल्हा कार्यध्यक्षASP)अर्चनाताई केदारी (महिला अध्यक्षा पुणे शहर ASP)चांदभाई बलबट्टी (जेष्ठ नेते)आदिच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन समीर विजापूरे, तोपिक किल्लेदार ,संदीप शेंडगे, कुणाल सोनवणे ,साधू फुलमाळी . वॉल्टर सलढाणा, आकाश दंडगूळे, अश्रफ खान . बेनी जोसेफ आदींनी केले होते आभार दादासाहेब यादव यांनी मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *