सांगली
निवारा हक्क आंदोलन पूर्वतयारीसाठी रविवार दिनांक 15 मे रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत सांगलीत निवारा भवन येथे महत्त्वपूर्ण “घर जमीन हक्क” अभ्यास शिबिर आयोजित करण्यात आले आहे
गावठाण, गायरान, शासकीय पड जमीन, वन जमीन, इनाम वतनी जमीन, घरासाठी आरक्षित जमीन याबाबत घर जमीन मिळवून घेण्यासाठी या शिबिरास जमिनी विषयक अभ्यासक कॉ सतीश जोशी पुणे आणि मिरज येथील बिल्डर श्री विनायक गोखले गुंठेवारी चे अभ्यासक श्री चंदन चव्हाण व नागरी हक्क अभियानाचे नेते श्री विनायक बर्वे हे मार्गदर्शन करणार आहेत
तरी या मेळाव्यास नागरी हक्क विषयक जागृत नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कॉ शंकर पुजारी ,जनरल सेक्रेटरी
महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन Aituc
प्रा शरयू बडवे ,सरचिटणीस निवारा बांधकाम कामगार संघटना Aitucकॉ विशाल बडवे ,सचिव निवारा बांधकाम कामगार संघटना Aituc यांनी केले आहे