कोल्हापूर : बुद्ध गार्डन येथे अभिवादन करताना अॅड. धनंजय पठाडे, माजी पोलिस उपअधीक्षक आर आर पाटील,अमोल कुरणे आदी.
परिवर्तन तर्फे बुद्ध जयंती उत्साहात साजरी
कोल्हापूर, दि.१६ (प्रतिनिधी) परिवर्तन फौंडेशन व सर्वधर्मिय समभाव समिती तर्फे कोल्हापूर महानगरपालिकेच्या बुद्ध गार्डन मधिल बुद्धमुर्तीस अॅड.धनंजय पठाडे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले.
यावेळी माजी पोलीस उपअधीक्षक आर आर पाटील, ॲड.राहुल सडोलीकर, परिवर्तनचे अध्यक्ष अमोल कुरणे,सर्वधर्मीय समभाव समितीचे कार्याध्यक्ष फिरोज सतारमेकर,लोकजनशक्ती पार्टीचे बाळासाहेब भोसले,तकदीर कांबळे, राज कुरणे,अॅड.सरदार किरवेकर, बाळासाहेब साळवी आदी उपस्थित होते.