हिंदुत्वाच्या घरी तुच्छता पाणी भरी (एक कारण शोध)

हिंदुत्वाच्या घरी तुच्छता पाणी भरी (एक कारण शोध)

हिंदुत्वाच्या घरी तुच्छता पाणी भरी

(एक कारण शोध)

छुपा अपमान करण्याची वृत्ती जगभर आढळते छुपा अपमान करणे म्हणजे व्यक्तीच्या अपरोक्ष पाठीमागे बदनामी करणे अपशब्द वापरणे पाठीमागे निंदा करणे आणि छुपा अपमान हे दोन्ही एकच आहेत अपमान म्हणजे व्यक्तीची नालस्ती करणे होय अपमान करणे हे प्रकार समक्ष अपरोक्ष हे समाजजीवनात सतत आढळून येतात आधुनिक व सभ्य न झालेल्या मानवी विकाराचे हे सार्वत्रिक दोष आहेत व्यक्तीची प्रतिष्ठा समजावून न घेता व्यक्तीच् कर्तुत्व माहीत करून न घेता त्या व्यक्तीबद्दल पूर्वग्रह गैरसमज हे सतत स्वतः सोबत बाळगून केवळ येक लेल्या. माहितीच्या आधारे त्या व्यक्तीच्या बदनामीचे सतत षड्यंत्र आणि कुटिल कारस्थान प्रत्येक ठिकाणी कमी-अधिक स्वरूपात चालू असतात बदनामी अपमान निंदा नालस्ती चारित्र्याबद्दल ची कुजबुज हे भारतीय समाजात मोठ्या प्रमाणात अवहेलना चे प्रकार नित्य चालूच असतात अवहेलना मनात का निर्माण होते ?छुपा अपमान करण्यासाठी मन का धजावत ? अपमान करण्यातून काय साध्य होते? अपमानामुळे त्या व्यक्तीचे समाज मनातील स्थान व कर्तुत्व कमी होते का? अपमान करणाऱ्या व्यक्तीचे त्यामुळे मोठेपण वाढते का? अपमानामुळे समाजजीवनातील निर्भेळ आनंद वाढतो की कटुता वाढते या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या अंतकरणात आत डोकावून ही उत्तरे मिळवली तर आपले वर्तन थोडे थोडे सुधारू शकते प्रस्तुत लेखन करता ही या सदोष तेला कारणीभूत असू शकतो तो ही आत्म चिकित्सा त्यासाठी करीत आहे
निंदानालस्ती याची कारणे कळू शकतील आणि अत्यंत सडलेल्या किडलेल्या मानसिकतेचे सामाजिक पर्यावरण आपल्यासभोवताली असल्याचे आढळून येते

व्यक्ती दुसऱ्याचा अपमान का करते? स्वयम् श्रेष्ठत्व लादण्यासाठी अपमानाचे शस्त्र उपसले जाते का? ‐ समोरच्या व्यक्तिचे श्रेष्ठ त्व मान्य करावयाचे असल्याने त्या व्यक्ति च्या कार्यात भाषेत विचारात उनिवा शोधल्या जातात मुळात काही त्रुटी दोष असतील तर समजून घेने व समजून सांगणे याचे व्यापक शहाणपण घर ते समाज या पातळीवर अध्याप इथे रुजलेले च नाही त्यामुळे चुका झाल्यास आगपाखड करणे हे चालू असते समजूतदारपणा दाखवून दोष हे व्यक्तीच्या वर्तनातून नाहीसे करता येतात ती व्यक्ती सुधारू शकते तिच्या वर्तनात बदल होऊ शकतो फक्त आवश्यक तेथे त्या व्यक्तीला मार्गदर्शनाची गरज आहे असे रास्त मार्गदर्शन केल्यास वर्तन परिवर्तन होऊ शकते हे वर्तन-परिवर्तन म्हणजेच व्यक्ती सुधारणे होय म्हणून व्यक्तीस आत्मसन्मान जपणे व्यक्तीचा सार्वजनिक ठिकाणी अपमान न करणे व्यक्तीला समजावून घेणे तिच्या चुकांचे उद्धव उदात्तीकरण न करणे सामान्य चुका स्वीकारणे हे वर्तन खूप समजूतदारपणा चे आणि निकोप वातावरणाच्या निर्मितीसाठी चे अत्यंत आवश्यक असते घर समाज व सार्वजनिक जीवन या सर्व ठिकाणी अशा समंजस वातावरणाची निर्मिती प्रत्येकाने करण्यासाठी सुसंवादी आदर शील वर्तन करण्याची गरज असते कोणतीही व्यक्ती आणि जात पूर्णता वाईट गुन्हेगार दोषी असत नाही दोष हे व्यक्तीसापेक्ष असतात दोषांच्या बद्दल पूर्व गैरसमज बाळगून कधीच मते बनवता कामा नयेत अमुक जात अमुक व्यक्ती अविश्वास असते अप्रामाणिक असते एकनिष्ठ असत नाही व्यक्तीच्या अंतकरणात खुलेपणा नसतो सारी चर्चा सतत होतच राहते यातूनच निरपेक्ष नात्यांचे वर्तुळ प्रत्येकाला तयार करता आले पाहिजे यासाठी छुपा अपमान आपण कोणाचाही करावयाचा नाही ते कठोर वर्तन करण्याची गरज असते सत्य वर्तन जोपासणे हेच निकोप असते
बदनामी निंदानालस्ती आपमान हे आपल्या भारतीय समाजात मध्ये जातिव्यवस्थेच्या मानसिकतेचे दूर वर झालेले विपरीत परिणाम आहेत वर्णव्यवस्थेचे जातिव्यवस्थेत रूपांतर होणे हा प्रवास दुःखद आहे एकच आहे आहे यामध्ये मानव्य नाकारून जगणार जगलेला समाज हा पीडित वंचित म्हणून आजही या मानसिकतेत न्यूनगंड ग्रस्त तेच वर्तन करीत आहे वर्णव्यवस्था लादून आबादित शोषण करणाऱ्या सवर्ण जाती आणि वर्ग यांचे प्रभूत्व हेच भारतीय समाजाचे विषय वास्तव आहे ही शोषणाची अदृश्य बेमालूम व्यवस्था तयार करण्यात आली आहे या व्यवस्थेला बहुसांस्कृतिक व बहु वंशवाद म्हटले जाते याचा अभिमानही बाळगला जातो हे सर्वात क्लेशकारक आहे व्यवस्थेतील उपेक्षा सहन करीत जगणारे स्त्री-पुरुष हे सोशिक तर आहेतच त्याहून ते व्यवस्था शरण आहेत ते स्वतःहून व्यवस्थेला अज्ञानातून श्रेष्ठ ही मानतात हे चूक नाही असेही बहुसंख्यकाचे मत आहे त्यामुळे वर्ण जाती व्यवस्थेतून खाली आलेली भाषा दृष्टी शब्द अवहेलना उपेक्षा नालस्ती येथे नित्य चालत आलेले याची कारणे व्यवस्था आहे असे स्वीकारणे या व्यवस्था शरण वादांमध्ये आहेत आपले अस्तित्व नगण्य मानणारा उच्चवर्णीय अपमान करतो आहे बदनामी करतो आहे तुच्छ लेखतो आहे व्यवस्थेच्या निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवतो आहे प्रतिनिधित्व नाकारतो आहे कर्तुत्व नाकारतो आहे ज्ञान आणि कौशल्य तुच्छ लेखतो आहे जातींच्या जगण्यातून त्यांनी निर्माण केलेली क्षमता आणि कौशल्य सामाजिकता सहयोग आणि सहकार्य ही मूल्य सुद्धा उच्चवर्णीयांना नको याचे कारण या मूल्यांच्या प्रसारातून आणि वर्तनातून निर्माण होणारा समाज सुसंवाद आणि एकात्मता वर्तन वाद हा उच्चवर्णीय यांचे प्रभुत्व नष्ट करतो आणि म्हणून तीन वर्णीय जाती यांच्यामधील सुसंवाद ऐक्य सामूहिक निर्णय प्रक्रिया आणि सामाजिक जीवनात निर्माण होत असलेला सद्भाव याचे दुःख उच्चवर्णीयांना होत असते या सद्भाव वर्तनातून उच्चवर्णीय जनजाती या दूर फेकल्या जातात त्यांच्या अस्तित्व आणि प्रभुत्व नाकारले जाते त्यामुळे उच्च जनजात तुकोबाच्या भाषेप्रमाणे जरी टिम्ब टिम्ब झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ यामध्ये टिंब टिंब याठिकाणी हवी ती जात हवा तो वर्ग आपण घेऊ शकतो आणि आत्मपरीक्षण प्रत्येकाला करता येऊ शकते सार्वजनिक व सांस्कृतिक जीवनात राजकीय जीवनात खालच्या जनजाती नचे प्रभुत्व हे वंशवादी सवर्णांना सहन होत नाही आणि त्यामुळे ते खालच्या जातींची निंदानालस्ती शब्दातून वर्णनातून खलनायिका त्व दाखवण्यात तून अपप्रचार आतून खोट्या कथानकातून ते करीत असतात यासच ब्राह्मणी श्रेष्ठत्व असेही म्हणता येते पण ब्राह्मणी श्रेष्ठत्व हे दृष्ट वर्तन सर्व जनजातींच्या मध्ये वाढू लागले आहे प्रत्येक जात ब्राह्मणी अनुकरणाच्या आधारे तशी वागू लागली आहे आहे आणि त्यातूनच समाज जीवनामध्ये छुपा अपमान
त्याचा करण्याची प्रक्रिया अवतीभवती पहावयास मिळते अपमान ची विकृती हे वंशवादी श्रेष्ठत्वाचे विकृत वर्तन आहे यासाठी सांस्कृतिक सभ्यता वाढवणे महत्त्वाचे आहे इतरांच्या प्रती आदर बाळगणे व अनुभव कार्य सामाजिक प्रतिष्ठा त्या व्यक्तीची समर्पण वृत्ती ही समाजाने मोठ्या आदराने खुल्या मनाने स्वीकारली पाहिजे कोणत्याही जनजातीच्या व्यक्तीच्या अंगी असलेल्या सद्गुणांची पूजा जो समाज करायचे अरूननाकारतो तो समाज पचनाला तात्काळ जात असतो भारतीय समाजात प्रत्येक वर्णन प्रत्येक वर्ग प्रत्येक जात एकमेकांच्या अवहेलना करण्यामध्ये धन्यता मानतात ही भारतीय समाजातील जातिव्यवस्थेची विकृत वर्तनाची सातत्याने पुढे चालत आलेली वाईट परिणाम बाब आहे म्हणून रंगावरून उंचीवरुन गरिबी वरून शुद्ध अशुद्ध भाषेवरून एकमेकाची निंदा करणे हे एकमेकाचे मानव्य नाकारणे आणि वांशिक श्रेष्ठत्वाच्या अहंकाराने पछाडलेल्या चे हे वर्तन आहे दृष्टीतून तुच्छता शब्दातून तुच्छता भाषेतून तुच्छता ही कधीही व्यक्त होता कामा नये तरच स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय समाज हा बंधुभावाच्या दिशेने चालू लागला आहे असे अनुमान काढता येते अन्यथा हा रानटी आदिम समाज तसाच आहे अजूनही श्वापदांच्या सारखे संघर्ष तू करीत चालला आहे असे मानावे लागते मान ही प्रतिष्ठा असते मान हा सद्गुणाचे मोठेपण असते कार्य गौरव हा समाज करत असतो त्यातूनच व्यक्तीची प्रतिष्ठा वाढत जाते व्यक्तीच्या प्रतिष्ठित सद्गुणांचा संच असतो समाजाच्या सर्व मान्यतेची ती मूक संमती असते म्हणूनच प्रतिष्ठा ही आंतरिक त्या व्यक्तीच्या कार्य ऊर्जेचे प्रेरणास्त्रोत ठरते त्या व्यक्तीची ओळख आणि प्रतिष्ठा ही सोबत एकत्रित असते त्यातूनच मान आणि आत्मसन्मान या वाढत जाणाऱ्या बाबी पुढे निश्चित होत राहतात म्हणून व्यक्ती जीवनात दुसऱ्याचा अपमान करणे नाही निंदेला थारा नाही भाषेला असभ्यता नाही दृष्टीला द्वेष नाही अशा प्रकारची सभ्य मानवी उदार वर्तनाची सम दृष्टी शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या अंगी वाढवली पाहिजे घराघरातून अशा प्रकारच्या वर्तनाचे आग्रह धरले पाहिजेत तरच मान आणि अपमान यामध्ये समाज फरक करू शकेल आणि व्यक्तीचे सार्वत्रिक सार्वभौम असेच श्रेष्ठ प्रतिष्ठा मूल्य असते ती मानवी जीवनाची थोर मूल्यात्मक जतन करावयाची नैतिक कृती असते असे भारतीय समाजाला सतत सार्वत्रिक प्रयत्नातून शिकवण्याची आचरणात आणून दाखवण्याची कृती करण्याची आज नितांत गरज आहे 2022 चे वर्ष द्वेष आणि वंश श्रेष्ठत्व या विकृतीने वेगाने पुढे निघालेले आहे या दोन्ही विकृती थांबवायचे असतील तर आत्मसन्मानाच्या भाषेशिवाय आणि स्वयम् वर्तनाच्या प्रयत्न शिवाय समाजही शिकले नाही असे वाटते म्हणून मानव तितुका एकचि आहे हे तरी सूत्र मानव जातीच्या निर्माण अशा वादासाठी अंतरी बाळगणे महत्त्वाचे ठरते

शिवाजी राऊत

प्रेस सातारा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *