सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा बांधकाम कामगारांच्या मागण्या मान्य झाल्याने स्थगित!

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा बांधकाम कामगारांच्या मागण्या मान्य झाल्याने स्थगित!

सोमवार दिनांक 23 रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा बांधकाम कामगारांच्या मागण्या मान्य झाल्याने स्थगित!
दरम्यान याच वेळेस सांगली निवारा भवन येथे मंजूर मागण्यांच्या बद्दल माहिती देण्यासाठी बांधकाम कामगारांचा 23 मे रोजी दुपारी अकरा वाजता निवारा भवन सांगली येथे भव्य मेळावा

महाराष्ट्राचे कामगार मंत्री मा. श्री हसन मुश्रीफ यांना बांधकाम कामगार फेडरेशनचे शिष्टमंडळ कागल येथे रविवारी 22 मे रोजी भेटले. त्यावेळेस निवेदनावर सविस्तरपणे कामगार मंत्र्यांनी चर्चा केली. मिरज येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणारी 240 घरकुले आहेत.त्यामध्ये ज्या 90 नोंदीत बांधकाम कामगारांनी फ्लॅट बुकिंग केलेले आहेत. त्यांना बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत दोन लाख रुपयाचे अनुदान देण्याचा प्रस्ताव सांगली सहायक कामगार आयुक्तांनी त्वरित पाठवावा असा आदेश निवेदनावर नमूद केले. तसेच बांधकाम कामगारांच्या मागण्या बाबत मुंबईमध्ये लवकरच बैठक होणार असून त्यामध्ये प्रमुख मागण्यांची चर्चा होईल असेही त्यांनी सांगितले. शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आलेला मागण्यांमध्ये मागणी क्रमांक एक महाराष्ट्रामध्ये कामगारांना सुरक्षा साधनांची पेटी देण्याची मुदत 31 डिसेंबर 2021 रोजी संपली आहे. 31 डिसेंबर नंतर सुरक्षा साधनांची पेटी देण्यासंदर्भात नवीन टेंडर काढण्याबाबत विचार करण्यात येईल. तसेच कामगार मंत्र्यांनी असेही स्पष्ट केले की, बांधकाम कामगार मुलीच्या विवाहासाठी 51 हजार रुपये देण्याची तरतूद दोन मुलींच्या पर्यंत वाढवण्यात यावी. बांधकाम कामगारांचा मृत्यू झाल्यास त्याला दोन लाख रुपये त्यांच्या वारसांना आर्थिक सहाय्य देण्यात यावे तसेच पूरग्रस्त भागातील बांधकाम कामगारांच्या घरकुलांची यादी त्वरित मंजूर करावेत. या सर्व मागण्यांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्‍वासन कामगार मंत्री महोदयांनी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशनचे शिष्टमंडळास देण्यात आले. शिष्टमंडळामध्ये कॉ शंकर पुजारी श्री सुहास साका, मिरज घरकुल प्रकल्पाचे प्रमुख श्री विनायक गोखले व श्री योगेश यांचा समावेश होता.
दरम्यान सांगलीमध्ये शनिवार दिनांक 21 मे रोजी सांगलीचे साहाय्यक कामगार आयुक्त श्री अनील गुरव यांच्याशी कॉम्रेड शंकर पुजारी यांच्यशी चर्चा होऊन पुढील बाबींची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेले आहे. सांगली जिल्ह्यातील मृत्यू पावलेल्या नोंदीत बांधकाम कामगारांच्या वारसांना त्यांचे अर्ज मंजूर करून सत्वर त्यांना लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागामध्ये घरकुलासाठी आर्थिक साहाय्य मिळण्यासाठी ज्या बांधकाम कामगारांनी मागणी केलेली आहे त्यांचे अर्जही( निवारा बांधकाम कामगार संघटनेचे अर्ज) मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे वरील चर्चेच्या आधारावर सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा रद्द करण्यात आलेला आहे. याबाबतची सविस्तर चर्चा समजून सांगण्यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांनी सोमवार दिनांक 23 मे रोजी सांगली निवारा भवन सभागृहामध्ये सकाळी 11 वाजता जमावे असे आवाहन करणारे पत्रक निवारा बांधकाम कामगार संघटनेचे सरचिटणीस प्रा शरयू बडवे व संघटनेचे सचिव कॉ विशाल बडवे यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *