आत्मस्तुती चा दोष व शुभेच्छा गुन्हा
घडण्याचे कारण !
विधायक संघर्ष ओळखणारा समाज.इथे अद्याप तयार झालेला नाही ज्या समाजाला फक्त ज्ञाती बांधव हाच खरा समाज वाटतो त्या समाजाला विचारधारा महत्व व बांधिलकीचे निष्ठा युक्त जगन कळण त्याहून ही अवघडच असते अश्या संमिश्र जाणीवांच्या समाजात सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून आप आपल्या क्षेत्रात निरपेक्ष भावनेने कामे करणारी अनेक व्यक्तिमत्वे कार्यरत असणे हे समाजाचे फार मोठे संचित असते सर्व कालखंडात हे आढळून येते सद्गुणांची जाणीव म्हणून मध्यमवर्गाला अशा कार्यकर्ते व्यक्तिमत्वांची ओळख क्वचितच असते हेही आनंदही समाज वर्तन असते त्यातूनच कार्याच्या अथक प्रेरणा मिळतात असे हे कार्यकर्ते मात्र विचार निष्ठेतून त्याच्या जीवन जाणिवेची.विस्तारित वर्तुळ तयार करीत वाट चाल करीत असतात त्यापैकी साताऱ्याचे शिवाजी राऊत हे एक सातारा जिल्हा स्तरावरील माध्यमातील येक गंभीर पत्रकाराचे नाव होय हा पत्रकार वाडा संस्कृती च्या व सरंजामी नेते यांच्या दरबारामध्ये कधीच हजरी न लावणारा विरळा पत्रकार व राजकिय नेत्याशी फटकून वागणारा कधीच सलगी न करणारा हा तुसडा माध्यम कर्मि आहे तो activist journalist या गटातील आहे चाकोरी बाह्य जल जंगल जमीन व गौण खनिज पवन ऊर्जा या या क्षेत्रात जिल्हा ते राज्यस्तरा वरील भ्रष्टाचारी यंत्रणेला धक्का देणारी पत्रकारिता करणारा हा अप्रिय पत्रकार होय तो स्थानिक पातळीवर कायम बेदखल राहिला व ठेवला गेला तरीही त्याने बेफिकीर पणे तीन दशका ची पत्रकारिता केली आहे पत्रकारिता म्हणजे बातमीदारी नाही राजकीय विविध पक्षांच्या नेत्यांची नावे नेत्यांचे लांगुलचालन व त्या बातम्या चे ठेकेदारी हितसंबंध नव्हेत याव्यवहार पासून सजगता बाळगून दूर राहिलेले राऊत हे नाव होय सातारा जिल्ह्यात वेगळ्या पत्रकारितेसाठी चे त्याचे काम होय तो स्वत बातमीसाठी शोधक माहिती मिळवित पुढे जात राहिलेला पत्रकार कार्यकर्ता राज्य व देश पातळीवरील माहितीच्या अधिकार चळवळीत रूपांतरित झालेला व काम करीत राहिला गेला आहे व माध्यमात सामाजिक चळवळीत शिक्षण क्षेत्रात बिनीचा कार्यकर्ता म्हणून समाजमनात नोंदविला गेला आहे त्याने सूचना का अधिकार चळवळीतील साक्षरता कार्यात व्यस्त राहून दिलेले योगदान समाज उपयुक्त निश्चितच पडले आहे तो येक कार्यकर्ता पत्रकार ते चळवळीतील कृतिशील अभ्यासक या भूमिका निभावत सातारा जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात सुरूवातीस टीडी एफ संघटना सचिव म्हणून तो कार्यरत राहिला होता पुढे अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा सातारा या संघटनेत अध्यक्ष पदावर कार्यरत राहून त्यांनी महाराष्ट्रातील सर्वात मोठा 11 000 बोगस अनुशेष उल्लंघन करून दिलेल्या मान्यतेचा घोटाळा उघडकीस आणला आहे असा हा शिक्षक कार्यकर्ता 2008 ते 2022 अखेर या प्रश्नासाठी झगडत असलेला शिक्षक असून ही संघर्ष करीत असलेला कार्यकर्ता होय त्याच्या कार्यातील या विविध क्षमता आहेत त्यापैकी काही उदाहरणे शालेय अध्यापनात सतत उपक्रमशील राहणारा शाळा म्हणजे प्रबोधन पीठ शाळा म्हणजे संस्कार पिठ म्हणून झपाटून काम करीत सेवा पूर्ती केलेला विद्यार्थीप्रिय ठरला आहे हा चाकोरीबाहेरचा शिक्षक कार्यकर्ता पारंपरिक शाळेस अप्रिय वाटल्यास नवल ते काय ?त्याने शैक्षणिक अध्यापनाच्या तीस वर्ष कार्य काळात वैज्ञानिक दृष्टिकोनाचे असंख्य उपक्रम पार पाडले संविधान जागर साताऱ्यात घरोघरी मोहीम राबवणार वेगळाच कार्यकर्ता ठरला आहे स्वतःच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सतत अनेक उपक्रमातून नवीन अनुभवविश्व उपलब्ध करून देणारा हा प्रबोधक शिक्षक आजही अथक ठरतो प्रबोधन क्षेत्रातील विविध विषयावरील प्रभावी वक्ता शिक्षक म्हणून अनेकांना तीन दशके परिचित ठरला आहे विधायकता व संघर्ष ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची दोन वैशिष्ट्ये आहेत तसेच अलिप्तता आणि फटकळ ता तुसडेपणा हेही त्याचे दोष नोंदवावे लागतात पण कार्याची निष्ठा सचोटी आणि शुद्ध सामाजिक तळमळ या गुणांच्या मुळे अनेकांच्या सानिध्यात आल्यास त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील या उणीवा हे दुर्गुण क्षणात विसरले ही जातात ही त्याची कार्यातील सहभागी ता महत्वाची प्रतीत होते सतत ची विधायकता व वेगवान कामाची शैली यामुळे अनेक सामाजिक अन्यायाच्या या प्रश्नांमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग अनेक संघटनांना महत्त्वपूर्ण वाटतो असा हा हा इंटलेक्च्युअल अॅक्टिविस्त मात्र सार्वजनिक कामात सहभाग घेत हा पुढे जात राहिलेला तो वक्ता आहे तो कार्यकर्ता शिक्षण अभ्यासक गंभीर पत्रकार विविध भूमिका तून अनेकांना परिचित ठरला आहे त्याच्या बहु विस्तृत वाचन स्वयं विचार क्षमतेमुळे वेगळा गंभीर ठरतो त्याची विविध धर्म तत्वज्ञान अभ्यास करण्याची वृत्ती ही वेगळी ओळख आहे असा हा विविध भूमिकेत वावरणारा तसा असलेला सुधारक विचारधारेचा आग्रही व मूलतत्ववादी विचारधारेच्या विरोधात संघर्ष सिद्ध राहणारा आहे ज्याची इंटलेक्च्युअल अॅक्टिविस्त ही खरी ओळख आहे ती च महत्त्वाची ओळख आहे त्याचे मराठी भाषेवर प्रभुत्व आहे त्याची भाषा विचार क्षमता वेगळी आहे तो समृद्ध भाषाशैली चा संवादात नेहमी वापर करतो त्यामुळे तो बोजड वाटते तो स्वतः मार्क्सवादी विचार धारेचे नेहमी अन्वेषण करीत राहतो हे त्याच्या बोलण्यावरून प्रतीत होते अशा या कार्यकर्त्याच्याव्यक्तिमत्त्वाचे काही उणे काही गुण आहेत तो सेवानिवृत्तीनंतरही सर्व मर्यादा विसरून शालाबाह्य मुलांसाठी स्वतःला शाला बाह्य शिक्षक मानत भटकत असतो राऊत हे शिक्षक जिल्ह्यातील उर्दू शाळांच्या मधून ज्ञानरचनावाद सत्य तो रचनावाद ची पुस्तके वाटप करत राहतात एसटी स्टँड वर सन अठरा-एकोणीस मध्ये भारतीय संविधान वाटप करण्यात रमतात ती जबाबदारी मानतात असा हा हा समाज स्तरातील तळातील कार्यकर्ता शालाबाह्य मुले शोधून शिक्षण खात्यास ती दाखल करून घेण्यास भाग पाडतो त्यामुळेच तो शिक्षण खात्याच्या दृष्टीने त्रासिक शिक्षक होय दुसर्या बाजूला हा शिक्षक शिक्षण क्षेत्रातील नवनवीन विचार प्रवाह याबद्दलचे स्वतःचे चिंतन मांडण्याचा सातत्यपूर्ण यशस्वी प्रयत्न करत असतो त्यांची स्वतःची शिक्षण विचार मालेची तीन महत्वपूर्ण गाजलेल्या दोन पुस्तकांच्या दोन आवृत्त्या संपतात हे शैक्षणिक कार्याचे वेगळेपण होय महाराष्ट्रातील विविध व्याख्यानमाला यांच्या मधून वक्ता म्हणून तो नेहमी हजेरी लावतो आणि थक्क करणारे विचार प्रबोधन करीत तीन दशके समाज व्यस्त राहतो तो गट व कंपू मध्ये रमत नाही प्रभुत्व वादी कोणीही मोठे असले तरी त्यांच्यापासून सुरक्षित दूर राहणारा हा इंटलेक्च्युअल अॅक्टिविस्त म्हणून अनेकांना माहित नसतो परंतु समृद्ध ग्रंथालयात रमणारा हा विद्यार्थी वृत्तीने राहणारा व विविध ग्रंथालयात भटकणारा हा तत्वज्ञान अभ्यासक शिक्षक आहे तो फाईट अगेन्स्ट करप्शनच्या चळवळीमध्ये राज्यपातळीवर मौलिक भ्रष्टाचार निर्मूलनाचे काम करून सचोटी आणि निस्पृहता जपायची काळजी घेत वाटचाल करीत राहिलेला अनेकांना आधार वाटणारा कार्यकर्ता आहे सातारा येथील समकालीन अनेक सामाजिक चळवळींना तो आपला वाटतो त्या कामात ही सक्रिय राहतो पण तो कोणाची दीक्षा न घेतलेली असल्याने अनुयायी ठरत नाहीत परिवर्तनाच्या अनेक चळवळीमध्ये यामुळे तो आपलाही आहे आपला ही नाही असा विचार व कार्य निष्ठेचा एकांडा शिलेदार त्याच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त समाजाच्या शुभेच्छस पात्र ठरतो का? त्यास च ठाऊक !
शुभेच्छा साथी