रत्नागिरी /जिल्हा प्रतिनिधी
तालुक्यातील हातखंबा येथे बेकायदेशिर दोन जुगार अड्डयांवर ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून सुमारे 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई 27 मे रोजी करण्यात आली. नारायण बाळकृष्ण बोरकर (50), अरविंद बाळकृष्ण बोरकर (54,दोन्हीरा.हातखंबा,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
यातील नारायण हा एका किराणा दुकानाच्यामागील बाजुस तर अरविंद हा चिकन सेंटरच्या मागील बाजूस बेकायदेशिरपणे जुगार चालवित असताना ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली.रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण 26 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.