उभी करू या युवकाच्या योगदानातुन शैक्षणिक चळवळ
युवा या शब्दाच्या गर्भात वायु हा अर्थपुर्ण शब्द आहे.वायु हा वातावरणात शितलता आणतो तर हाच युवा शक्तीचा वायु शितल प्रवाहाने वाहु लागल्यावर सामाजिक .वातावरणात देखील शितल ठेवत असतो.
सामाजिक,राजकिय,अर्थीक पोकळी निर्माण झाली की,हाच वायु प्रभंजन होतो.परंतु याच वायुचा कोंडमारा झाला तर एक तर दुर्गंधी सुटते.किवा तोच
वायु बेभान वेगाने बाहेर पडतो. त्यामुळे या युवा शक्तीचा कोंडमारा देखील होता.कामा नये.युवा शक्ती हि वर्तमान असते.समाजातील प्रौढ अनुभवी यांच्या भुतकाळाचा अनुभव घेत असते.व भविष्यातील बाल्यवस्थेत असणाऱ्या बालका मध्ये तशी प्रेरणा संस्कार निर्माण करीत असते.
खरे तर हेच युवकाच्या जिवनातील जडणघडणीच वास्तव आहे.आजच्या आधुनिकीकरणाकडे पाहता जागिकरणाकडे पाहता. युवाकामध्ये एक भावना निर्माण झालेली असते.वयस्कामुळे समाज अविकसित राहिला.तसे पाहता आजचा वयस्क हा कालचा युवा असतोच.परंतु तत्कालीन परिस्थिती त्याला तशी पोषक नसते.किवा तो सामाजिक बंधनाच्या चौकटीतल जिवन त्याला जगावे लागते.परिणामी अर्थीक तुटीमध्ये विज्ञानाची कास त्याने धरलेली नसते.वैज्ञानिक बाबीतुन त्याला धर्मावर अधारीत कर्मावर त्याला प्रभावी प्रबोधन करता येत नाही.
प्रतिगामी विचारामध्ये देखील तो स्वतःभोवताच्या परिघामध्ये अडकुन राहिलेला असतो. त्यालाच आपण सामाजिक लक्ष्मणरेषा म्हणतो.किवा क्षितिजाच्याहि पलिकडे हि असणारे जग त्याने पाहिलेले नसते.व त्या जगाचा शोध घेण्याची त्याची मानसिकता हि कदाचित धर्मांध शक्तीनेव त्यातुन लाधलेल्या परिस्थितीने जखडुन टाकलेले असते.त्यामुळे वयस्कामुळे समाज अविकसित राहिला हा युवकाचा दावा देखील काही प्रतिशत नाकारता येत नसल्यामुळे योग्य आहे.त्यामुळे आजच्या प्रतिगामी विचाराकडुन पुरोगामी विचाराकडे नेणारी युवक चळवळ निश्चितच शैक्षणिक विचाराचा ध्यास घेऊन वैज्ञानिक विचारातुन समाजात परिणामकारक बदल घडवु शक
सामाजिक बदल जस जसे होत जातात तसा कधी सुप्त तर कधी उघड केलेला विचाराचा संघर्ष हा पहिल्या वर्षी दुसर्या पिढीत घडत असतो.त्यातला मध्य आम्ही शोधला पाहीजे.युवा पिढी बरोबर चालण्यासाठी वयस्काने देखील विचाराने युवा झाले पाहीजे
असा संघर्ष केवळ आजच घडतो असे नाही तर अनेक शतका पासुन युवाशक्ती व वयस्क यामधील तिढे समाज व्यवस्थेत दिसुन येतात.वरकरणी तो दोन पिढ्या मधील संघर्ष वैचारीक संघर्ष वाटत असला तरी त्यातुन सामाजिक प्रगतीसाठी त्यातुन नवी वाट चोखाळली जाते.व परिवर्तनाचा मार्ग शोधला जातो.
अनुभवातुन जाणवलेल्या प्रतिगामी विचाराना दुर सारून पुरोगामी विचाराची वाट निर्माण होत असते.त्यामागील गमक खरे तर जाणुन घ्यायला हवे. परिस्थिती बदलता येत नसेल तर मानसिकता बदलली पाहिजे. हिच मानसिकता बदलायला पाहिजे अवास्तव लाधलेल्या सनातन धार्मिक बंधनातील गुलामगिरीच्या बंधनात असलेली मानसिकता चटकन बदल स्विकारायला समुदाय तयार होत नसतो.परिणामी परिस्थितीत देखील बदल घडत नसतो.हा देखील दोन पिढ्यामधील वैचारीक संघर्षामधील एक भाग असतो.
अनुभवातुन जाणवलेल्या प्रतिगामी विचारांना दुर सारुन परंपरेच्या जाचक बंधनातुन काहीशी मोकळीक स्वतंत्र विचारधारा मांडता यावी.असे तरूण पिढीला वाटत असते.ते वाटलेच पाहीजे.परिस्थिती व मानसिकता चटकन बदणारी प्रक्रिया हि वयस्कामध्ये गतीशील नसल्यामुळे वयस्कामध्ये आजची युवा पिढी ताळतंत्र सोडून वागत आहे.असे हि वाटत असते.व दोन पिढी मधील वैचारिक अंतरामुळे वैचारिक संघर्ष निर्माण होत असतो.त्यातुन सामाजिक प्रगतीला गतीशील दिशा मिळत नसते.ती शैक्षणिक वैचारिक प्रगल्भतेतुन शोधण्या ऐवजी आम्ही धर्मिक बाबीचा सनातन विचाराच्या जातीय उतरंडीचा बाऊ करून वेळ दवडत असतो. परिणाम त्याचा पिढीवर परिणाम होतो.
हा वैचारिक संघर्ष आजचा नाही. तर तो ख्रिस्तपूर्व ४०० वर्षा पासुनचा आहे.प्रस्थिपिता विरुद्ध युवावस्थेतील बुध्दीमान युवकानी ख्रिस्तपूर्व ४००वर्षापुर्वी बंड पुकारले होते.त्याला साक्रेटिस या विचारवंताने नैतिक अराजकता असे म्हटले होते.अशी अराजकता बाह्य परिस्थितीमुळे व अंतर्गत पेटुन उठलेल्या मानसिकतेतुन घडुन येते.
खरी ती परिवर्तनाची लढाईच असते.केवळ नियोजनातुन निर्माण झालेली नसल्यामुळेच तिला अराजकता असते म्हटले जाते.सुप्तपणे कोंडलेल्या विचारधारेचा तो उफाळून बाहेर पडलेला लाव्हा असे म्हटले तर ते वावगे ठरणारे देखील नसते. म्हणुन त्याला उद्रेक म्हणतात.खरे तर ती प्रतिगामी विचाराला पुरोगामी विचाराने दिलेली चपराकच असते.
समाजातील प्रत्येक स्तरावरील युवकाना पारंपारिक बंधने जाचक वाटत असली तरी त्या विरूध्द बंड करून उठाव असे वाटत असले तरी ते सर्वाना शक्य नसते.परिणामी जुन्या चालीरिती तशाच राहुन सामाजिक प्रगती खुंटते.धार्मीकतेचा पगडा हा समाजावर परिणाम करणारा असल्यामुळे सरस असतो. त्यामुळे अती मागास समाजात तर तो मानसिकेला अजगरासारखा विळखा मारूनच बसलेला असतो.व पुर्वापार चालत आलेले पुढे पुढे तसेच घडत राहते
उच्चभ्रु समाजात सत्यनारायण, नारायण नागबली,चारधाम, तिर्थयात्रा तर ज्ञान मंदिरा ऐवजी मंदिरच उभारत बसणे हि मानसिकता तर मागास समाजात वैज्ञानिक आधार असुन हि तो स्विकारण्याची मानसिकता नसल्यामुळेच ग्रहण;अमावस्या मागणे,पोतराजगिरी करणे, परंपरागत धंदे करणे यातुन बाहेर पडणारी चळवळ कृतीशील होत नाही.त्यात आम्ही कोंबडी आधी की,अंड आधी न सुटणाऱ्या कोड्यात गुरफटल्या प्रमाणे धर्म, कर्मकांड याचा विचार आधी की जातीय उतरंडीचा संघर्ष आधी हा विचार करीत बसल्यामुळे जी शैक्षणिक विचारधारा पुरोगामी विचाराकडे नेणारी आहे.तिची चळवळ उभी करीत नाही.
साप साप म्हणुन भुई बडविल्या प्रमाणे धर्म धर्म म्हणून बडवित बसतो.धर्म म्हणजे तरी काय आचरण संस्कार मानवता हिच अनेक धर्माची शिकवण देखील आहे.असे असले तरी प्रत्येक धर्माधानी धर्मातील प्रस्थापित व्यवस्था अबादित राहावी म्हणून काही धार्मिक बंधन लाधलेली आहे.पुस्तकी व व्यवहारीक शिक्षण मात्र सर्वव्यापी आहे.त्यात निरक्षिर विवेक बुध्दी ठेवता येते.
शैक्षणिक विचारधारेतुन आचरण संस्कार यात बदल होऊन मानवता समजु लागते.त्यामुळे शैक्षणिक प्रगल्भता आली की, बुरसटलेल्या धर्मिक विचार बुडीत निघतातच.
वर्तमान युगातील युवक देखील भविष्यातील बालकाना प्रगतीची वाट दाखवु शकत नाही. गरिबाना ज्यांचे समाजातील स्थान असुरक्षित आहे.ज्यांना केवळ जगण्यासाठी सतत झगडावे लागते.अशाना प्रस्थापित व्यवस्थे विरुध्द स्वयंप्रेरणेने बंड करून उठणे अशक्यप्राय. होते. त्यामुळे प्रस्थापिता विरुध्द युवक चळवळीतील सहभागिदार वा नेतृत्व गाजवणारे हे नेहमीच उच्च सत्ताधारी श्रीमंत वर्गातुनच आलेले दिसतात.कारण त्यांचे समाजातील स्थान सुरक्षित असते.
परंतु जर का परिस्थिती जाणीव झाली तर मात्र युवक चळवळीची प्रेरणा हि प्रामुख्याने समाजातील असुरक्षिततेने ग्रासलेल्या असंख्य सामान्य युवकाकडुनच मिळते.हे देखील वास्तव आहे.युवक बाल्यावस्थेतुन तारूण्याच्या उबंरठ्यावर असल्यामुळे सहाजिकच त्यांना सामान्य जडणघडण याचा अनुभव कमी असल्यामुळे परिणामाचा विचार त्यांच्या लेखी गौण असतो. चळवळीच्या अभ्यासातुन त्यांची वृती सहासी भावनाप्रधान असते.काही अंशी व्यवहारातील कठोरपणाची शासनाने लाधलेले कायदे याची जाणिव त्यांना झालेली नसते.( शिक्षण हे ती जाणिव करून देत असते)
म्हणुन ते आधुनिकतेच्या आदर्शवादी कल्पनेच्या जगात स्वप्न सृष्टीत वावरणारे तसेच अधिक संवेदनक्षम भावनाशील देखील असतात.त्याच प्रमाणे प्रापंचिक जबाबदारीचा भाग देखील त्यांच्या लेखी कमी असतो.
नवनिर्मितीची जिद्द,इर्ष्या युवकात अधिक असते.चळवळीत झोकुन द्यायचे साहसाचे धाडस ते करू शकतात.अन्याया विरूध्द बंड करून झगडण्याची भावना तिव्र असते. अशा वेळी योग्य दिशेने घेऊन जाणारा मार्गदर्शक असावा लागतो.हेच खरे युवक चळवळीला सामाजिक योगदान मोलाचे असते.तरच सामाजिक प्रगती होऊ शकते.
जगातील अनेक चळवळी युवकानी अत्यंत यशस्वीपणे चालविल्या त्यात स्वयंसेवकाचे महत्वपूर्ण कार्य केल्याचे दिसुन येते.चळवळीला खरी अनुभवी संयमी नेतृत्वाची गरज असते. केवळ युवा विचारधारेने चळवळ यशस्वी होत नाही.कारण परिस्थितीत तावुन सुलाखून निघालेले नसल्यामुळे केवळ गतीची जाण असली तरी अडथळ्याची जाण नसल्यामुळे अनुभव वैचारिक परिपक्कता, प्रगल्भता,व्यवहार कौशल्य याचा काही अंशी अभाव असतो.
परिणामी सारासार विवेक व उथळपणाने घेतलेला निर्णय देखील बाधक ठरतो. परिस्थितीनुसार शांतपणे विचारांती घेण्याच्या प्रवृतीचा हि विचार करावा लागतो.त्यामुळे युवकानी चालविलेल्या चळवळी या अधिक विध्वसंक व दिशाहिन काही वेळा परस्पर विरोधी गटामध्ये विभागल्या गेल्यामुळे अपयशी ठरलेल्या आहेत.
आम्ही देखील १९७०च्या दशकात दलित स्वयंसेवक संघ पुणे, तरूणाची चळवळ उभी केली होती.संस्थापक सचिवाची जबाबदारी मी पार पाडत होतो.
तत्कालीन परिस्थितीत बोलबाला झाला तरूण पेटुन उठले.वयस्क देखील विचाराने आमच्या बरोबर तरूण झाले. सामाजिक प्रश्नाची जाणिव झाली.पोतराजाचे केस कापले गेले.ग्रहण मागण्यावर बंधने घातली.काहीना नोकऱ्या लावल्या.सोलापुर येथील सामाजिक बंधने व सौदारे गावाने घातलेला बहिष्कार मिटवला. परंतु चळवळ सातत्याने पुढे नेण्याची प्रगल्भता काही मध्ये अपुरी पडल्यामुळे चळवळ थंडावली.
पुढे ती केवळ चालवाची म्हणुन काही जण चालवित आहेत.युवक चळवळी या प्रामुख्याने शहरी भागात दिसुन येतात त्यामुळे याचे नेतृत्व देखील शहरी भागातुन आलेले असते.त्याचे केंद्रिय कार्यालय देखील शहरी भागातच असते.चळवळीच्या आधुनिकीकरणाच्या संदर्भाचा विचार केला तर जुन्या मुल्याना या चालीरितीना चिटकुन राहणारे प्रतिगामी सनातनी उजव्या विचारसरणीचे प्रस्थापित वर्गाच्या विचाराचे असे समजले जाते. तर नव्या मुल्याचा विचार स्विकारणारे हे परिवर्तनशील पुरोगामी आधुनिक डाव्या विचारसरणीचे समजले जातात.
काही स्थानिक प्रश्नाचा युवक चळवळीचा विचार केला तर सत्ताधारी पक्षाच्या नियंत्रणाखाली असलेल्या युवक संघटना आंदोलनात अधिककृतरित्या सामील होत नाही.चळवळी या बहुतांशी न्याय मागण्यासाठी असतात.त्यात प्रतिकार शक्ती असते.विरोधाची धार असते. सत्ताधारी पक्षाला हेच नकोसे असते.म्हणुन त्या चळवळीत अधिकृतरित्या सामिल होत नसतात.
चळवळी या युवकाच्या असल्या तरी युवकाच्या संघटनेचे संपुर्ण नेतृत्व कधीच युवकाकडे नसते. तात्विक बैठक मिळवुन देण्यासाठी व व्यवहारीक चाकोरीला स्थिरता यावी.पाया भक्कम व्हावा.इत्यादी कारणा करिता प्रौढाचे मार्गदर्शन अगर प्रत्यक्षात नेतृत्व आवश्यक ठरले जाते. संघटनेमध्ये सर्वच सदश्य युवक असले तरी सर्वमान्य नेता लाभणे कठीण असते.परिणामी संघटनेमध्ये अहंभावपणातुन किवा व्यक्ती व्देषातील पदाच्या अधिकाराच्या अविचारातुन फाटाफुटीची सुरवात देखील होते.
आज समाजाला गतीशीलता दिशा देण्यासाठी सामाजिक युवक चळवळी या आवश्यक आहे.कारण जातीय संस्था जोवर अस्तित्वात आहे.तोवर समाजाचे अस्तित्व व अस्मिता निर्माण करणे हि काळाची गरज असते. कारण आपली शासन व्यवस्था हि लोकशाही असली तरी प्रगती साठी सत्ताधिशाची प्रस्थापिताची
निती वेगळीच असते.व जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हि निती वापरली जात असल्यामुळे समाज एकसंघ व्हावा लागतो.
समाज एकसंघ होताना नव्या जुन्या विचाराचे मंथन होऊनच संघटनेची विटेवर विट उभी करता येते.अनेक काळापासुन काही धार्मिक व सामाजिक बंधने हे सभोवारच्या परिस्थितीमुळे समाजावर लाधले जातात.त्याचा बिमोड करायचा असतो.परंतु प्रवाहाच्या विरुध्द एकदम जाता येत नाही.तर प्रतीगामी प्रवाहाला गती गतीने शह-प्रतिशह देत देत जुन्या विचाराला मोडीत काढावे लागते.सामाजिक बदल करताना सक्ती पेक्षा असक्तीचा विचार झाला तर परिवर्तनाला दिशा मिळते.हि कृती केली तर नवा-जुना संघर्ष निर्माण होत नाही. त्यातुन जुन्याची हार व नव्याला आधार मिळत असतो.
केवळ तरूणाचीच विचारधारा सामाजिक परिवर्तन घडवु शकत नाही. सामाजिक संघटनेचे यशापयश विचारात घेण्यासाठीच आपण प्रथम युवक चळवळीचा विचार केला आहे. व त्याच्या दुरगामी परिणामाचा आढावा घेतला आहे.सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी करायची असेल तर युवक कसा घडला पाहिजे.याचा आपण प्रत्यक्षात व्यवहारीक युवक कसा घडला पाहिजे.याचा विचार केला पाहिजे.सामाजिक प्रगतीसाठी समाज उभा राहण्यासाठी युवकामध्ये शिक्षण व अर्थकारण हे मजबुत झाले पाहिजे.
आमचे शेतीपासुन ते बाराबलुतेदारीच्या कारूनारू पासुनचे पारंपारिक धंदे काळाच्या ओघात नेस्तनाबूत झाले. जागतिकीकरणाचा आघात झाला पोटाची खळगी भरण्यासाठी पारंपारिक व्यवसाय असल्यामुळे मुक्तपणे शिक्षण घेता येत नव्हते.
परिणामी शिक्षण त्यावर अर्थकारण या पासुन बहुजन कोसो दुर होता.सामाजिक परिस्थितीमुळे विषमता व धर्माच्या बंधनात असलेली शिक्षण व्यवस्था या पासुन युवक दुर होता. हि बाब व मुळात आपली शिक्षण पध्दती हि सामाजिक जिवनाला किती पोषक आहे.हे पाहिले तर ती आज हि सामाजिक विषमतेवर आधारित आहे.या शिक्षण पध्दतीत बहुजनाची मुले टिकु शकत नाही.मुल शाळेत पहिली पायरी चढले की, त्यांच्यात नकळत एक स्पर्धा सुरू होते. परीक्षेत मिळणारे गुण त्याचे कौशल्य गुणवत्ता इतर मुला बरोबर सतत गणना केली जाणारी असते.अशा या वातावरणाच्या पहिल्या पायरीत गरीबी हा माणसाला मिळालेला शाप ठरतो. हे अनेक वर्षापासून सांगितले जाते.
आज देशात प्रामुख्याने वर्षानुवर्षे असलेल्या दारिद्र्याचा विचार केला असता.व्यवस्थेने विशिष्ट अशा समाज गटावर गरिबी लाधली आहे.व्यवस्थेने निर्माण केलेल्या टिकवलेल्या व जोपासलेली परिस्थिती निश्चितच शापा इतकी गंभीर ठरत आहे. गरिबीची वास्तवता म्हणुन काही बाबी दिसुन येतात गरीब घरात जन्म झाला म्हणुन बालपणीच मुलाना झळा सोसाव्या लागतात. व पुढे त्याचे परिणाम देखील भोगावे लागतात.आवश्यक असणारी मुलभुत साधने पोषक वातावरण,निरामय आरोग्य, गुणवत्तापुर्ण शिक्षण हे घेता येत नाही. व प्रौढावस्थेत देखील गरीबीला सामोरे जाऊन गरीबीतल्या जिवनातुनच वाटचाल काढावी लागते.
हेच दुष्ट चक्र सुरू राहते. परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी येथेच बहुजनाच्या युवकाचे खरे सामाजिककार्य सुरू होते.माणसाचे राहणीमान त्याचा आहार हे गरिबी रोखुन धरु शकते.परंतु बुध्दीचा विकास त्याची ज्ञान लालसा हि गरीबी रोखुन धरु शकत नाही. त्यासाठीच युवकानी पुढे आले पाहिजे.माध्यमिक शिक्षण घेतलेल्या व युवावस्थेत पदार्पण करीत असणाऱ्या विद्यार्थीवर्गाने वस्तीवस्तीवर जाऊन बाल्या वस्थेतील मुलांना शिक्षित केले पाहिजे.कारण पालक हे पाल्याना परिस्थितीमुळे अपुऱ्या ज्ञानामुळे शिक्षणाची योग्य पध्दती ज्ञात नसल्यामुळे शिक्षित करू शकत नाही.
युवकानी शैक्षणिक अभियान चालविले तर त्यातुन प्राथमिक अवस्थेत असणाऱ्या मुलाचा पाया मजबुत होऊ शकतो. हा उपक्रम किमान आठवड्यातुन एक दिवस वस्तीवर जाऊन केला तर तीच आपल्या युवा सामाजिक चळवळीची पहिली पायरी ठरु शकते.भुक जशी जन्मजात उपजत असते.तशीच बुध्दी हि उपजत क्षमता आहे. या क्षमतेचे प्रत्यक्ष मुल्यमापण करता येत नाही. ज्यात बुध्दीचा वापर होतो.अशा एखाद्या कृतीतुन अप्रत्यक्षरित्या बुध्दीचे मापण करता येते.
हेच मापण वस्तीवर जाऊन शिकविण्याच्या पध्दतीतुन युवकानी केले पाहिजे.एखाद्या व्यक्तीला किवा व्यक्ती समुहाला अनेक वर्षे वारंवार बुध्दीमापण कसोट्या देऊन त्याने प्राप्त केलेल्या गुणावरूनच याच बुध्दी मापण कसोट्या युवकानी घ्यायच्या आहेत.बुध्दीचा विकास कसा होतो हे पाहता येते बुध्दीचा विकास मुलाच्या विकासाचा घाट, साचा,चाकोरी बध्दता वातावरण वातावरणातील सामाजिक व मानसशास्त्रीय घटक त्याच प्रमाणे बुध्दि मापणासाठी वापरलेल्या कसोटीच्या स्वरूपावर अवलंबून असते.
बाल्यावस्थेत व पुर्ण किशोरावस्थेत मुलाची शब्द संपत्ती अतिशय वाढते. मानसशास्राच्या अधारे विविध वयोगटातील मुलाची शब्द संपत्ती हि वयोमानानुसार वाढत जाते. वय वर्ष चार असताना ५,६०० मुळ शब्द तो स्मरणात ठेवु शकतो.वय वर्ष पाच असताना ९,६०० मुळ शब्द स्मरणात ठेवु शकतो वय वर्ष सहा असताना १४,७०० वय वर्ष सात २१,२०० वय वर्ष आठ २६,३०० वर्ष दहा शब्द संपत्ती ३४,३०० हि बालकाची सुरवातीची भाषा एक शब्दाची वाक्य स्वरूपात असते.सात वर्षे वय होई पर्यत मुल विविध वाक्य रचना वापरू लागते.
हा विकास खुपच झपाट्याने होतो नेमके याच वयात त्यांच्या शब्द संपत्तीमध्ये आम्ही त्यांना जगाचे जिवनाचे ज्ञान देत नाही.तर ते केवळ प्रचलित शब्द शिव्या फार तर ओव्या बोलीभाषा एवढच शिकवत असतो.त्यामुळे ते बालक सामाजिक दृष्ट्या जैसे थे तैसेच राहते.या शब्द संपत्तीला उपजत बुध्दीच्या मानसिकतेला युवकानी आधुनिक शैक्षणिक बाबीने योग्य वळण देऊन खऱ्या अर्थाने बालकाना सुशिक्षित करून जगाच्या स्पर्धेत उतरविले पाहिजे.
जन्मल्या बरोबर मुल सामाजिक वातावरणात प्रवेश करीत असते. परंतु सुरवातीच्या काळात त्याला सामाजिक जिवन असे नसते सामाजिक परिस्थितीची जाणीव असणे हि सामाजिक जिवनाची आवश्यक गरज आहे.सामाजिक विकास हा शारिरीक मानसिक व भावनिक विकासा बरोबरच होत असतो. विकासाची सर्व अंगे परस्पर पुरक अशी आहेत.
मुलाच्या विकासावर अनुवंशिकता व वातावरण या दोन्हीचा परिणाम होत असला तरी त्यातुन बाहेर पडता येते.विकासासाठी लागणारा मुळ स्रोत शक्ती अनुवंशिकता प्रधान असते. व विकासाच्या दिशा दाखविण्याचे काम वातावरण करते.तेच वातावरण युवकानी निर्माण करायचे आहे.
हि साखळी आम्ही पुढे पुढे घेऊन जाण्याचे प्रयत्न केले पाहिजे.
उच्च माध्यमिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी माध्यमिक अवस्थेतील मुलांना शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.उच्च माध्यमिक विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षित विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाची शिदोरी देत राहावे.मग आमच्या पुढे प्रश्न निर्माण होतो तो या उच्चशिक्षिताचे काय?तर त्यांना समाजातील अर्थिक स्थिरता प्राप्त झालेल्यानी संभाळले पाहिजे.ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्यांनी ज्ञान दिले पाहिजे व ज्ञान देणाऱ्याची भुक भागविण्यासाठी अर्थिक सक्षम असणाऱ्यांनी पुढे आले पाहिजे तरच समाजात युवक चळवळ हि विधायक मार्गाने उभी राहु शकते.
आमच्या देशात धर्म सामाजिक उतरंड यामध्ये सामाजिक व्यवस्था अडकली आहे. केवळ अडकलीच नाही प्रगतीचा ऱ्हास होत आहे.परिणामी समाजाचा व्यक्तीचा ऱ्हास होत चालला आहे युवकाची चळवळ हि खऱ्या अर्थाने चळवळ असली पाहीजे केवळ क्षणिक वळवळ असता कामा नये तर ती शैक्षणिक शाश्वत चळवळ उभी राहीली पाहीजे समाजातील शिक्षित व अर्थीक संपन्न यांनी
युवा चळवळीला योगदान दिले पाहीजे.तर अशिक्षितानी अर्थीक दुर्बलानी हि चळवळ समजुन घेतली पाहिजे
आण्णा धगाटे जेष्ठ साहित्यिक/सामाजिक कार्यकर्ता