वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश सदस्य अक्षय बनसोडे यांनी दिला इशारा
पुणे : सामाजिक न्याय विभाग पुणे येथे वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश सदस्य अक्षय बनसोडे यांनी राज्यउपायुक्त डोके सर व गायकवाड सर यांची भेट घेऊन स्वाधार रक्कमेच्या तरतुदी संदर्भात चर्चा केली. सर्व रक्कम जिल्हानिहाय वितरीत झाल्याचे अधिकाऱ्यांकडून कळवण्यात आले आहे.
मागील सन 2020-21 या वर्षाची रक्कम व शैक्षणिक वर्ष 2021-22 या दोन्ही वर्षाची रक्कम तरतूद होऊनसुद्धा अद्यापही विद्ध्यार्थ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. तरी या योजनेची दोन्ही वर्षाची रक्कम येत्या सात दिवसात वितरीत न झाल्यास युवा आघाडी अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार असा इशारा प्रदेश सदस्य अक्षय बनसोडे यांच्या वतीने देण्यात आला.
यावेळी वंचित बहूजन युवा आघाडीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष चंद्रकांत लोंढे, वंचितचे संतोष जोगदंड, अनंत सरवदे, अक्षय तायडे यांची उपस्थिती होती.