12 वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना पुढील करिअरचा प्रश्न पडतो ना!
चिंता नको? या काही पर्यायांचा विचार करावा
बारावी उत्तीर्ण होणे ही मोठी कामगिरी आहे. मात्र, ख-या अर्थाने विद्यार्थ्यांची खरी परीक्षा येथूनच सुरू होते. कारण बारावीनंतर योग्य करिअर निवडणे सर्वात कठीण असते. शालेय शिक्षणानंतर विद्यार्थ्यांसाठी करिअरचा योग्य मार्ग निवडणे वाटते तितके सोपे नसते. काही विद्यार्थ्यांना आपल्याला कोणते क्षेत्र निवडायचे आहे हे माहीत असते, तर अनेक विद्यार्थी आपले करिअर कोणत्या क्षेत्रात करायचे याच मनस्थितीत राहतात.
दरम्यान, तुम्ही किंवा तुमच्या कुणी जवळील ओळखीचे विज्ञान शाखेचे विद्यार्थी असतील, बारावी करत असतील आणि भविष्याची काळजी करत असतील तर निश्चिंत राहा. कारण तुम्हाला बारावी सायन्सनंतर काय करायचे? याबद्दल काही पर्यायांचे अवलोकन करून देत आहे.
महाराष्ट्र बोर्डाचा 12वी परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.12वी नंतर विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्याने कोणता कोर्स निवडावा? कोणत्या कॉलेजमधून शिकावे? असे अनेक समस्या त्यांच्यापुढे असतात. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक क्षेत्रांचे तसेच महाविद्यालयांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. पालकांचे, मित्रांचे किंवा नातेवाईकांचे मत महत्त्वाचे असले तरी, विद्यार्थ्याने अभ्यासाचे असे क्षेत्र निवडणे महत्त्वाचे असते. ज्यात विद्यार्थ्यांना पुढील करिअर करायचे असते.
विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी अनेक प्रकारच्या पदवी अभ्यासक्रमांमधून निवड करू शकतात. विज्ञान स्ट्रीम मध्ये एक दोन नव्हे तर, बरेच पर्याय आहे. त्यापैकी काही पर्यायांचे विश्लेषण…
बारावीनंतर नॅनोटेक्नॉलॉजी उत्तम पर्याय आहे. नॅनोटेक्नोलॉजीमध्ये बीएससी किंवा बीटेक झाल्यानंतर त्याच विषयातील एमएससी किंवा एमटेक करून या क्षेत्रात उत्तम करिअर बनवता येतं.
रोबोटिक सायन्स खुप मोठे क्षेत्र आहे. या क्षेत्रात अनेक छान स्पेशलायझेशन कोर्स आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स सिस्टम, कॉम्प्युटर सायन्स मधून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम करता येतो. यानंतर विद्यार्थ्यांना इस्रोसारख्या नामांकित संस्थेत संशोधन कार्यात नोकरी मिळू शकते.
पर्यावरणप्रेमींना एनव्हायर्नमेंटल सायन्स या क्षेत्रात उत्तम करिअर घडवता येतात. या अंतर्गत इकॉलॉजी, डिझास्टर मॅनेजमेंट, वाईल्डलाईफ मॅनेजमेंट, पोल्युशन कंट्रोल, सारखे विषय शिकवले जातात. यात करिअर म्हणून नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील.
स्पेस सायन्स हे विज्ञानाचे खूप विस्तृत क्षेत्र आहे. या अंतर्गत कॉस्मॉलॉजी, स्टेलर सायन्स, प्लॅनेटरी सायन्स, ऍस्ट्रॉनॉमी अशी अनेक क्षेत्रे आहेत. याचा अभ्यासक्रम केल्यास बंगलोरमध्ये असलेल्या इस्रो आणि आयआयएससी मध्ये नोकरीची उत्तम संधी असते.
दुग्ध क्षेत्रात अतिशय महत्त्वाचे म्हणजे डेयरीसायन्स आहे. दुग्ध उत्पादनात भारत दुस-या क्रमांकावर आहे. डेयरी टेक्नॉलॉजी किंवा डेयरी सायन्स अंतर्गत आपणास यात शिक्षण घेता येते. विज्ञान विषयासह बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर स्टुडन्ट ऑल इंडिया आधारावर प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर चार वर्षांचा पदवीधर डेअरी टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम करावा लागतो.
जर आपण करिअर क्षेत्राची निवड केली असाल तर उत्तमच…परंतु ज्यांनी गोंधळात होते, त्यांनी या पर्यायांचा विचार करून आपणास जो पर्याय पेलता येतो, त्याची निवड करावी. जेणेकरून आपण आपलं पुढील भविष्य उज्ज्वल करू शकाल.
शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
कमळवेल्ली,यवतमाळ
भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९