15 जून 22 शाळेचा पहिला दिवस
अनामिक गुरुजीसाठी
“ढ. “विद्यार्थ्याचे मनोगत

15 जून 22 शाळेचा पहिला दिवस<br>अनामिक गुरुजीसाठी<br>“ढ. “विद्यार्थ्याचे मनोगत

15 जून 22 शाळेचा पहिला दिवस
अनामिक गुरुजीसाठी
“ढ. “विद्यार्थ्याचे मनोगत

गुरुजी तुम्ही मला माफ करा कारण मी तुम्हाला टीचर न म्हणता गुरुजी म्हटले आहे गुरुजी ही परंपरा गुरुकुल पासून पुढे आली आचार्य त्यातूनच तयार झाले स्वातंत्र्योत्तर काळात गुरुजी आणि शिक्षण ही आदराची ठिकाणे होती समाजातील सारी सभ्यता शिक्षणक्षेत्रात होती असा समाजाचा विश्वास होता गुरुजी हा नेता होता गुरुजी हा सुधारक होता गुरुजी ह्यापुढे राजकारणी झाला गुरुजी हा पुढे सहकारातील कार्यकर्ता झाला 90 नंतर गुरुजी हा शहरी सुधारणा तील नवमध्यमवर्ग तयार झाला गुरुजी अक्षर मंत्राचा निर्माता आहे तो अंक मुळाक्षरे शिकवणारा मातृहृदयी आहे तो प्रेमळ आहे तो मायाळू आहे तो मदतनीस आहे तो सेवावृत्ती आहे मार्गदर्शक आहे तो मित्र आहे तो स्वप्नांचा सौदागर आहे तो भविष्याचा दिग्दर्शक आहे तो व्यक्तिमत्त्वाचा व्यवस्थापक आहे असा हा गुरुजी नेहमी समाजाच्या सर्वोच्च आदराच्या ठिकाणी कायम टिकून आहे समाजाचे दुःख हे शिक्षणाचे दुःख आहे समाजातील प्रश्न हे शिक्षण क्षेत्रातील चिंतनाची ठिकाणी आहेत कारणे आहेत आजचा समाज म्हणजे शिक्षण होय आजचे प्रश्न म्हणजे शिक्षणातील प्रश्न होय
आज समाजात असलेली बेकारी शिक्षणातील चिंतनाचे अभाव कारण आहे आज समाजात असलेली विषमता हे शिक्षणातील अपयश आहे समाजात असलेली अविश्वासाची भावना हे शिक्षणाचे विघटन आहे सर्वत्र पसरत असलेली द्वेष भावना संशय शिक्षण क्षेत्राच्या अपूर्ण कामाचाच भाग आहे आज भौतिक वादाचा अतिरेक बाजार वादाचा स्वीकार उच्चभ्रू जगण्याची तीव्र लालसा वस्तूचा अतिरेकी संचय म्हणजे सुख या कल्पना ची साक्षरता करण्यामध्ये आलेले अपयश म्हणजे शिक्षण होय समाजा समाजामध्ये धर्मा धर्मा मध्ये जातीजातीमध्ये कटुता व सूड भाव वाढतो आहे याला मुख्य कारण शिक्षणातून सर्वधर्मसमभावाची साक्षरता रुजवण्यात आम्हास आलेले अपयश हे होय गुरुजी तुम्ही आम्हास धर्म ही श्रद्धा असते व्यक्तिगत असते तिचे सार्वजनिक अवडंबर करायचे नसते हे कधी शिकवले नाही श्रद्धा ही मूल्यांवर असावे प्रतीकांची पूजा म्हणजे धन्यता नावे सण व उत्सव म्हणजे खरा आनंद नव्हे सामाजिक एकात्मता सौहार्द तता म्हणजे समाज निर्माण करणे होय हे जाणीवपूर्वक करावे लागते त्यासाठी सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया शाळांच्या मधून व्हायला हवे हे गुरुजी तुम्ही शाळेमधून आम्हा मुलांना तसे धडे दिलेच नाहीत आम्हाला नेहमी टक्केवारी श्रेणी पहिला क्रमांक हे स्पर्धेचे विषय तुम्ही शिकवले आम्ही बंधुभाव विसरलो आम्ही एक आहोत आम्ही गुण्यागोविंदाने जगतो आम्ही गरीब श्रीमंत भेद मानत नाही आम्ही सवंगडी सोबती आहोत आम्ही जीवनाचे राग लोभ विसरा वयाची असतात शाळांमधून शिकलो नाही आम्ही तीच तुच्छता बाळगत मोठे झालो आम्ही मत्सर बाळगला आम्हीच दुसऱ्यांच्या प्रति अपशब्द भाषा वापरतो हे चूक आहे असे आम्हाला वारंवार शाळांच्या मधून सांगितले नाही त्यासाठी आम्हाला शिक्षाही केली नाही त्यामुळे आम्ही इतरांच्या प्रति निंदनीय भाषा वापरतो इतरांच्या धर्माबद्दल घृणास्पद बोलतो

गुरुजी आम्ही पास झालो पास होणे म्हणजे मोठे होणे एवढेच आम्हाला शिक्षणातून सांगण्यात आले खूप शिका म्हणजे खूप पैसे कमवा मोठ्या अधिकारी व्हा म्हणजे मोठे अधिकार गाजवता येतात भ्रष्टाचार करता येतो असेच एकांगी सांगण्यात आले आणि आम्ही अधिकारी झालो इंजिनियर झालो इन्स्पेक्टर झालो तलाठी ते कलेक्टर ही झालो आम्ही भ्रष्टाचार करू लागलो आम्ही सार्वजनिक हिताचा पैसा खाऊ.लागलो गुरुजी हा देश सर्वांचा इथे जातीयता वाईट आहे ती नष्ट करायची आहे
गुरुजी हे आम्हास कोणी सांगितले नाही आम्ही सुधारकांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या साजरा करत शिकलो पण सुधारकांचे विचार आचरणात आणायचे असतात असं तुम्ही कधी आग्रह धरला नाही सार्वजनिक जीवन हे शुद्ध व्यक्तिगत आचरणाने सा कारावयाचे असते हे ही सांगितले नाही
गुरुजी शाळा म्हणजे मन घडवणारी फुलबाग तुम्ही सांगितले नाही हसा खेळा निरोगी आणि मस्त रहा
निरोगी मन शिक्षण आहे विधायक विचार हे शहाणपण आहे कारण शोध घेणे हे बुद्धीचे कार्य आहे तर्क करून विचार करणे हे बुद्धिमत्तेचे वैशिष्ट्य आहे निव्वळ स्मरण निव्वळ पाठांतर म्हणजे शिक्षण असेच तुम्ही सांगता राहिला त्यामुळे आम्ही झापड बंद बनलो गुरुजी शाळेच्या बाहेर जग असते जगातले सगळे प्रसंग सगळ्या घटना यामधून शिकता येते स्वयम् शिक्षणाची निरंतर जीवन शाळा असते हे तुम्ही आम्हाला सांगितले नाही तुम्ही पाठ्यपुस्तके गृहपाठ निबंध चाचण्या व सत्र परीक्षा तोंडी परीक्षा हे सारखे सांगून भयग्रस्त बनवले नाही का आम्ही शाळेत गंध लावून येत असू वर्गात नियमित गुरुवार शनिवार नारळ फोडत असून आणि शास्त्रज्ञांच्या फोटो ना अगरबत्तीनेओवलुत असून तरीही गुरुजी तुम्ही आम्हाला ती चूक आहे असे सांगितले नाही वर्गात यांनी गरीब मुलांशी बोलत नसून अशुद्ध बोलणाऱ्या मुलांची टिंगल करीत असून तरी गुरुजी तुम्ही आम्हाला रागवला नाही कॉपी करून पास होणे हा फार मोठा भ्रष्टाचार आहे हे असत्य वर्तन आहे हे कधी करता कामा नये हे दरडावून कधीतरी तुम्ही सांगितले पण बहुतांश शिक्षक आणि विद्यार्थी कॉपी चाच मार्ग स्वीकारतात हे पण आम्ही पाहिले आहे हे कॉपी करणारे विद्यार्थी खूप पुढे जातात गुरुजी हे कसे शक्य आहे? पण समाजात घडते आहे गुरुजी आम्ही मुले आणि मुली ही समान आहोत शरीर भावाने भिन्न आहोत पण निरपेक्ष भावना एकमेकांच्या प्रती बाळगा वयाची असते हे पण तुम्ही आम्हाला दरडावून शिकवले नाही. गुरुजी व्यक्तीचे आणि समाजाचे दुःख काय असते यावर तुम्ही कधी वर्गात खूप खूप बोलला नाही समाजातील अत्याचाराच्या घटना वर्गात विश्लेषण करून सांगितले नाहीत राजकारणातील गुन्हेगारी यांची मुळे कुठे आहेत हेही तुम्ही समजावून सांगितले नाही गुरुजी स्त्री यांच्यावरील दलितांच्या वरील अत्याचार करणारे लोक कोण आहेत ते हिंसा का करतात तीकशी रोखावे याची यासाठीचा नीती पाठ तुम्ही कधी घेतल्याचे शालेय जीवनात कधी आठवत नाही.
गुरुजी हे सारे रडगाणे नाही ही वेदना आहे शिक्षण म्हणजे वेदनेची भेट आहे शिक्षण म्हणजे वेदनेशी बांधिलकी आहे शिक्षण म्हणजे संवेदना आहे .शिक्षण म्हणजे करुणा आहे शिक्षण म्हणजे अश्रूंच्या कारणाचा शोध आहे. शिक्षण म्हणजे ऐक्याचा निरंतर प्रयत्न नाही शिक्षण म्हणजे ज्ञान आणि अक्षरांचा अथक साधनेचा प्रवास आहे गुरुजी ज्ञान हे अनुभव आहे. श्रम हा आनंद आहे .श्रमही संपत्ती आहे .श्रम हे नव निर्माण आहे. श्रम ही प्रतिष्ठा आहे श्रम हे कौशल्य आहे कौशल्य हे संपत्तीच्या निर्माणाचे व्यक्तीचे गुणवैशिष्ट्ये आहे .गुरुजी शिक्षण म्हणजे कालचा समाज काय आहे ही समजावून घेणे होय. गुरुजी शिक्षण म्हणजे उद्या काय होणार आहे याचा आज विचार करणे होय गुरुजी शिक्षण म्हणजे आजच्या आडलेले सगळे प्रश्न सोडवण्यासाठी करावयाचे प्रयत्न नाहीत नाहीत का?

गुरुजी आम्ही कमी नाही आम्ही मोठे आहोत आज आम्ही फक्त वयाने छोटे आहोत आम्हाला खूप समजते आम्हाला विचार करता येतो आम्हाला माणसे ओळखता येतात आम्हाला भेदभाव कळतो आम्हाला भविष्यही कळते आम्ही फक्त निर्णय घेऊ शकत नाही आम्ही भावना प्रधान मानतो आणि वागतो म्हणून आम्ही चुकतो आम्हाला जिद्दीच्या प्रयत्न चा विचार शिकवा अपयशाने खचून न जाण्याचा विचार शिकवा द्वेष आणि मत्सर काढून टाका हे शिकवा समता हा आनंद आहे हे शिकवा अश्रू पुसणे हे शिक्षण आहे हेही सांगा गरीबी जात धर्म वंश लिंग हे जैविक अपघात आहेत हेही समजावून सांगा या सर्वांचा अभिमान बाळगणे हा वेडेपणा आहे हा संसर्गजन्य रोग आहे गुरुजी यासाठी आम्हाला जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस होण्याची धडे द्या ते शिक्षण द्या आम्हाला पुस्तकात आणि प्रयोगशाळेत शतकांचे ज्ञान असते हे समजावून सांगा आम्हाला कृतिशील आणि सर्जक बनवा गुरुजी आम्हाला क्षमा करा आम्ही हा सारा अपेक्षा वाद तुमच्याजवळ व्यक्त केला तुम्ही आम्हाला मूर्ख बावळट ढ म्हणून नेहमी हिनविता पण त्यामुळे आमच्या अंतःकरणाला जखमा होतात म्हणून गुरुजी तुम्ही हसत खेळत शिकवाल का आनंदी शाळा भ रवाल का?

शिक्षा आणि भीती ही शाळेतून दूर घालवाल का?
गुरुजी हसन आणि शिकणे खेळण आणि मोठं होणं गुरुजी कसं शिका व हे शिकण हे शिकवाल का ?

गुरुजी आजची आम्ही लहान मुलं या राष्ट्राची महान मुलं होण्यासाठी गुरुजी तुम्ही लहान व्हाल का ?गुरुजी या देशाला तुम्ही महान बनवाल का ?आमच्यासाठी हे थोडे बाल हट्ट ऐकाल का?

गुरुजी मुलेसुद्धा शिक्षकांना घडवतात मुलेसुद्धा शिकवतात म्हणून लहान तोंडी मोठा घास घेऊन गुरुजी तुमची क्षमा मागून तुम्ही लहान व्हाल का ही माफक अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त केली आहे त्याबद्दल तुम्ही क्षमा निश्चितच कराल
तुमचा
ढ विद्यार्थी हजेरी क्रमांक 7 तुकडी 9 वी फ
जीवन शिक्षण विद्या मंदिर
जैसे थे. देवराष्ट्र
दिनाक 15 जून 22 वेळ9.30

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *