अहंकाराची छडी आणि बाराखडी
माणूस आणि अहंकार माणूस आणि संवेदना माणूस आणि विचार माणूस आणि भावना हे मानवी जीवनाचे अन्य जीवन संदर्भ सोबत घेऊन प्रत्येक जनसमूह जीवन जगत असतो मानवी जीवन हे या सर्व संवेदना विचार भावना आणि अहंकार यांची ओझीबाळगून पुढे जात असते. पण हे सर्व कोणी मान्य करत नाही मुळात मानवी जीवन हे अहंकार विकासाची प्रवासी गोष्ट असते तो त्या त्या व्यक्तींनी स्वतःच मानलेला व्यक्ती विकास असतो तशी हि ओझीअसंख्य प्रकारची असतात.
अहंकाराची नौका माणसा चा जीवन प्रवासात बुडवी ते असे जरी असले तरी अनेकांच्या बाबत अहंकार हेच जीवन बनते म्हणूनअहंकाराचीओझी कशी तयार होतात? अहंकार हा स्वभाव असतो का ?अहंकार हा बाह्य परिस्थितीतून तयार होतो का ?अहंकार रोखला जात नाही म्हणून अहंकार वाढतो का ?अहंकार हे कर्तुत्व सामर्थ्य असते का? अहंकार हा व्यक्ती जीवन प्रवासाला अत्यावश्यक असतो का ?अहंकार हा त्या व्यक्ती पलीकडे तेथील जनजीवनाला व्यवस्थेला घातक असतो का? अहंकारातून सतत होत असलेले वर्तन हे घातक असते का ?अहंकाराचे निरसन करता येते का ?अहंकाराला विरोधाची गरज असते का? या असंख्य प्रश्नांची तपासणी चिकित्सा व स्व परीक्षण करण्याची गरज असते परंतु दैनंदिन जीवनात सामान्य माणसा पासून थोरामोठ्यांच्या पर्यंत हे वर्तन होत नाही .म्हणून अहंकाराचा वारा मनाला लागू नये असे जरी म्हटले असले तरीही अहंकार ही व्यक्ती मतवाला नाशक व्यक्ती दोषाची गोष्ट समजावून घेणे खूप महत्त्वाचं असते.
अहंकार ही विचार अभावाची गोष्ट असते विचार करता न येणे आणि स्वतःचे वर्तन इतरांवर लागणे हे अहंकाराचे प्राथमिक वर्तन असते विचार स्वीकारू लागू नये म्हणून अहंकारी व्यक्तीचा प्रभुत्व वाद म्हणजे अहंकार होय अहंकार ला ज्ञान अमान्य असते अहंकाराला तर्क नको असतो अहंकार चिकित्सा नाकारतो अहंकार स्व मताचा आग्रह धरतो अहंकार श्रेष्ठत्व ने ग्रस्त झालेला असतो अहंकारी व्यक्तीच्या वर्तनामध्ये व्यावहारिक शहाणपणाच्या आभावामुळे स्व मताचे आग्रही वर्तन असते अहंकारी व्यक्ति या इतर विचार करतात हे अमान्य करतात स्व अहंकाराच्या पेक्षा विचार हा महत्त्वाचा असतो हे अहंकारी व्यक्तीला अमान्य असते अहंकारी व्यक्ति घटनांनी प्रसंगाच्या समक्ष कारणे नाकारतात त्यामुळे त्यांचा आंतरिक बौद्धिक कल सुद्धा ते नाकारून पुढे वर्तन करीत राहतात या वर्तनामध्ये स्वयम् निर्णय आणि स्वयम् प्रतिष्ठा ही इतरांवर आपण लादली आहे याच खोट्या आनंदामध्ये अहंकारी व्यस्त असतात अहंकारी व्यक्ति आत्ममग्न असतात अहंकारी व्यक्ति स्तुती प्रिय असतात अहंकारी व्यक्ति परिणामाचा विचार करत नाहीत अहंकारी व्यक्ति विषमतावादी असतात अहंकारी व्यक्ति तुच्छता वादी असतात अहंकारी व्यक्ति द्वेष आणि मत्सर ही दोन हत्यारे स्वतः सोबत बाळगून नसलेले स्वतःचे कर्तुत्व अहंकाराच्या टोकदार भावनांच्या आधारे सभोवतालच्या व्यक्ती व विरोधक यांना त्या गारद करीत असतात अहंकारी व्यक्ति हिंसक असतात अहंकारी व्यक्ति असत्य वर्तनवादी असतात अहंकारी व्यक्ति व प्रामाणिक आणि दंभ बाळगून वर्तन करीत असतात अहंकारी व्यक्तींना विघातक ता किती घातक असते त्याचे परिणाम सभोवताली किती वाईट होतात हे समजून घेण्याची इच्छाशक्ती नसते स्वयम् श्रेष्ठत्व हे अहंकाराचे सतत वाढत जाणारे रूप असते आत्ममग्नता व स्वयंम श्रेष्ठत्व हे अहंकाराला गतिमान करतात.
व्यक्तीने केलेले कार्य जेव्हा हितसंबंधी यांच्या फायद्याचे ठरते तेव्हा त्या कार्याचे कौतुक स्वाभाविक पणे केले जाते कार्याला मान्यता दिली जाते कार्याचा गौरव होतो कार्याच्या गाथा गायल्या जातात त्या व्यक्ती ची जीवन चरित्र हे चर्चिले जाते त्यातूनच व्यक्ती महात्म्य वाढत जाते व्यक्तीचे श्रेष्ठत्व लाभार्थी वाढवत राहतात आणि त्या व्यक्तीची कृती बुद्धीने निर्णय कार्य याची प्रशंशा होऊ लागते ही प्रशंशा हेच अहंकाराची बीज असते स्तुती प्रशंसा गौरव मान्यता हे सर्व जुळे शब्द आहेत हे संलग्न विकार आहेत अहंकाराचा परिपोष यातूनच केला जातो व्यक्तीचे वर्तन ही प्रेरक चेतक गोष्ट असते व्यक्तीचे वर्तन ही विचारांची व विचारसरणीची बाब असते पण सार्वत्रिकता ही एक व्यापक परिणामकारक सामाजिक प्रभावकारी मन मेंदूवरील प्रक्रिया असते इथेच व्यक्तींना कार्य प्रेरक ते साठी विचार प्रसारासाठी व कार्याच्या सिद्धीसाठी सिद्ध केले जाते त्यातूनच व्यक्ती जीवनात स्वीकारलेले कार्य पुढे नेत राहते हे त्याचे पुढे जाणे म्हणजे जीवनाचा कर्तुत्व आलेख उंचावणे असते हितकारक वर्तन असेल तर अशा त्या व्यक्तीचा अहंकार विघातक विध्वंसक असत नाही मात्र द्वेष मत्सर हिंसा हत्या अशा वर्तनाचे समर्थन करणारा अहंकार हा विनाशकारी अहंकार असतो अशा व्यक्तींना शूर धाडसी सामर्थ्य पुरुष अशी विशेषणे दुबळा समाज लावत असतो त्यातूनच पोलादी पुरुष वीर शूर असे अहंकाराचे असंख्य व्यक्ती नमुने तयार करण्याचे काम समाजात निरंतर चालू असते अशा सभोवताली असंख्य व्यक्ती तयार झालेल्या आपल्याला दिसून येतात त्या अशा वावरत असतात व्यक्तीचा अहंकार वाढवा व स्वयं स्वार्थाच्या हितासाठी अशा व्यक्तीच्या िध्वंसक शक्तीचा वापर करा असे धूर्त राजकारण छुपा हिंसा वादी समाज करून घेत असतो थोडक्यात समाजाने हितसंबंधीय हे बाह्य घटक अहंकाराची ओझी तयार करीत असतात हे त्या वर्तमान काळात व्यक्तीला कळत नाही व्यक्ती प्रतिष्ठेच्या उंच शिखरावर पोहोचण्यासाठी हिणकस वर्तन करते त्या हीणकस वर्तनाचे समर्थन भित्रा स्वार्थी समाज करीत असतो आणि कर्तुत्ववान पुरुषांच्या इतिहासाची पाने हा भाट समाज लिहीत राहतो त्यामुळेच मूठभर माणसे मोठी होतात आणि सामान्य लोक कृत्तक जीवन जगत असतात अहंकार हे मूल्य नाही अहंकार हा विकार आहे अहंकार हा द्वेष आहे अहंकार हे छुपे हिंसा पूर्व वर्तन असते
अहंकारी व्यक्तीच्या वर्तनामध्ये खोल असुरक्षितता असते
अहंकारी व्यक्ति भयग्रस्त असते. तिला आपले पद प्रतिष्ठा हे कोणी हिरावून घेईल ते नष्ट होईल या भीतीने अशा व्यक्ती ग्रासलेल्या असतात त्यामुळे अहंकाराचे विपरीत परिणाम अशा व्यक्ती समजून घेण्याला उत्सुक नसतात आपला स्वयंनिर्णय आपल्या हेकेखोरपणा आपला हट्ट यालाच ते ज्ञान म्हणतात त्यांचे ज्ञान म्हणजे भावनांचा अतिरेक असतो भावनांचा हा अतिरेक हाच अहंकाराचा परिणाम असतो इतर व्यक्तींच्या मतांना त्यांच्या विचारांना त्यांच्या सूचनांना त्यांच्या निर्णयांना स्वीकारण्याची गरज नाही इतका टोकाचा अतिरेकी वर्तनवाद म्हणजे अहंकाराचा पुतळा होय अहंकार ही विघातक गोष्ट असते विपरीत परिणाम होतात अन्याय हातून होतो अत्याचाराचे समर्थन होते चुकांना दुर्लक्षित केले जाते सूड व अत्याचार यांना अशा व्यक्ती क्षुल्लक मानतात
व्यक्तीच्या जीवनामध्ये इतरांशी असलेले संबंध हे अवलंबन अधिभोग व अलिप्तता या तिन्ही पातळीवर असतात ठेवले जातात हे ती व्यक्ती अमान्य करते व माणूस हा सर्व वस्तू मात्रांचा श्रेष्ठ असा मानदंड आहे की जीवनाची उपयुक्तता एकरूपता आहे हे सुद्धा ती व्यक्ती अमान्य करते व सत्यशोधनाचा सततचा मार्ग ती अमान्य करून भावनेच्या आधारे प्रतिक्रियांच्या आधारे द्वेषाच्या आधारे सूडाच्या आधारे आपण पुढे जायला हवे अशी तिची विचारसरणी बनलेली असते अशी अहंकारी व्यक्तिमत्वे कुटुंब समाज व राष्ट्र या सर्व पातळ्यांवर पहावयास मिळतात अशी व्यक्तिमत्वे ही नाशाची साधने म्हणून धूर्त समाज इतरांच्या साठी वापरत असतो अहंकारी व्यक्तिमत्वे हे समाज आणि संस्कृतीचे मानवतेचे मारेकरी असतात अहंकारी व्यक्ति शूद्र मनोवृत्तीच्या असत्य व हिंसा लपवून पुढे जाण्याचा निंदनीय सतत प्रयत्न करीत असतात
अशा अहंकारी व्यक्तीच्या सभोवती भाट खूप असतात हेच लोक वर्तमान नष्ट करतात भाट आणि अहंकारी व्यक्तिमत्वे हे एकत्रित सत्ता गाजवतात त्यातूनच अनेक प्रकारचा निर्मम वर्तनवाद अर्थातच फासीवाद हा पुढे येत असतो फाशी वा दा चे असंख्य प्रकार आहेत असुरक्षितता असत्य व केलेल्या हिंसेचे समर्थन यामुळे अहंकारी व्यक्ति नेहमी अस्थिर असतात त्यांची प्रत्येक कृती ही व्यवस्थेला कुटुंबाला समाजाला घातक असते याचे कारण चुका दोष दाखवला जात नाही घातक कृती आणि निर्णय याला विरोध होत नाही विरोध केला तर तो मोडून काढला जातो यातूनच अहंकार वाढतो प्रत्येक व्यक्ती ही आपल्या वर्तनाच्या समर्थन करण्यातून अहंकाराची बीजे मनोभूमीत लागवड करीत असते याच वेळी विचार आणि अन्वेषण सत्यशोधक ता व सर्व मान्यता हितकारकता स्वीकारुन पुढे जायला हवे
सा र रूपाने असे म्हणता येते की विचारशील तेच्या अभावामुळे तसेच भावनेच्या व्यवस्थापन अभावामुळे अहंकार ही व्यक्ती नाशाला घातक असलेले आंतरिक विकार वृत्ती समजून घेणे ती कमी कमी करणे तीन निरसित करण्याचा प्रयत्न करणे हा सामान्य माणसाच्या जीवनाचा सम्यक होण्याचा विचारशील होण्याचा मार्ग अ तो आहे
सभोवतीच्या व्यवस्थेतील धूर्त चाणाक्ष कपट वादी व्यक्तीचे आपण बळी तर नाही ना हे ओळखून अहंकाराचा वारा मनाला लागून देता आपले जीवननौका अहंकार बुडणार नाही ना? असा.सतत प्रश्न विचारत आपणास जगता येईल असे अनेकांनी कथन केले आहे हे समजावून घेवून पुढे जात राहणे हे आपल्या हाती आहे
शिवाजी
रोत प्रेस
सातारा 16 जून 22 वेळ 12.21