प्लास्टिक बंदीचा अँक्शन प्लॅन तयार! ‘या’ वस्तू सापडल्या तर कठोर कारवाई होणार
केंद्र सरकारने १ जुलैपासून देशभरात प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे, त्यावर कठोर अंमलबजावणी होणार आहे. यात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यासाठी कठोर नियम केले आहेत. यामुळे आता 1 जुलैपासून कुणी सिंगल यूज प्लास्टिक विकताना अथवा वापरताना कोणी आढळल्यास, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मंडळाने म्हटले आहे.
बंदी घालण्यात आलेल्या सर्व प्रोडक्ट्ससाठी पर्याय निर्माण करण्यासाठी 200 कंपन्या प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांना परवान्याची नूतनीकरण करण्याची आवश्यकता नाही. कोणत्याही दुकानात सिंगल यूज प्लास्टिक वापरले गेल्यास, त्या दुकानाचे ट्रेड लायसन्स रद्द करण्यात येईल. या नंतर हे लायसन्स पुन्हा मिळविण्यासाठी दुकानदाराला दंड भरून पुन्हा अर्ज करावा लागेल.
या वस्तू होणार बंद
प्लास्टिक स्टिक
ईयर बड्स
फुग्यांची प्लास्टिक स्टिक
प्लास्टिकचे फ्लॅग
कँडी स्टिक
आइस क्रीम स्टिक
थर्माकॉल
प्लास्टिक प्लेट्स
प्लास्टिक कप
प्लास्टिक पॅकिंगचे सामान
प्लास्टिकचे इन्व्हिटेशन कार्ड
सिगारेट पॅकेट्स
प्लास्टर आणि पीव्हीसी बॅनर (100 मायक्रॉनपेक्षा कमी)