स्त्री सुंदर असणे म्हणजे शाप की वरदान!जोडीदाराच्या निवडीनंतर आपला निर्णय चुकला तर नाही, हा प्रश्न पडतो.

स्त्री सुंदर असणे म्हणजे शाप की वरदान!जोडीदाराच्या निवडीनंतर आपला निर्णय चुकला तर नाही, हा प्रश्न पडतो.

स्त्री सुंदर असणे म्हणजे शाप की वरदान!

जोडीदाराच्या निवडीनंतर आपला निर्णय चुकला तर नाही, हा प्रश्न पडतो.

दिसायला सुंदर असणे म्हणजे एक शाप आहे असं ती मानते. ती स्वत: दिसायला सुंदर आहे. त्यामुळे तिच्या घरच्यांना तिचा अभिमान आहे. पण तिला मात्र यामुळे काहीच फायदा झाला नाही. तिला हवे तसे प्रेम कधी मिळालेच नाही. तिच्या बाजूला नेहमी मुलांचा घोळका असायचा. पण ते केवळ तिच्या सौंदर्याकडे आकर्षित झालेले होते. कोणालाच तिच्यातील ती किंवा तिच्यातील खास काही आवडत नव्हतं. आपण एका सुंदर मुलीसोबत फिरतो किंवा आपली गर्लफ्रेंड ही सुंदर आहे. एवढेच त्यांना जगाला दाखवायचे होते. हेच कारण आहे की ती आजवर सिंगल राहिली.

पण हो, असे नाही की ती कोणत्याच मुलाला संधी दिली नाही किंवा पारखून घेतले नाही. कॉलेजमध्ये ती एका मुलाला डेट केले. पण नंतर त्याचा खरा चेहरा समोर आला. तो केवळ कॉलेजच्या सुंदर मुलीचा बॉयफ्रेंड होता यावं म्हणून तित्यासोबत होता. जे कळताच ती नाते तोडले. त्याच्यामुळे भविष्यात पुन्हा ती कुणालाही डेट न करण्याची शपथ घेतली. ती अजूनही अविवाहित का आहे? असे लोक तिला अनेकदा विचारतात. ती स्वतःसाठी जोडीदार का निवडत नाही? पण काही काळात सारं काही बदणार आहे, याची तिला फारशी कल्पना नव्हती.

कॉलेजनंतर ती एका फर्ममध्ये काम करायला सुरुवात केली. तिला वकील बनायचे होते आणि त्या दिशेने ती तिचे काम निवडले. तिला चांगला बॉस आणि चांगली कंपनी मिळाली. ती सुद्धा मन लावून काम करायची. त्यांचा हा बॉस खूपच चांगला होता. ती इतकी सुंदर होती आणि ते सुद्धा तरुणच होते. पण कधीच त्यांनी बॉस असल्याचा फायदा घेऊन तिच्याशी फ्लर्टिंग केली नाही. कधीच चुकीचा व्यवहार केला नाही. कदाचित याच गोष्टीने तिला त्यांच्या दिशेने आकर्षित केले.

ती त्यांना नोटीस करायला सुरुवात केली. त्यांनी अनेक केसेस एकत्र लढले, ती त्यांना असिस्ट केली. ते तिच्या कामाने खूप खुश असायचे. अनेकदा त्यानी सगळ्यांसमोर तिचे कौतुक देखील केले होते. एकदा एका केस नंतर त्यांनी त्यांच्या सर्व कर्मचा-यांना डिनरला नेले. तिथे त्यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनातील गोष्टी उलगडू लागले. तेव्हा एकाने तिला प्रश्न केला की, “ती अजून सिंगल का? ती लग्न का केले नाही?” यावर ती काही म्हणण्याच्या आतच बॉस म्हणाले की, “वय झाले म्हणून लग्न करायला हवे असे काही नाही. मी सुद्धा अविवाहित आहे. मनासारखा जोडीदार कधी न कधी मिळेल या आशेवर.” त्यांचे हे उत्तर ऐकून ती नकळतच खूप इम्प्रेस झाली.

इतरांनी तिला केलेल्या प्रश्नामुळे ती रागात बाहेर आली. पण हळूहळू तिच्या मनात बॉस विषयी प्रेम निर्माण होऊ लागले. कदाचित ही गोष्ट त्यांच्या देखील लक्षात आली असावी. म्हणून एकदा त्यांनी तिला लंच ऑफर केला. त्यांनी बाहेर गेले आणि तिथे त्यांनी तिला थेट लग्नाची मागणी घातली. तिला जरी ते आवडू लागले असले, तरी एवढा मोठा निर्णय लगेच घेणे तिला शक्य नव्हते. ती पुन्हा माणूस ओळखण्यात चुकली असे तिला वाटले आणि ती रागाने बाहेर आली. पण नंतर राग शांत झाल्यावर ती पुन्हा आत गेली आणि त्यांची माफी मागितली. त्यांना आदराने आपला नकार दिला.

ती रागावली हे पाहताच त्यांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला व ते म्हणाले, “मी काय म्हणतो ते तरी ऐकून घे. तुझा कामामधील प्रामाणिकपणा पाहूनच मी इम्प्रेस झालो होतो. हो मी तुझ्या सौंदर्याच्या प्रेमात पडतो. पण मी तुला पहिले ओळखून घेतलं आणि मगच तुला लग्नाची मागणी घातली. मला वाटतं तू एकटी आहेस आणि मी देखील एकटा आहे. आपले विचार जुळतात. आपण एकमेकांना समजून घेऊ शकतो आणि म्हणून मी मागणी घालण्याची हिम्मत केली. बाकी निर्णय तुझा असेल.” त्यांचे हे बोलणे ऐकून ती अंतर्मुख झाली आणि तिला त्यांचा विचार पटला. अशाप्रकारे त्यांनी तिचे मन जिंकले.

अखेर ती सुद्धा त्यांना संधी देण्याचे ठरवली. त्यांनी एकमेकांना वेळ दिला. खूप दिवस एकमेकांसोबत काढले. तेव्हा जाऊन तिला खात्री पटली की, त्यांचे पटू शकते आणि मग त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. ते भलेही वयाने तिच्यापेक्षा मोठे असतील पण तिला आयुष्यभर सांभाळण्याची धमक त्यांच्यात होती. आज त्यांच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण झाली आणि ते खूप खुश आहेत. नात्यामध्ये स्थिरता, शांतता हवी. ४० वर्षाच्या बॉससोबत लग्न केले, तिला तिचा निर्णय योग्य वाटतो. खरंच प्रेमाला वयाचे बंधन नसते हेच खरे..!

   शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
     कमळवेल्ली,यवतमाळ
भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *