स्वातंत्र्याचा कैदी हिंदू फासी वाद

स्वातंत्र्याचा कैदी हिंदू फासी वाद

.
स्वातंत्र्याचा कैदी हिंदू फासी वाद

फासीवाद स्वातंत्र्य आणि वंशवादी सत्ता या आधुनिक उत्तर काळातील गुंतागुंतीच्या घटक बाबी होऊ लागल्या आहेत स्वातंत्र्य हे मानवमुक्तीचा आशावाद दृढ करते स्वातंत्र्य हे मानवी जनसमूहाला सतत उन्न यित करते ते सनातन व्यवस्था उध्वस्त करते हे स्वातंत्र्याचे आविष्कार आहेत मानव जातीच्या प्रवासात स्वातंत्र्य हे मानवी हक्काच्या व्यवस्थांच्या निर्मितीसाठी हौतात्म्य हि स्वीकारण्याचे आत्त्म् भान देते हौतात्म्य साकारते या स्वातंत्र्य हे नवंनित्य मूल्याचे वर्तमानातील हि आंदोलने.चालू असतात व त्यासाठीचे जन समूह या सर्वंकश स्वातंत्र्याचा आग्रह व आक्रोश सतत चालू असतो मुळात मानवी हक्कांचे जतन आणि संवर्धन हे स्वातंत्र्याला बलिष्ठ करते हे त्याचे कार्य असते स्वातंत्र्य हे व्यक्ती जीवनातील व राष्ट्रीय जीवनातील साकारणारे हे आधुनिक मानवतेचे सभ्यता मूल्य आहे स्वातंत्र्याला सत्ते च्या अंमलबजावणीसाठी व राज्यव्यवस्थेच्या घटनात्मक पालनासाठी सतत मुक्त अवकाश हवे असते जे जे जनसमूह हे स्वातंत्र्य जिथे जिथे मानवी प्रतिष्ठेसाठी प्र स्थापना कार्य करू पाहते .म्हणजेच जेथे जेथे नृशंस भांडवल शाही व निर्मम शोषण चालवि ले जाते तेथे तेथे स्वांतत्र्य. हे वर्तमानातील सर्वकालात संघर्ष सोबत घेवून जीवन मरणाचा संघर्ष करीत पुढे जाण्या.वाचून पर्याय नसतो

स्वातंत्र्याला नकार हे भांडवलशाहीचं सुप्त कार्य चालू असते व्यवस्थेचे निर्मम शोषण अबाधितपणे करता यावे यासाठी विषमता ग्रस्त समाज हा भांडवलशाहीला हवा असतो तो त्या राज्यव्यवस्थेतील सर्वंकष साधन स्त्रोतांचे अमानुष शोषण करीत भांडवल शाही बलिष्ठ होत असते भांडवलशही ही राष्ट्रीय उत्पादनाचा व विकासाचा वाडीचा दावा करतेय पण राष्ट्रीय संपत्ती आणि राष्ट्रीय श्रम मूल्य याचे अतिरिक्त शोषण हेच तिचे सामाजिक उत्तरदायित्व कथन स्वरूपामध्ये जगभर चालूच आहे ती विधमान राज्यव्यवस्थना पुनरपि सत्तेवर आणून कंपनी साम्राज्य वाद अर्थातच नव उदारीकरण कालखंड हा अपरिहार्य आला आहे अशी आरोळी हि देत आहे आणि दुसऱ्या बाजूला शोषणाचे असंख्य नवे मार्ग ती शोधून काढत आहे उदा जागतिक महामारी ऐक उदाहरण ठरते सामार्ज्य वादी राज्य व्यवस्था या त्यांच्या राज्य व्यवस्था प्रणालीनुसार चालू देतात त्या अबोधित आहेत आम्ही त्या हस्तक्षेप करीत नाही असे भासवून कळसूत्री बाहुल्यांचे राज्यकर्ते सत्तेवर तेच व्यवस्थापन करून बसवितात. हे समान सूत्र तयार झाले आहे वरकरणी त्या त्या राष्ट्रातील व्यवस्थेतील समता मूल्य प्रस्थापना लोकशाही संवर्धन हे चालू आहे असे प्रायोजित सर्व प्रसार माध्यमे यांचे मार्फत दाखवून कंपनी साम्राज्यवाद अक्राळ विक्राळ स्वरूप धारण करीत असतो आज रूप धारण करण्यात आले आहे इतका निर्मम शोषण वाद टोकाला पोहचला आहे त्यांना आड येणाऱ्या मानव मुक्तीच्या संघटना आणि विचारवंत हे असत्य कथन शैलीने त्यांना राष्ट्र विरोधी राष्ट्र द्रोही ठरवून त्यांना तुरुंगात टाकले जाते आहे भारतात हे मोठ्या प्रमाणात केले गेले आहे स्वातंत्र्य हे नेहमी वंशवाद धर्मवाद यांच्या प्रभुत्व वादाच्या आड येते म्हणून फासिवा दी हे स्वातंत्र्य मुल्या लध्याला नेहमी कैद करीत असतात.
फासी वादी हे वास्तवात नसलेल्या फोबिया अस्मिता संस्कृती यांच्या पूनर जीवन वादासाठी ते हे करीत असतात सनातन व्यवस्था हि हिंसा वादी धर्म मार्तंड याना हवी असते धर्म हा नित्य भय व भ्रम जाल असतो तो एहवाद व मानवी जीवनातील अस्तित्व वाद नश्ट करण्यासाठी वापरता येतो म्हणून जगभर चे मूलतत्व वादी हे धर्म व वंश वाद पुनरपि उन्मादाने पेटता ठेवतात आज मंदिरे प्राचीन धर्म संघर्षा तील असत्य कथन रचना वाद पुढे आणतात आणि समाज मन हे कायम भयग्रस त. आणि हिंसक बनवितात त्यातूनच कोठे प्रादेशिकता तर सर्वत्र हिंदुत्व भ्रम हेच वास्तव तयार करतात आणि निर्मम शोषण आणि अत्याचार अल्प संख्यांक जन जाती व धर्म समुदाय याना बळी देतात राहतात
आज भारतात हा फासीवाद जो धूर्त पावलाने पुढे रेटला जातो आहे तो दुसरे तिसरे काही नसून हिंदू धर्म मूलतत्व वाद पाशवी अत्याचार दिशेने पुढे निघाला आहे हा हिंदू मूलतत्व वाद राज्य व्यवस्था अघोरी अत्याचार करीत गिळंकृत करीत आहे
निषपरभ विरोध विहीन जन समूह तयार करण्यात यशस्वी होत आहे इथे संविधान मानवी हकक् हे सर्व उध्वस्त केले जात आहे
भारतीय फासीवा द हा कळ नार नाही इतका अविश्वास नफरत व इतरांच्या प्रती असंतोष तयार करण्यात वंश वाद यशस्वी जाहला आहे त्यामुळे फासीवाद हा संविधानातील स्वातंत्र्य हे सार्वभौम मानवी मूल्य नश्ट करीत पुढे निघाला आहे. त्यामुळे वंश वाद आणि फासी वाद यांनी स्वातंत्र्याला कायम कैद केले नाही असे कसे म्हणावयाचे हाच या भय काळातील मोठा जागतिक फासी वादाचा देशी प्रवास पुढे जात असताना सर्व पातळ्यांवरील संघर्ष शिवाय तूर्त उपाय दिसत नाही

शिवाजी
राऊत. प्रेस
सातारा दिनाक 23 जुन 22 वेळ 9.43

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *