”””’____________
नव्याशैक्षणिक धोरणात प्र त्याभिज्ञा हा ज्ञान दृष्टीकोन
स्वीकारला आहे डॉ सरोजा भाटे यांचे प्रतिपादन
पुणे दिनांक 26 जून
भारतीय शिक्षणामध्ये विविध शाखांच्या मध्ये जो कथन व विश्लेषण या साठी भाषेचा साधन म्हणून जो वापर केला जातो. तो मुळात सामान्य हेतूने केलेला असतो आता या पुढे भारतीय संस्कृतीमधील मीमां सा दर्शनातील पूर्वपक्ष उत्तरपक्ष या विचार पद्धतींचा स्वीकार करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. त्या दृष्टीने भाषा प्रत्या भिज्ञा हे पुस्तक तर्क व चिकित्सा करणे तो शिकणे त्या नुसार अध्यापनात सतत वापरणे याचे महत्त्व सूचित करणारे हे पुस्तक आहे . सध्या ⁴5अध्यापन करताना विचार करायला शिकवणे महत्वाचे आहे. हा आग्रह धरणारे हे पुस्तक शिक्षण क्षेत्रात निश्चित उपयुक्त ठरेल असे विचार प्राज्ञपाठशाळा वाई अध्यक्ष डॉक्टर सरोजा भाटे यांनी व्यक्त केले .
पुणे येथील आनंद आश्रम येथे पार पडलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या अनौपचारिक कार्यक्रमात त्या बोलत होत्या
भारतीय संस्कृतीत विचार पद्धतींचा खूप मोठा इतिहास आहे. प्राचीन लोकायत हि अशीच एक विचार शाखा होती व आहे. सर्व अध्यापन क्षेत्रातील भाषेचे अतिसामान्य करण न करणं व विचार प्रधान हेतु कडे दुर्लक्ष्य ही नकळत घडणारी संवादातील वर्तन बाब आहे . त्यात बदलण्याची करण्याची गरज आहे.म्हणजेच भाषा ही विचारातून ज्ञान निर्माण करते. या हेतूनेच भाषेचा सतत वापर व्हायला हवा याच हेतूने शिवाजी राऊत लिखित भाषा प्रत्या भी ज्ञा हे चिंतनपर लेखन भाषा दृष्टिकोन आधुनिक काळामध्ये नव्याने कसा असण्याची गरज आहे याचे महत्त्व विशद करते. तसेच हे मुळात एका अध्यापकाचे भाषा अभ्यासकाचे व पत्रकाराचे सामाजिक कार्यकर्त्यांच्या विचार भूमिकेचे प्रतिबिंब उमटलेले पुस्तक आहे. म्हणून यात बहुविध विषय व दृष्टिकोन यामध्ये वाचकांना निश्चित आढळून येतील असे सांगून डॉक्टर सरोजा भाटे शेवटी म्हणाल्या की नव्या शैक्षणिक धोरणांमध्ये विचार करण्यास आता यापुढे शीकविले जाणार आहे त्या दृष्टीने हे पुस्तक साधन साहित्य हे पुस्तक ठरले असे ही शेवटी त्यांनी सांगितले .
एखादा कार्यकर्ता व शिक्षक भूमिकेत कृतिशील राहून जेव्हा लेखन करतो तेव्हा त्याच्या प्रधीर्ग अनुभवाचे संचित हि त्या लेखनामध्ये उतरते भाषा प्रत्या भी ज्ञा हे पुस्तक अशाच कृतिशील कार्यकर्त्याचे भाषा चिंतनाचे पुस्तक आहे त्यात निश्चितच शिक्षण क्षेत्रासाठी मौलिक असा नवा दृष्टिकोन मिळेल असा आशावाद वाटतो असे विचार प्राज्ञपाठशाळा वाई या संस्थेचे सचिव अनिल जोशी यांनी या प्रसंगी व्यक्त केले.
पुस्तक प्रकाशन प्रसंगी पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात डॉक्टर शं
तनू अभ्यंकर म्हणाले की भारतीय संस्कृतीत ज्ञानाच्या अनेक विचारपद्धती आहेत . भाषा आणि विचार तसेचभाषा आणि ज्ञान असा संयुक्त नवा दृष्टीकोन ही सततची भाषिकांची वर्तन प्रक्रिया असायला हवी त्याच हेतूने हे भाषा विचार शिक्षण प्रत्याभि ज्ञा या पुस्तकात ज्ञानाचे बदलते पर्यावरण व भाषा राजकारण नमूद केले आहे. असे वाटते हा नवा भाषा दृष्टिकोण रुजायला. असे हि डॉ शंतनु अभ्यंकर यांनी सांगितले
पुस्तकाची भूमिका लेखन भूमिका विशद करताना शिवाजी राऊत लेखक म्हणाले की नव्या शैक्षणिक धोरणात लिबरल आर्ट्स ही नवी व्यापक संयुक्त अशी ज्ञान शाखा खुली होणार आहे त्यामध्ये विविध विषयांचा व सतत च्या समस्यांचा विचार कसा करावा हा हेतू त्यामध्ये आहे नवे शिक्षण धोरण विचार करायला शिकवणारे नवे शिक्षण आहे त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घटकाचा दृष्टिकोन हा भाषेकडे गांभीर्याने पाहण्याचा निर्माण व्हावा. त्यासाठी प्रत्येकाचे भाषिक वर्तन विचारा करण्यासाठी सजग व्हावे आणि भाषा ही ज्ञान निर्माण करणारेच साधन आहे याच प्रधान भूमिके तून भाषिकांनी भाषेकडे पहावे हाच आशय या पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न या लेखनातून केला आहे तो मराठी भाषिकांना निश्चित आवडेल असेही शिवाजी राऊत यांनी स्पष्ट केले या प्रसंगी डॉ राजेंद्र प्रभुणे नंदकुमार बागवडे मदन कुमार साळवेकर हे मान्यवर उपस्थित होते
शेवटी डॉ भाग्यता पाटसकर यांनी उपस्थितांचे आभार मानले