परिवर्तन तर्फे शाहू प्रेरणा पुरस्काराचे वितरण
कोल्हापूर,दि.२७ (प्रतिनिधी) शिवाजी तरुण मंडळ शिवाजी पेठ व परिवर्तन फाउंडेशन तर्फे छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास अॅड. धनंजय पठाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना शाहू प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
याप्रसंगी बी न्यूज चे कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी, एस न्यूज चे कॅमेरामन विजय जाधव, नगरसेवक अजित राऊत यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
शाहू प्रेरणा पुरस्कार परदेशी उद्योग समूहाचे आकाश परदेशी, चांदी कारागीर प्रकाश बनसोडे, चंदगड चे शिक्षक राजीव भोगण, राष्ट्रीय स्केंटिंग खेळाडू डाॅ. प्राजक्ता सूर्यवंशी, सि.पि.आर. चे औषध निर्माण अधिकारी धनाजी जाधव,प्रा.आनंद भोजने,एमआयडीसीचे अभियंता इराप्पा नाईक,प्रसिध्द आंबा व्यापारी सलीम बागवान, एमआयडीसीचे शैलेंद्र कुरणे,एक्साईजचे सचिन काळेल, वडणगेचे मा. उपसरपंच सयाजीराव घोरपडे,फार्मासिस्ट शशिकुमार पाटील,प्रसिद्ध बॉडी बिल्डर दिलीप कदम,जिल्हा परिषदेचे सचिन पाटणकर,साहित्यीक मोहन कांबळे,शियेचे उपसरपंच प्रभाकर काशीद,प.व.डी. चे प्रबोधकुमार कोल्हटकर, डिझायनर राहुल पाटील,एक्साईजचे संदिप जानकर,वडणगेचे डाॅ.अजित देवणे,सामाजिक कार्यकर्त्या सौ.सिध्दी रांगणेकर आदींना गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन परिवर्तनचे अध्यक्ष अमोल कुरणे यांनी केले.
यावेळी शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा उपप्रमुख सुजितभाऊ चव्हाण,शरद नागवेकर,मनीषा घुणकीकर,राज कुरणे,गोपी धनवडे,अदित्य पोवार,फिरोज सतारमेकर आदी उपस्थित होते.