भीमक्रांती सोशल फाउंडेशनने गुणिजनाना पुरस्कार देऊन केला सन्मान
हरोली (वार्ताहर)
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्म शताब्दी वर्ष व जयंती निमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या मान्यवरांना भिमक्रांती सोशल फौंडेशन, हरोली ता. शिरोळ जि. कोल्हापूर या संघटनेच्यावतीने रविवार दि. २६ जून रोजी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, मानपत्र व पुष्पहार घालून पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष- बाळासाहेब कांबळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष- राजकुमार कांबळे, राज्य अध्यक्ष- गुणवंत कामगार असोसिएशनचे सुरेशराव केसरकर,प्रहार संघटना जिल्हा अध्यक्ष- दगडू माने, डॉ. तौफिक नदाफ,सामाजिक कार्यकर्त्या-कलावती पवार,श्रीमती पद्मिनी शिंगे,शिवसेना उपतालुका प्रमुख-ॲड.युवराज घोरपडे, डॉ.शिवाजी शिंदे, शिवगोंडा पाटील(टोपई), अभिनंदन पाटील दत्तवाड,राजेंद्र प्रधान,स्वरतरंग संगीत ॲकडमीचे संस्थापक- श्रीपती कोरे सर,मोहसिन मुजावर,तुषार गुजरे,भिमराव मधाळे,दत्तात्रय कोळी,बाळासाहेब कांबळे,श्रीकांत शिंघाई, सतीश मोठे,श्रीमती कलावती जनवाडे,सौ. प्रियंका माळगे, नटराज डान्सचे प्रशिक्षक- विशाल चिगरे, निलेश तारदाळकर, पत्रकार- शिवाजी येडवान, सखाराम जाधव,आप्पासाहेब भोसले,रमेशकुमार मिठारे, उत्तम हुजरे,राजेंद्र कांबळे,हालगीवादक- उत्तम बिरणगे व सहकारी, भिमक्रांती सोशल फौंडेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.