_–लोक प्रियतेच्या घरी सत्य निष्ठेची मारामारी—
लोक प्रियता हा माझा जन्म सिध्द हक्क आहे!
सत्य निष्ठा पायदळी तुडविने हे माझे कर्तव्य आहे!
((एक अर्थ शोध ))
इंग्लंडमध्ये सध्या लोकप्रियता आणि सत्यनिष्ठा यावर चर्चा घडत आहेत भारतात लोकप्रियता आणि असत्य प्रचार याची काळजी घेतली जात आहे म्हणून लोकप्रियता आणि सत्यनिष्ठा याचा संबंध काय असतो लोकप्रियता आणि असत्य प्रचार याचा ही संबंध काय असतं हे विचार पातळीवर समजून घेणे आणि जन मनाचे प्रबोधन करणे हा या लेखनाचा स्वयं वास्तव तपासण्यासाठीचा हा प्रयत्न आहे लोकप्रियता म्हणजे लोकांना ते व्यक्तिमत्व आवडणे होय त्या व्यक्तीने लोकांच्यासाठी केलेले कार्य केलेला त्याग हे समजावून घेऊन लोक त्या व्यक्तीच्या प्रति आदर भावना व्यक्त करतात त्याच्यापुढे जाऊन त्या व्यक्तीची स्तुती करतात त्या व्यक्तीला श्रेष्ठ मानतात त्या व्यक्तीच्या प्रति अंतकरणात श्रेष्ठत्वाची भावना बाळगतात लोक त्या व्यक्तिमत्त्वाला आपला आदर्श मानतात त्या व्यक्तीच्या सर्व निर्णय व कृतीचे समर्थन करतात ती व्यक्ती ही त्यांच्या जीवनातील अशा आकांक्षा पूर्ततेचे एक साधन बनलेले असते आदर्श बनलेला असतो हा आदर्शच लोकप्रियतेचे परिणाम स्वरूप असते लोकप्रियता ही व्यक्तीच्या जीवनाची कर्तव्याच्या पुढील वाढत जाणारी भावनिक गरज असते प्रत्येक व्यक्तीला आपली कृती आपले वर्तन आपले निर्णय आपले विचार हे इतरांनी स्वीकारावे त्याला मान्यता द्यावी त्याचा प्रसार व्हावा त्यानुसार समाजाने आपले दैनंदिन जीवन वर्तन करावे असेही वाटत असते व्यक्तींची ही लोकप्रियतेची आंतरिक आसक्ती ही प्रत्येक व्यक्तीच्या भावा अवस्थेचे दर्शन आहे म्हणून लोकप्रियता ही ऊर्जा आहे तसेच ते समाजाने दिलेल्या मान्यतेचे निकष पण आहेत पण अशी लोकप्रियता प्राप्त करण्यासाठी करावयाचे प्रयत्न हे खूप महत्त्वाचे असतात प्रत्येक व्यक्ती आपली उद्दिष्टे आपल्या जीवनाच्या धारणा आपले मूल्य यांच्या आधारे जीवनाच्या यशाची शिखरे किंबहुना सर्वसामान्य जीवन जगण्याचा मार्ग पुढे चालू ठेवत असतात त्यातूनच समाजाच्या प्रती अशा व्यक्तींच्या बद्दल खूप आदर भावना पुढे पुढे वाढू लागते आणि ती व्यक्ती लोकप्रिय ठरते लोकांच्या चर्चेचा विषय ती बनते कारण त्या व्यक्तीने स्वीकारलेले कार्य हे समाजाच्या सार्वत्रिक जीवनाच्या बदलाचे उत्तर असते म्हणून लोकप्रियता ही महत्त्वाची असते लोकप्रियता ही मोहमयी व मानसिक चंचलता आहे कर्तुत्वाशिवाय लोकांनी आपणाला आदर द्यावा लोकांनी आपल्या नावाचे कामाचे कौतुक करावे असे वाटत राहणे ही मानवी स्तुतिप्रियता असते याच भावनेचा वापर करून लोकप्रियता कर्तव्याशिवाय सत्यवर्तनाशिवाय सत्यनिष्ठे शिवाय मिळाली पाहिजे तो माझा अधिकार आहे मी प्रसाराच्या असंख्य साधनांचा वापर करून अशी लोकप्रियता सतत मिळवणार व वाढवित राहणार ही विकृती जगभरच्या समाज धोरणांच्या मध्ये वाढू लागली आहे सत्यनिष्ठा आणि कर्तव्य हेच जीवन आहे असे मानून जगणारा समाज आजही आहे परंतु मोठ्या प्रमाणात असत्यवर्तन करून इतरांना फसवून लोकप्रतिष्ठा मिळवता येते ही माझी लोकप्रियता माझ्या सत्तेच्या आधारे मला मिळालीच पाहिजे ही शूद्र मानसिकता भारतीय जनमनातील सत्ताधारी लोकप्रतिनिधींची वाढू लागली आहे सर्वच जनमानस हे लोकप्रियता या शूद्र मानसिकतेने झपाटलेले आहे मुळात सत्यनिष्ठा काय असते सत्य वर्तन आपण करतो का याचे विचार समाजातून नाहीसे होणार आहेत की काय असे थक्क करणारे बदल समाज वर्तनामध्ये आढळून येत आहेत त्यामुळे निष्ठा आणि सत्य हे आता डळमळीत झाले आहे वर्तमानाचा फायदा मिळवण्यासाठी निष्ठांचा बळी द्यायला हवा अघोरी संपत्ती गोळा करण्यासाठी असत्य वर्तन केले तरी चालते लूट आणि फसवणूक ही सुद्धा केली तरी लोकांना त्याबद्दल चीड वाटत नाही लोक लाचार व मूकपणे लोकप्रतिनिधींच्या या वर्तनाबद्दल मूग गिळून गप्प बसतात असे असत्य फसवणुकीचे लुटीचे वर्तन लोक स्वीकारतात आणि खुज्या व्यक्तिमत्त्वाची माणसे शूद्र स्वार्थाने सर्व क्षेत्रात निष्ठाना बळी देऊन सत्तेवर बसतात तेव्हा अशा माणसांना प्रणाम करणारी वंदन करणारी लाचार असंख्य व्यक्तिमत्वे सभोवताली गोळा होतात केंद्रस्थानी आणि राज्य स्थानी आज हे दृश्य पहावयास मिळते याचे कारण सत्यनिष्ठा ही फीजुल आहे लोकप्रियता श्रेष्ठ आहे
लोकप्रियतेचा शूद्र स्वार्थ ही विकृत मानसिकता आहे हे लोकांना कळते सभोवतालचा लाचार जनसमुहाचा तांडा जयघोषामध्ये सामील होतो स्वतःच्याही साध्या निष्ठा मोडीत काढतो आणि लोकप्रियता वाढत आणण्यासाठी त्या व्यक्तीच्या गौरवीकरणांमध्ये सहभागी होतो अशा व्यक्तींच्या पूजा बांधण्याची घाई भारतीय समाजाला सर्व कालखंडामध्ये झालेली आहे भारतीय समाज हा पूजा वादी समाज आहे पूजेची धन्यता ही सर्व कल्याणाची प्राथमिकता आहे असे गृहीत धरून जगणारा भारतीय समाज हा क्षणात व तात्काळ लोकप्रियतेच्या जयघोषामध्ये स्तुतीच्या परिपाठामध्ये नेत्यांच्या लाचार तांड्यामध्ये समर्पित होत राहतो भारताचे सर्व क्षेत्रातले पर्यावरण आज तंतोतंत वरील वर्णन केल्यानुसार असल्याचे आढळून येते. लोकप्रियता ही सत्तेवर असल्या मुळे तो माझा अधिकार आहे माझी मतभिन्नता माझे असत्य कृती माझ्या असत्य कथनाच्या कृती याबद्दल कोठेही उच्चार होता कामा नये टीका होता कामा नये वर्तमानपत्रात लिहून येता कामाने मला प्रश्न विचारता कामा नयेत असा एक टोकाचा अहंकार वाद हे लोकप्रियतेचे शूद्र मानसिकतेचे वर्तन आहे अशा व्यक्तिमत्त्वांच्या सत्यनिष्ठा काय आहेत हेही तपासण्याची उसंत लोकप्रियतेच्या वादळांमुळे लोकांना मिळत नाही लोकांची इच्छाशक्ती सत्यनिष्ठा तपासण्याची असत नाही सत्य निष्ठा तपासून दिल्या जात नाहीत. त्यामुळे सत्यनिष्ठा हेच समाज जीवन आहे सत्य वर्तन हा समाजाचा न्यायिक आग्रह आहे सत्य वर्तनातूनच सामाजिक न्याय सर्वांच्या प्रति अविस्कृत होऊ शकतो तो मिळू शकतो या प्रकारचा विश्वास लोकप्रियतेची शूद्र स्वार्थ नाहीसा करतात भारतामध्ये सत्यनिष्ठा पदोपदी पायदळी तुडवली जात आहे सत्य वर्तनाचा आग्रह अपवादात्मक ठरत आहे आणि त्यामुळे सर्वच लोक चांगले ठरत आहेत ते लोकप्रिय आहेत ते प्रसिद्ध आहेत ते सर्वसामान्यपणे मदतगार आहेत असा भम्र तयार केला जातो .
सत्यनिष्ठा हा मानव जातीच्या सर्वोच्च मूल्यांचा आधार आहे सर्व नैतिक मूल्य ही सत्यनिष्ठेच्या आग्रहातून संस्कारीत होतात संक्रमित होतात पुढे पुढे पुढे चालू लागतात. समाज त्या मूल्यांचा स्वीकार सर्व कालखंडामध्ये करीत असतो सत्यनिष्ठेला काळाची सापेक्षता असते काळच सत्याच्या निष्ठेची व्याख्या दमन शक्तीच्या आधारे अत्याचाराच्या सामर्थ्याच्या आधारे हे सगळे संदर्भ आणि व्याख्या बदलतो आज जगभर असत्य फसवणूक कथन संशय आणि गुन्ह्यांमध्ये अडकवणे ही वर्तमानाची राजकीय नीती झाली आहे .हा जर लोक प्रियतेचा मार्ग बनत असेल तर सत्यनिष्ठेचा गाळा पदोपदी घोटला निश्चित जाणार आहे आज भारताच्या नव्हे तर जगभरच्या सर्व ठिकाणी सत्यनष्ठेचा गळा सतत घोटला जातो आहे हे जागतिकी करण् उत्तर काळातील सत्योत्तर सत्य निष्ठा मूल्यांचे दुबळे स्वरूप आहे
जेव्हा समाजाच्या धारणा दळमळीत होतात समाज हा भौतिक लालसी वादी होतो तेव्हा निष्ठा ही नेहमी वादग्रस्त बनते निष्ठा ही मूल्यांच्या विकासासाठी व वारसा पुढे नेण्यासाठी नितांत आवश्यक असते हे सर्वच मूल्यांच्या निष्ठेबद्दल हे गतिशास्त्र अत्यावश्यक आहे पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व मूल्यांचा प्राण स्त्रोत असलेल्या सत्य नावाच्या मूलगामी नीती मूल्याला निष्ठेशिवाय अस्तित्व नाही सत्य हे आचरणातून अविष्कृत होते त्याचा प्रभाव पडतो त्याचे महत्त्व प्रतीत होते त्याचे अनुकरण होते पण सत्य कळणे खूप महत्त्वाचे असते असत्य स्वीकार करणाऱ्या निर्मम शोषण करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना असत्य प्रिय असते त्यातूनच असत्य हे सशक्त होत राहते त्यासाठी सत्याचा बळी सतत दिला जातो मूल्यही नेहमी व्यक्तींच्या जनसमूहांना आपल्या संक्रमण शील इतिहास ते वर्तमान व वर्तमान ते भविष्य यांच्या वाहकतेसाठी वापरत असतात हे मूल्यांचे अमूर्त प्रभुत्व ही मानवी मेंदूची व त्यातील नेहमीची किमया आहे हा संस्कार आहे हा विचार आहे हे त्या व्यक्तीचे समाजा प्रतीचे आकलन आहे म्हणून सत्य वर्तन सत्य आचरण सत्य स्वीकार हेच वर्तमान असते असा नैतिक प्रबोधनाचा प्रदेश सतत विकसित करण्याची नितांत गरज असते परंतु लोकप्रियतावादी असत्य कथनवादी व्यक्ती संस्था आणि पक्ष आणि संघटना या असत्य कथनाचा आधार घेऊन लोकप्रियतेच्या वाटेवरून चालू लागतात आणि आपलेच सत्य हे अंतिम आहे आपलीच निष्ठा श्रेष्ठ आहे असा आत्मगौरव करीत इतरांना आरोपी बनवीत राहतात त्यातूनच लोकप्रियता न देणारे विचारांना विरोध करणारे प्रश्न विचारणारे व्यक्ती आणि जनसमूह जाती आणि धर्म यांना लोकप्रियतेचा शूद्र स्वार्थ बाळगणाऱ्या व्यक्ती आरोपी बनवतात त्यांना बहिग्रस्त करतात त्यांची हिंसा केली जाते त्यांचे अस्तित्व नाकारले जाते त्यांच्या साधन संपत्तीची लूट केली जाते हे लोकप्रियतेच्या शिखरावरील सर्व क्षेत्रातील मुखंड व्यक्तींचे वर्तन असते आज भारतात सर्व क्षेत्रांमध्ये कमी जास्त प्रमाणात हेच चालू आहे त्यामुळे भारताचे वर्तमान व भविष्य लोकप्रियतेचे शूद्र स्वार्थ आणि सत्य निष्ठेचा मुडदा पाडणे हे सतत होत राहणार आहे
सत्यनिष्ठा देत असलेली लोकप्रियता ही आबादित असते ती संशयाच्या फेऱ्यात येत नाही समाजाने उत्स्फूर्तपणे दिलेली मान्यता असते .अशा सत्यनिष्ठ व्यक्तींच्या इतिहासाचा भारताला गांधी ते लालबहादूर शास्त्री मौलाना आझाद ते खान गफार खान यासारख्या व्यक्तिमत्वांचा मोठा आदर्श वारसा आहे. असे असताना लोकप्रियता हा माझा हक्क आणि अधिकार आहे. असत्यवर्तन हे माझे कर्तव्य आहे. इतका टोकाचा अहंकार हा कोणत्याही व्यक्तिमत्त्वाला व समाजाला जेव्हा असतो तेव्हा तो घातक असतो व ठरतो भारतात अनेक प्रभुत्व जाती आणि धर्म अश्या दिशेने प्रवास करू लागले आहेत . त्यामुळे जनसामान्यांचे जगणे हे नेहमी भयग्रस्त बनले आहे ते अस्थिर जाहले आहे ते निर्मम हत्यांना बळी पडत जाणार आहे भारताच्या वर्तमान वभविष्याचे हे प्रखर वास्तव नाकारता येत नाही कारण भारतात लोक प्रिय ता . हेच जीवन तथा कथितांचे बनले आहे त्यामुळे या देशातील सत्य निष्ठा हा वारसा संपुष्टात आणला जात आहे इंग्लंड मध्ये लोकप्रियतेसाठी सत्य निष्ठा सोडू नये यावर राजकीय महा चर्चा. झडत आहेत भारतात मात्र लोकप्रियता हाच माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळविणार च अश्या आरोळ्या ऐकू येत आहेत त्यामुळे सत्य निष्ठेतून प्राप्त झालेले स्वातंत्र्य जपून ठेवण्यासाठी अथक संघर्ष करण्याची गरज आहे
शिवाजी
राऊत प्रेस सातारा
7 जुलै22 वेळ9.45