बांधकाम कामगार व बेघरांचा शुक्रवार दिनांक 15 जुलै रोजी ठीक सकाळी दहा वाजता निवारा भवन सांगली येथे भव्य मेळावा!
महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेअंतर्गत ज्यांनी घरासाठी दोन लाख रुपये अनुदान मिळण्याबाबत अर्ज केलेले आहेत. त्या सर्वांनी मेळाव्याला उपस्थित राहणे आवश्यक आहे. एक महिन्यापूर्वी सांगली महानगरपालिकेमध्ये 357 सांगलीतील बेघरांना घरकुले देण्याबाबतचा आमसभेमधे निर्णय झालेला आहे. त्याबाबतची कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या संदर्भातही सर्व बेघरानी ठीक सकाळी दहा वाजता सांगली निवारा भवन येथे उपस्थित रहावे.
मिरज येथील भीमपलास प्रकल्पामध्ये ज्या 90 नोंदीत बांधकाम कामगारांना 90 फ्लॅट्स मंजूर झालेले आहेत त्यांनी आर आफ्लॅट्स अग्रिमेंट करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सुद्धा सर्वांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. तरी वरील सर्वांनी कागदपत्रांची पूर्तता वेळेत न केल्यास त्यांचा अर्ज नामंजूर झाल्यास संघटना जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
या मेळाव्यास निवारा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते कॉ शंकर पुजारी मार्गदर्शन करणार आहेत.
तरी सर्व ग्रामीण भागातील घरे मिळण्यासाठी अर्ज केलेले सर्व नोंदीत बांधकाम कामगार, सांगली महानगरपालिकेत अर्ज केलेले सर्व बेघर व मिरज भीमपलास प्रकल्पामध्ये फ्लॅट बुकींग केलेल्या सर्व बांधकाम कामगारांनी मेळाव्यास वेळेवर उपस्थित राहावे. असे पत्रक निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या जनरल सेक्रेटरी प्रा शरयू बडवे यांनी प्रसिद्धीस दिलेले आहे.
Posted inसांगली
बांधकाम कामगार व बेघरांचा शुक्रवार दिनांक 15 जुलै रोजी ठीक सकाळी दहा वाजता निवारा भवन सांगली येथे भव्य मेळावा!
