मंदीरे होती सोन्याची शाळा मात्र शेणाची !

मंदीरे होती सोन्याची शाळा मात्र शेणाची !

मंदीरे होती सोन्याची शाळा मात्र शेणाची !

✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे
(भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक)
मो. ९७६२६३६६६२

प्राथमिक शिक्षण सक्तीच व मोफत करा म्हणून महात्मा जोतिबा फुलेंनी व्हाईसरायला पत्र लिहल होत. आज शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे शिक्षण घेण खुप कठीण झाल आहे. पण ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण मोफत दिल जात त्या शाळांची अवस्था काय आहे ?त्या शाळेची स्थिती कशी आहे ?तेथिल विद्यार्थांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे ?याकडे मात्र प्रशासन नेते व सरकार याचे दुर्लक्ष आहे. अच्छे दिन यावेत ह्या भावनेपोटी लोकांनी मतदान यंत्रामार्फत भरभरून मते दिली पण ते अच्छे दिन स्वप्ना व्यतिरिक्त आज तरी प्रत्यक्षात कुठे दिसत नाहीत हे आजच वास्तव आहे. देशातील शिक्षणक्षेत्राचा झालेला बट्याबोळ न पाहता देशाचे सर्वेसर्वा मात्र राम मंदीराचा पायाभरणी शुभारंभ मोठ्या उत्सवात साजरा करताना दिसतात. त्यामुळे शाळांची संख्या वाढण्यापेक्षा मंदीरांच्या संख्येचा आलेख जोमाने वर चढत आहे. मग त्याविरोधात कोणी भ्र शब्द काढला तर आमच्या भावना दुखावल्याचा आव आणत तात्काळ गुन्हे दाखल केले जात आहेत. सत्य बोलल्यास जर इतरांच्या भावना ठणका देत असतील तर त्यासाठी माजी आ. केशवराव धोंडगे म्हणतात की, आम्ही सत्य बोलल्यामुळे किंवा लिहल्यामुळे जर कोणाच्या भावना दुखत असतील तर त्यांनी आपल्या भावनेचा पुष्पगुच्छ करून तो इअर कंडीशनमध्ये ठेवावा जेणेकरून त्याला इजा पोहोचणार नाही.
मानवी जीवनात शिक्षणाला मोठं महत्त्व असल्यामुळे पालक मुलांच्या शिक्षणासाठी वाटेल ते करून आपल्या पाल्यांना उच्चशिक्षित करण्यासाठी प्रयत्न करतात. आपल्या देशात ग्रामीण व शहरी भागात शिक्षणाला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. मात्र, अजूनही देशात अशी काही गावं आहेत जिथे मुलांना शिक्षण मिळवण्यासाठी मोठे कष्ट करावे लागतात. असंच एक गाव महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील चिंचाळा. ६०० लोकसंख्या असलेल्या या गावात इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे जवळपास ३९ विद्यार्थी शाळेत जीव मुठीत घेऊन शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. कारण विद्यार्थ्यांवर शिक्षणाचे संस्कार केलं जाणारं विद्या मंदिर हे एखाद्या पडीक, जुन्या इमारतीप्रमाणे आहे. तर, दुसरीकडे याच गावात तब्बल २० लाख खर्चून भलं मोठं मंदिर उभारण्यात आलं आहे. (मटा ७ जूलै २०२२) एकीकडे याच गावात मंदीराच्या कळसासाठी लाखोंची उधळपट्टी होतेय तर दुसरीकडे मात्र शाळेची इमारत पडीक व दयनीय अवस्थेत दिसते हे प्रशासन व गावक-यांचे अपयश असून गावचे दुर्देव आहे अस म्हटल तरी चालेल. कारण आपल्या पाल्याची शिक्षणासाठी होणारी हेळसांड हे पालक का सहन करत असतील. आपल्या मुलाला कोणी थप्पड मारली तर रागाला येणार बाप, मुलाच्या शाळेची अवस्था पाहुन शांत बसतो तरी कसा ?मंदीराच्या कळसाने तुमची लेकर शिकणार नाहीत तर त्यातून भटांच्या लेकरांची पोट तुडूंब भरली जाणार आहेत त्यामुळे गावक-यांना तुकडोजी महारांच्या शब्दातच सांगावं वाटत की,
काही सोनियाचे देव करिती ! वेळ पडल्या विकोनि खाती !
ऐसी आहे देवाची फजिती ! पूजकांमागे !
काही देवास बलिदान देती ! देवीच्या पीसे मांस खाती !
तीर्थ म्हणोनि मद्य पिती ! पिसाळलेले !.
चिंचाळा गावच्या शिक्षकांचा जीव सुद्धा टांगणीला असतो. शाळेवरील छप्पर तुटून गेल्यामुळे ही इमारत धोकादायक बनली आहे. तर, पावसाळ्यात अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना वर्ग खोल्यांमध्ये बसावे लागत आहे. पाऊस आला म्हटलं की विद्यार्थ्यांची तारांबळ उडते. मग नेमकं कुठे बसायचं हा प्रश्न शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना पडतो. तर दुसरीकडे याच गावात जवळपास २० लाख रुपये खर्चून भले मोठे मंदिर उभारण्यात आले आहे. देशाची भावी पिढी घडणाऱ्या शाळेला एखाद्या स्मशानभूमी सारख्या परिस्थितीत अध्ययन करावं लागतं ही दुर्दैवाची बाब आहे. गावातील नागरिकांनी अनेक वेळा सरपंच, पोलीस पाटील व ग्रामसेवक यांना याची कल्पना दिली. मात्र शालेय शिक्षण समिती आणि प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. याचे जबाबदार कोण ? असा प्रश्न पालकांना पडला आहे. (मटा ७ जूलै २०२२) गावच्या पडक्या शाळेत जिवावरची कसरत करत शिक्षक ज्ञान दानाच व विद्यार्थी शिक्षण घेणाच काम करत आहेत हे शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षांना कळत नाही का ?ह्या अध्यक्षांना फक्त शालेय पोषण आहारातून टक्केवारी घ्यायची माहीती आहे का ?गावात मंदीरासाठी २० लाख रुपये निधी जमवण्यात गावचे पोलिस पाटील, सरपंच व शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष यांचा हात नसेल का ?जर असेल तर तो मंदीरासाठी जमलेल्या पैशा शाळेसाठी वापरावा असे वाटले का नाही ?यांना शाळेची दयनीय अवस्था दिसली नसेल तर त्यांनी आपल्या डोळ्यांना मोतिबिंदुची लागण झाली का हे तपासून घ्यायला काय आडचण आहे ?त्यामुळे नागरीकांना सांगावं वाटत की, गावातील प्रशासकीय अधिकारी राजकीय पुढारी यांचेवर कागदोपत्री आसूड ओढून तुम्ही यांच्या पृष्ठभागाचे चामडे का काढत नाहीत ?कारण तुमच्या मुलाच भवितव्य जिथे घडणार आहे तीच शाळा शेवटच्या घटका मोजत असताना मात्र हे गावपुढारी गेंड्याची कातडी पांघरुन शांत बसले आहेत. ह्या शांत बसलेल्या गाव पुढा-यांनी कधी तरी तुकडोजी महाराज वाचावेत कारण ते म्हणतात की,
गाव करावे सर्वांगपूर्ण ! आदर्श चित्र विश्वाचे !
गाव हा विश्वाचा नकाशा ! गावावरून देशाची परीक्षा !
गावचि भंगता अवदशा ! येईल देशा !.
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना चिपळा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कुटे म्हणाले की, आमच्या वरिष्ठांना याची कल्पना दिल्याची माहिती सांगितली आहे. शाळेमध्ये शिकवत असताना गुरुजी सांगतात की शिक्षणासाठी आपल्या सभोवतालचे वातावरण अत्यंत महत्त्वाचे असते, मात्र, अशा हालाखीच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांची काय एकाग्रता राहणार, हा देखील प्रश्न आहे. खरंच याकडे प्रशासन लक्ष देणार का ? (मटा ७ जूलै २०२२) प्रशासनाला विद्यार्थांच्या समस्याविषयी प्रशासकीय स्थरावर माहीती देऊनही जर त्याकडे लक्ष दिले जात नसेल तर हे खुप भयंकर आहे. देशभरात अनेक काल्पनिक देवांची मंदीर नव्याने निर्माण होत आहेत मागे त्यात समलैंगिक खेळतील सावरकारांचा जोडीदार नथुराम गोडसेचा देव करून त्यांच्या नावाने मंदीर स्थापन करण्याचे महापाप येथिल झंडूत्ववादी मंडळीनी केल तसच पुण्यात नरेंद्र मोदींचा देव करून त्यांच्या नावाने मंदीर स्थापन केल होत. तेव्हा म्हणाव वाटत की, आधीच काय इथे मंदीरांची संख्या कमी होती म्हणून ही नव्याने फालतूची भर भडली ?म्हणून तर मंदीरांविषयी तुकडोजी महाराज म्हणतात की,
मंदिरे, क्षेत्रे दुकाने झाली ! पूजा, कमाई करू लागली !
दक्षिणा पात्रे पुढे आली ! पोटासाठी !
मंदिरी बांधती म्हशी गायी ! घाण दिसे ठायी ठायी !
कसली पूजा धूपदीपही ?! सारा धुव्वा तंबाखूचा !
पुजारी खेळती चौसरी ! वेश्यदिकांचे गाणे मंदिरी !
होती तमाशे दंढारी ! परोपरी देवळांमाजी !.
एकीकडे मंदीरांचे कळस सोन्याचे होत आहेत तर दुसरीकडे शाळेचे अगंण शेणाचे होत आहे ही खुप खेदाची गोष्ट आहे कारण, शिर्डी देवस्थानाला दररोज १ कोटी ६४ लाख असे मिळून वर्षभरात जवळपास ६०० कोटी रुपयांच दान प्राप्त होत आताही लाँकडाऊन काळात १७ मार्च २०२० ते १६ मे २०२० या साठ दिवसात २१ हजार ६४९ भक्तांनी शिर्डी देवस्थानाला ३ कोटी २२ लाख १० हजार रुपयांची देगणी आँनलाईन स्वरूपात दिली असे साई बाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरेंनी सांगितले. (झी २४ तास १६ मे २०२०) तर दुसरीकडे शाळा ही गावच वैभव असत त्यातून गावच्या पिढ्या तयार होतात ती शाळा सर्व सोयींनी युक्त असली पाहीजे पण महाराष्ट्रातील शाळाची आवस्था जशी हिंगोली जिल्ह्यातील चिंचाळा जिल्हा परिषद शाळेची अवस्था आहे तशीच अवस्था इतर जिल्ह्यातील शाळांची देखील आहे कारण शिक्षण विभागाच्या माहीतीनूसार ठाणे जिल्हा परिषदेच्या एक हजार ३३१ शाळा आहेत. शैक्षणिक वर्ष २०१८ – १९ मध्ये त्यातील ८१ वर्गखोल्यांची पडझड झालेली असून त्या धोकादायक आहेत. तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेने धोकादायक इमारत असलेल्या शाळाची यादी जाहीर केली त्यात गोळवली शाळेची इमारत १९८० रोजी स्थापन केली होती तीची अवस्था धोकादायक झाल्यामुळे ती सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून बांधून तीचा शुभारंभ २००७ मध्ये झाला. ह्या नवीन इमारतीच्या तळमजल्यात पाणी साचते. तसेच अंबरनाथ तालुक्यातील अनेक शाळांची छत गळत आहेत त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे मुलांना शिक्षण घेता येत नाही. (लोकमत १७ जून २०१९) तेव्हा आजपासून लोकांनी मदीरात दान देऊन भटांच्या पोटा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यापेक्षा आपल्या पाल्याचे भवितव्य घडवणारी शाळा बांधण्यासाठी सरकारवर दबाव टाकून त्या शाळेला एक आदर्श शाळा करण्यासाठी थोडसे आर्थिक सहकार्य केले पाहीजे. दानपेटीत टाकलेल्या दानाने भटे जगतील मात्र तुमची मुल विना शिक्षणाची मरतात त्याच काय ? पण आमच्या लोकांना शाळेपेक्षा मंदीर बरी वाटतात त्याच उत्तम उदाहरण म्हणजे मुंबईतल्या एका व्यक्तीने पंढरपुरच्या देवस्थानासाठी नाव न गुप्त ठेवण्याच्या अटीवर एक कोटी रुपयांचे दान दिले. त्यामुळे देवस्थान समितीला आधार मिळाला आहे. (टीव्ही ९ मराठी ५ आँगस्ट २०२१)
ज्यांच्या हातच्या नेवैद्यांने किंवा मंदीरात गेल्याने ज्यांचे देव, मंदीरे बाटतात त्यांनी मंदीरांसाठी दान काय म्हणून द्यावे ?पण याची अक्कल आमच्या उच्च शिक्षित उच्च पदावर बसलेल्या बांडगूळांना नाही याच उत्तम उदाहरण म्हणजे देशाचे राष्ट्रपती हे एकदा आपल्या पत्नीसोबत मंदीरात गेले होते तेव्हा त्यांना मंदीरात प्रवेश नाकारला होता ह्याची लाज ह्या महोदयांना का नसावी ?पण भटांच्या इशा-यावर मैं नाचूगीं मै नाचुंगी म्हणणा-या राष्ट्रपतीनी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांनी राष्ट्रपती यांची भेट घेताच आयोध्येत उभारल्या जाणा-या मंदीरासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून ५ लाख रुपयांचा निधी समर्पित करून पहीला मान मिळवला. तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान एक लाख रुपयांचा निधी दिला. (मटा १५ जाने. २०२१) हे संविधानिक पदावर बसून असे वर्तन करणे हे राष्ट्रपती महोदयांना योग्य वाटते का ?पण आमच्या लोकांची मती गुंग करण्यासाठी काल्पनिक कथांचा मारा करून पैसा सोने चांदी लुटली जाते. लोक म्हणतात की, आपण बालाजी देवस्थानाला का दान देतो ?त्यावर एक रंजक कथा सांगितली जाते ती अशी, लग्नासाठी बालाजी देवाने कुबेराकडून कर्ज घेतले (देवांनाही लग्नासाठी कर्ज घ्यावे लागते ?) होते तेव्हा बालाजीने कुबेराला सांगितले की, कलियुगात माझे भक्त मला सोने, चांदी वाहतील त्यातून मी तुझे कर्ज फेडीन. त्यामुळेच बालाजी देवतेला सोने आणि चांदी दान केले जाते. (रितभात मराठी १४ जून २०२२) देवानं घेतलेल कर्ज फेड्याचा मक्ता काय फक्त बहुजन समानानेच घेतला आहे का ?ही सृष्टी ज्याने निर्माण केली त्याने स्वत:चे वेगळे असे चलन निर्माण करून कुबेराचे कर्ज का फेडले नसेल ?त्यामुळे अशा कथा सांगणा-या भटापांसून व भटांच्या चेल्यापासून दूर रहा अन्यथा तुमची व तुमच्या पैशाची रागरांगोळी होऊन भटांची चंगळ होईल. त्यामुळे वेळीच सावध व्हा पैसा भटांच्या झोळीत टाकण्यापेक्षा त्या पैसाच गावात एखाद ग्रंथालय टाका त्यातून तुमची मुल सज्ञानी होतील. पण कदापीही भटांची तुबंडी भरू नका !.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *