सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीला गती द्या

सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीला गती द्या

सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीला गती द्या

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सिंधुदुर्ग, नांदेड मधील विकासकामांची आढावा बैठक

   मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमुळे जनतेची सोय होणार असून, तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊ शकेल. हॉस्पिटल लवकरात लवकर उभे रहावे यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

        सिंधुदुर्ग आणि नांदेड जिल्ह्यातील विविध प्रश्नांसदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार दीपक केसरकर, राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुहास पेडणेकर, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.नितीन करीर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यासह इतर वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

        या बैठकीत आंबोली (चौकुळ) व गेळे येथील कबुलायतदार गावकर सदरातील जमिनीच्या वाटपाबाबत, मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपकेंद्रासाठी आंबोली, ता. सावंतवाडी येथील जागा देण्याबाबत, आंबोली येथील एम.टी.डी.सी.च्या ताब्यातील पायाभूत सुविधा असलेली इमारत हॉस्पिस्टॅलिटी मॅनेजमेंट कोर्सेस चालविण्याकरिता मुंबई विद्यापीठाला मिळणेबाबत तसेच  वेंगुर्ला येथे सिंधु स्वाध्यायसाठी मुंबई विद्यापीठाला जागा मिळणेबाबत चर्चा करण्यात आली.

        नांदेड शहरातील विकासकामांचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड शहर आणि परिसरातील रस्ते व पूल, नवीन इमारती, रस्त्यांची दुरुस्ती याबाबत आढावा घेतला. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आज झालेल्या या बैठकीला आमदार बालाजी कल्याणकर, राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

        यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, सध्या पावसाळ्याच्या दृष्टीने शहरातील रस्त्यांची कामे महत्वाची आहेत. परिसरातील विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवा त्यानुसार कामे करा. या कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही त्यांनी संबधित विभागांना दिले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *