खटले मागे घेण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा
आजच्या बैठकीत निर्णय
कोल्हापूर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील पक्ष /संघटनांच्या आज मिस् क्लार्क बोर्डिंग येथे झालेल्या बैठकीत सहभागी सर्व पक्ष /संघटनांचे अध्यक्षीय मंडळ स्थापन करुन भिमा कोरेगाव दंगलीच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करणार्या आंबेडकरी चळवळीतील निरपराध कार्यकर्त्यांवर शासनाने सुडबुद्धीने दाखल केलेले खटले मागे घेण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महिला प्रतिनिधी आयु. लताताई नागांवकर या होत्या.
या खटल्यासंदर्भात कायदेशीर मार्गाने प्रयत्न करत असताना राजकीय तसेच जनआंदोलनाच्या माध्यमातूनही कार्यवाही करण्याची भूमिका मांडण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर ही कार्यवाही न झाल्यास दसरा चौकात एक दिवसीय भव्य धरणे आंदोलन व त्यानंतर जिल्हा धिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी लवकरच विभागीय बैठका घेण्याचे ठरले आहे.
आज झालेल्या बैठकीपूर्वी माजी आमदार नानासाहेब माने यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सुरवातीस निमंत्रक विद्याधर कांबळे यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर झालेल्या चर्चेत रमेश जाधव सर, डी जी भास्कर, डी एस डोणे, बाजीराव नाईक,सुभाष देसाई बाळासाहेब भोसले, प्रा अशोक कांबळे, सोमनाथ घोडेराव, रंगराव कामत, गुणवंत नागटिळे, टी एस कांबळे, आप्पासाहेब मोरे, दयानंद म्हेतर, प्रदीप कांबळे, युवराज जाधव, रुपा वायदंडे, उषा गवंडी, यांनी चर्चेत भाग घेतला. सुरेश सावर्डेकर यानी आभार मानले.
या बैठकीस अशोक हातकणंगलेकर, सुरेश कांबळे सर, सु्धाकर विणकरे, अरुण जाधव, आनंदराव जाधव गुरुजी, सखाराम कुरणे शितल करडे सुनिल पोवार, शुभम मधाळे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.