एस.ओ.एस. बेलतरोडीच्या विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक प्रक्रिया संपन्न

एस.ओ.एस. बेलतरोडीच्या विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक प्रक्रिया संपन्न

एस.ओ.एस. बेलतरोडीच्या विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक प्रक्रिया संपन्न

नंददत्त डेकाटे, नागपूर

स्कूल ऑफ स्कालर्स बेलतरोडी नागपूर येथे विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक निर्वाचन प्रक्रिया संपन्न झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय नागदिवे होते. तर त्यांनी नवनियुक्त प्रत्येक विद्यार्थ्यांना बॅच देऊन त्यांचा गौरव केला. यावेळी स्कूल ऑफ स्कालर्सच्या प्राचार्या केतकी शेंद्रे यांनी सर्व विजयी विद्यार्थी उमेदवारांचे कौतुक केले, व त्यांचे अभिनंदन करुन शैक्षणिक वर्षात स्कूल ऑफ स्कालर्स शाळेच्या कामकाजात हे सर्व नवनियुक्त निर्वाचित प्रतिनिधी उत्कृष्ट काम करुन दाखवतील असे मत व्यक्त केले. विद्यार्थी निवडणूक निर्वाचन प्रक्रिया नियुक्तीनंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.

विद्यार्थी निवडणूक निर्वाचन प्रक्रिया पूर्ण गोपनीय पध्दतीने व संतर्कतेने संपन्न झाली. शाळेतील निर्वाचन आयोगाने विद्यार्थ्यांसाठी मतदार यादी व ओळखपत्र तयार केले होते. विद्यार्थ्यांनी आपापला प्रचार व प्रसार पाच दिवस केला. आपल्या आवडत्या प्रतिनिधीला ऑनलाईन पध्दतीने निवड करुन विद्यार्थीनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणूक प्रक्रियेत स्कूल ऑफ स्कालर्सच्या सर्व शिक्षकांनी सुध्दा सहभाग घेऊन व प्रत्येक शिक्षकांनी मतदान केले. निर्वाचित विद्यार्थ्यांमध्ये उपमुख्य विद्यार्थी मास्टर धीर कावळे, उपमुख्य विद्यार्थिनी कुमारी अवनी तिवारी, यांची निवड झाली, व तसेच अन्य निर्वाचित सभासदांचा ही यात समावेश होता. स्कूल ऑफ स्कालर्सचे शिक्षक उत्सव बॅनर्जी, शिक्षिका करुणा गलगले यांनी सर्व प्रक्रिया सुरळीतपणे घडवून आणल्या. तर अपर्णा करणकर व वैदेही धाबू या शिक्षकांचेही सहकार्य लाभले. स्कूल ऑफ स्कालर्सच्या प्राचार्या केतकी शेंद्रे यांच्या मार्गदर्शनात सर्व निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *