सडक्या बुद्धीतील सडके विचार
✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे
repe9nat@gmail.com
ब्राम्हण लोक ब्रम्हदेवाच्या ओकारीपासून झालेले असोत किंवा जुलाबापासून झालेले असोत, त्यांची जन्मजात अशी वाकडी शेपटी असते, की ती तापवलेल्या लाल नळकांडीत घातल्यावाचून करचळणार नाही अस देशाचे दुष्मन या पुस्तकात दिनकरराव जवळकर म्हणतात. ब्राम्हणांच्या डोक्यातून अनेक काल्पनीक कथा रचलेल्या ग्रंथाची व श्लोक मंत्राची नरकनदी ह्या भूतलवार सुसाट वेगाने वाहत असून या वेगाने आमच्या बहुजनातील जो स्वतःला उच्च शिक्षित समजतो तो अल्पबुध्दी तरुण यांच्या बहकाव्यात येऊन त्यांच्या इशा-यावर नाचताना दिसतोय. ह्याला कारणीभुत आहेत ती आजची शिक्षण पद्धती व शिक्षणसंस्था कारण शिक्षणाचा बाजार करणा-या संस्थाचालकांचा मनमानी कारभार सध्या चव्हाट्यावर येताना दिसत आहे. कारण महापुरुषांच नाव असलेल्या शिक्षणसंस्थेत त्याच महापुरुषांचे विचार पायदळी तुडवून भटांचे जोडे उचलण्यात महाविद्यालयाचे प्राचार्य व तेथिल शिक्षक दिसतात तेव्हा अशा बांडगुळांनाच शिक्षणाचे धडे देण्याची गरज आहे असे वाटते. कारण राजर्षी शाहु महाराजांनी वैदीक धर्माच्या विरोधात एल्गार पुकारून त्यांच्या जाचातून बहुजन समाजाला मुक्त करण्यासाठी उभ आयुष्य खर्ची घातल परंतू आज बहुजनातील भटांचे चाट्ये मात्र त्या शाहु महाराजांच कार्य विसरून भट पुरोहीत्यांचे तळवे चाटताना दिसतात ही खुप मोठी शोकांतीका आहे.
लातूर जिल्हा म्हणजे शिक्षणाची पंढरी म्हटल तरी चुकीच ठरणार नाही, कारण शिक्षण क्षेत्रात लातुर पँटर्नने आपली वेगळी ओळख निर्माण केली त्यात आघाडीवर आहे ते शरहाराच्या मध्यवर्ती असलेले राजर्षी शाहु महाविद्यालय. पण ज्या महाविद्यालयामुळे लातूर शहराने शिक्षण क्षेत्रात उंच भरारी घेतली त्याच महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापकांना महापुरुषांच्या विचारांचे धडे द्यावे लागतात की काय ?असा प्रश्न पडतो. कारण त्यांनी काढलेल्या अजब फतव्याने महाविद्यालयाचा गजब कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्याच नेमक झाल अस की, राजर्षी शाहु महाविद्यालय लातूर येथिल संस्कृत विभागामार्फत दि. १४ जूलै २०२२ रोजी एक परिपत्रक काढण्यात आले होते त्यात म्हटल की, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी व इतरांसाठी संस्कृत विभागातर्फे संस्कृत भाषेच्या प्रचार व प्रसाराकरिता संस्कृत भाषेतील मंत्र व श्लोक यांची प्राथमिक माहिती होण्यासाठी ‘पौरोहित्य वर्ग’ हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. यासाठी रू. ३००/- (या फी मध्ये २ पुस्तके दिली जातील) शुल्क आकारले जाईल. या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन महीने असून तासीका फक्त शनिवार व रविवार या दोन दिवशीच प्रत्येकी दोन तास होतील. या अभ्यासक्रमात श्रीरूद्र सृक्त व इतर मंत्र व श्लोक शिकवले जातील. ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी संबंधित प्राध्यापकांशी संपर्क साधावा असे परिपत्रकातून जाहीर केले होते.’ https://youtu.be/T1rjt9tttSY हे परिपत्रक वाचून चळवळीतील लोकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली कारण त्यांनी राजर्षी शाहू महाराज व त्यांची विचारधारा वाचली आहे. संस्कृत भाषा शिकवणे हे चुकीचे नाही कारण ती शिकली तर भटांचे कारनामे सहज लक्षात येतील पण महाविद्यालयाने जो ‘पौरोहित्य वर्ग’ चालवण्याचा घाट बांधला तो सरळसरळ चुकीचा आहे. महाविद्यालयात मंत्र व श्लोक शिकवून महाविद्यालयाच्या प्राचार्यांना आपले विद्यार्थी काय आयोध्येतील राममंदीरात पुजारी म्हणून पाठवायचे आहेत का ?मंदीरांना पुजारी पुरवण्याचे टेंडर प्राचार्यांनी घेतले आहे का ? बहुजन समाजातील मुलांनी जर ते थोतांड शिकल तर त्यांना ही भटी पिलावळ मंदीराचा ताबा तरी देईल का ?पौरोहीत्य वर्गाचे तीन महीन्याचे प्रशिक्षण घेऊनही जर त्या प्रमाणपत्र धारकांना मंदीरात पुजेचा अधिकार दिलाच नाही तर यांची जिम्मेदारी महाविद्यालयाचे प्राचार्य घेणार का ?त्यामुळे महाविद्यालय प्रशासनाने आपल्या सडक्या मेंदूतून निघालेले हे सडके विचार तरुणांवर थोपवू नयेत. प्राचार्यांना जर मंत्रच शिकवायचे असतील तर त्यांनी देवी देवतांनी त्यांची वाहने ज्या मंत्राने हवेत उडवली ते मंत्र तरी शिकवावेत कारण इंधन दरवाढीवर मात करण्यासाठी जर त्या मंत्राचा फायदा झाला तर प्राचार्यांच्या कार्याला जागतीक किर्ती का मिळणार नाही ?’पुरोहीतांनो तुमचे थोतांड ग्रंथ जाळून टाका अन्यथा बहुजन समाज जागा झाला तर तुमच्यासोबत तुमचे काल्पनिक कथा रचलेले धर्मग्रंथ जाळून टाकेल’ असा महात्मा जोतिबा फुले ब्राम्हणांना जाहीर इशारा दिला होता. परंतू आज ह्याच ग्रंथाचा आधार घेऊन जर मंत्र श्लोक शिकवले जाणार असतील तर महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मनुच्या किड्याने डंक दिला आहे असे म्हटले तर काय चुकीचे आहे ? ह्या वैदीक परंपरेला लाथाडणारे शाहू महाराज होते. पण त्यांच्याच नावाने उभारलेल्या महाविद्यालयात हे प्रतीगामी किडे प्रतिगामी बिजे लावण्याचे काम करत असतील तर ह्या प्राचार्याच्या डोक्याला काय रेशिमबागेचा किडा ढसला का ?असे विचारावे वाटते. ह्या दळभद्री महोदयांना उलट शाहू राजांच्या विचारांचे डोस द्यावे लागतील तेव्हा कुठ यांचा माथा ठिकाण्यावर येईल अन्यथा उद्या काकड, भाकड, माकड आरत्याचे ताट घेऊन हे प्राचार्य घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहीन रुप तुझे असे म्हणतील त्यामुळे समाजातून यांना जोरदार विरोध होत आहे.
बुध्द शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांच्या काही संघटनांनी ह्या कृतीचा निषेध केला तेव्हा संभाजी ब्रिगेडचे संघटक संतोष शिंदे म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात घुसलेली संघाची मंडळी सांस्कृतिक दहशतवाद माजवत आहेत. शाहु महाराजांनी वेदोक्त प्रकरण, अंधश्रद्धा, कर्मकांड यांना कडाडून विरोध केला त्यांच्या नावाने असलेल्या महाविद्यालयात पौरोहीत्य वर्ग चालू केले जात आहेत हा शाहु महाराजांच्या विचारांचा खुन आहे. लातुरमध्ये इतकी भटाळलेली व्यवस्था आहे. महाविद्यालयात मंत्र आणि श्लोक म्हणून काय सर्व बहुजनांच्या मुलांना पुजा आर्चा करायला लावायच्या का ?नालायक प्राचार्यांना याची काडीचीही अक्कल नसते ?विचारांनी जिवंत असलेल्या कार्यकर्त्यांनी असल्या प्राचार्याच थोबाड फोडल पाहीजे. ह्यानां लाज वाटली पाहीजे, आहो तुम्ही शाहु महाराजांच्या नावाने महाविद्यालय चालवता. संस्कृत शिकवा पण पौरोहीत्य कशासाठी ? म्हणजे तिथे भट्टारगाडा काढायचा का ?ही भटी व्यवस्था जाणीवपुर्वक विष कालवण्याच काम करते. शाहु महाराजांनी वैदीक धर्माला लाथाडून सर्वांना सोबत घेऊन स्वतःचा मराठा धर्म स्थापन केला. ह्या शाहू महाराजांच नाव घेऊन असे चाळे करून शाहु महाराजांच्या नावाला काळीमा फासण्याच काम जर शाहु महाविद्यालयात केल जात असेल तर गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे. खर तर या प्राचार्यांचं थोबाड काळ केल पाहीजे. उद्या इतर धर्मातील लोकांनी जर त्यांचे धर्माचे शिक्षण सुरू करण्यासाठी आग्रह केला तर त्याला हा दिडदमडीचा नालायक प्राचार्य जिम्मेदार आहे का ?अरे ढेरपोट्यांनो आपण कशाला परवाणगी देतो याची लाज वाटली पाहीजे. हा शाहु महाराजांच्या विचारांचा खून आहे. याचे असले नाटक खपवून घेऊ नका. ही असली शिकलेली हुकलेली जमातच समाजाच्या बोकांडी बसते असे म्हणाले. https://youtu.be/0QiizH2Yaik
बुध्द शिव फुले शाहु आंबेडकर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा समाजात घेऊन जाणा-या संघटनांनी सदरील घटनेला विरोध करताच महाविद्यालय प्रशासनाचा लंगोट पिवळा झाल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी तात्काळ दि. २० जूलै २०२२ रोजी दुसरे परिपत्रक काढून त्यात म्हटले की, संस्कृत भाषेच्या प्रचार व प्रचाराकरिता संस्कृत भाषेतील मंत्र व श्लोक यांची केवळ माहिती होण्यासाठी पौरोहित्य वर्ग हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रस्तावित होते. सदर प्रमाणपत्र अभ्यासक्रम रद्द करण्यात आलेला आहे. प्राचार्यांच्या सहीनीशी जाहीर केले. त्यावेळी राजर्षी शाहु महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी आपली भुमिका मांडताना म्हटले की, संस्कृत विभागाच्या माध्यमातून संस्कृत भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने महाविद्यालयाने हा प्रमाणपत्र कोर्स सुरू केला होता. पण त्यामधला ‘पौराहित्य’ हा शब्द आहे. त्यामुळे अनेकांच्या भावणा दुखावल्या असतील ही भुमिका लक्षात घेऊन महाविद्यालयाने हा कोर्स तात्काळ रद्द केला आहे. महाविद्यालयाची भुमिका ही सातत्याने फुले शाहु आंबेडकर यांचा वारसा चालवणारे हे महाविद्यालय आहे. इथे कधीही अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिल जात नाही. महाविद्यालयाचा प्राजंळ उद्देश होता त्यातून संस्कृत भाषेचा प्रचार व प्रचार व्हावा त्यातून संस्कार वर्ग निर्माण करावेत या भुमिकेमधून हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम आम्ही सुरू केला होता. तरीही काही लोकांच्या भुमिका व मते यांच्यामुळे आम्ही हा कोर्स लागलीच रद्द केला आहे.
ब्राम्हणांनी शाहु महाराजांचा १८९९ ला शुद्र म्हणून अवमान केला होता. कार्तिक महीन्यात शाहु महाराज पंचगंगेत अंघोळ करत असताना नारायण भटजी पुराणोक्त मंत्रोच्चार करत होता त्यावेळी शाहु महाराजांचा राग अनावर झाला. त्यावेळी त्यांनी वैदीक परंपरेला नाकारून क्षात्र जगद्गुरू पीठाची स्थापना करून भटी व्यवस्थेला सुरूंग लावला होता. https://youtu.be/UuGZ4HyFlGg
हे शाहू महाविद्यालयाच्या प्रशासनाला माहीत नसेल तर त्यांच्या बुद्धीची किव येते. महाविद्यालयाला शाहु महाराजाचं नाव देऊन तिथे जर भटी उद्योग चालवले जात असतील तर महाविद्यालय प्रशासन आपल्या बुद्धीची वेश्यागिरी करत आहे ? असे म्हटले तर त्यात चुकते कुठे. प्रतिगामी विचारधारेचे लोक वेळोवेळी संघी शोधत असतात तसेच एकदा दि. २६ जून रोजी देशभरात राजर्षी शाहु महाराज जयंती साजरी होत असतानाच ती कोल्हापुरातील मुस्लिम बोर्डिंगमध्ये मोठ्या उत्सवात पार पडत असताना तिथे अदिल फरास यांनी पादत्राणे घालून फोटो काढले तेव्हा त्यांना विरोध झाल्यामुळे त्यांनी शाहू महाराजांच्या समाधीस्थळावर अनवानी जाऊन आत्मक्लेष अंदोलन केले होते. पण देशभक्तीची प्रमाणपत्रे वाटणा-या काही भडव्यांनी फरास यांनी शाहू महाराजांचे समाधीस्थळ अपवित्र केले म्हणून ते गोमुत्र व पंचगंगेच्या पाण्याने साफ करून शुद्ध केले होते. त्यावेळी सामाजिक संघटनांनी या घटनेचा निषेध केला होता.(भट बोकड मोठा पान नं. २६) शाहु महाराजांचा अवमान केला म्हणून गोमुत्राने परिसर स्वच्छ करणारे भडवे आता कुठे गांजा फुकत बसले आहेत. त्यांना राजर्षी शाहु महाविद्यालय लातूर येथिल प्रशासनाने चालवलेला खेळ माहीत नाही का ? ते प्राचार्याच्या डोक्यावर गोमुत्राची धार सोडून शाहु काँलेजच शुध्दीकरण कधी करणार आहेत ?.
त्यामुळे बहुजन समाजाला सागावं वाटत की, शाळा महाविद्यालय जरी बहुजन व्यक्तीच्या नावाने स्थापन केलेली असली तरी त्यात जे अध्यापक आहेत ते जवळपास सर्वच भटाळलेले आहेत ?ह्यांच्या मेंदूला रेशिमबागेचा किडा ढसलेला असल्यामुळे त्यांचा संसर्ग ते नवतरुणांना करत आहेत. त्यामुळे पाल्यांनी वेळीच सावध झाल पाहीजे आणि ह्या रेशिम किड्यावर फुले शाहु आंबेडकरी विचारांची लस ठासून ह्या संसर्गाचा नायनाट करावा लागेल. अन्यथा शिक्षणाने मुलांचा सत्यानाश झाला अस म्हणण्याची वेळ येईल त्यामुळे वेळीच सावध व्हा.