बहुजन समाजाला मोतिबिंदू झाला का ?

बहुजन समाजाला मोतिबिंदू झाला का ?

बहुजन समाजाला मोतिबिंदू झाला का ?

✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे
भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक
मो. ९७६२६३६६६२

आमचा बहुसंख्य बहुजन समाज षढं आणि थंड होऊन निद्रीत अवस्थेत पडला का ?कारण दिल्लीत जंतरमंतर वर दिवसा भारतीय संविधानाची होळी होत असताना संतप्त न होणारा हा बहुजन समाज भटी मानसिकतेची मनुस्मृती डोक्यात घेऊन फिरतो का ?जे संविधान सर्वांना समान हक्क अधिकार देते, तेच संविधान जर पेटवून दिल जात असेल आणि त्याकडे हा बहुजन समाज केवळ बघ्याची भुमिका घेत असेल तर खरच हा समाज नपुसंक झाला आहे का ?कारण आपले हक्क अधिकार राष्ट्रीय संपत्ती डोळ्यादेखत नष्ट केली जात असेल तर त्याविरोधात जनमत तयार झाल पाहीजे, पण ते आज तरी होताना दिसत नाही. म्हणून ह्या निकर घालून एकमेकांच्या पप्या घेणा-या औलादींनी काल राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ विक्राळ करून त्याची नासधूस केली. तेव्हा १३० कोटी जनतेच्या देशात केवळ बामसेफ, मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड तसेच काही पुरोगामी संघटनांनी त्याला विरोध केला. मग प्रश्न पडतो की, इतर वेळी संविधानाचा जयघोष करणा-या संघटना, पक्ष व त्यांचे पक्षप्रमुख कुठे आणि कोणाच गाजर गवत उपटत होते ?हे फक्त सत्तेचा मलीदा खाण्यासाठीच पुढे असतात का ?आज देशाला स्वतंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली. त्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे, तो काय संघाच्या मोदीमुळे नव्हे, तर देशातील प्रत्येक देशवासियाला आपल्या देशाप्रती अभिमान आहे. पण ज्यांनी मागील ५२ वर्ष या देशात राहुन देशाप्रती आपले प्रेम व्यक्त करू शकले नाहीत. ते संघाच्या चाळीत निकर परिधान करून इव्हीएमच्या माध्यमातून लहानाचे मोठे झालेले निकरपट्टू मात्र आज हर घर तिरंगा म्हणत गुजरातच्या हाती तिरंगा छपाईच कंत्राट देतात. ज्यांनी आजपर्यत देशाचा सत्यानाश करण्यात आपला सिंहाचा वाटा दाखवला आहे, त्या विघ्नसंतोषी लोकांनी आज जरी वरवर राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्याचे ठरवले असले तरी मात्र त्यांच्या हातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अवमानच होत आहे. पण हा त्यांनी केलेला अपमान एखाद्या मोतिबिंदु झालेल्या व्यक्तीला सहज दिसतो पण संघी निकरवाल्या भक्तांना का दिसत नाही ?
हर घर तिरंगा ध्वज लावला जावा अस संघाचे बुजगावणे नरेंद्र मोदींनी जाहीर आवाहन केले, पण त्यासाठी लागणारे ध्वज तयार करण्याच कंत्राट गुजरात मधील एका कंपनीला दिल. गुजरात माँडेलचा डंका जरी वाजवला जात असला तरी हे गुजराती माँडेल केवळ पाण्यात पाद सोडलेल्या बुडबुडीप्रमाणे आहे ? २०१४ च्या लोकसभा निकालानंतर प्रत्येकाने याचा अनुभव घेतला आहे. कारण छपाई केलेल्या ध्वजाचा अवमान करून परत एकदा हे गुजराती माँडेल फसव आहे हे स्पष्ट होत. त्यांनी छपाई केलेले ध्वज एकसारखे नसून त्यात अनेक त्रुटी आहेत. तसेच ध्वजाच्या मधोमध असलेले अशोक चक्र हे मधोमध न छापता जमेल तसे छपाई केले आहे. यातून पुन्हा एकदा स्पष्ट दिसत की, ध्वजाचा अवमान करणारे हे रामदासी देशविरोधी देशद्रोही नाहीतर कोण आहेत ?पण त्यांचा हा गुन्हा केवळ मोजक्याच लोकांना दिसतो, कारण बाकी भक्त मोतिबिंदूने ग्रस्त आहेत. त्यांना प्रदीप जोशींच्या गुलाबी ओठांशिवाय दिसत तरी काय ?म्हणून तर म्हणाव वाटत की, आँखे हर किसी को होती हैं, मगर नजर हर किसी को नहीं होती !.
गुजरात राज्यातील अमुल दुध या कंपनीने दुधाच्या पाकीटावर तिरंगा ध्वज छपाई करून स्वात़ंत्र्याचा अमृत महोत्सव असे लिहले. हे चित्र पाहून तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही. कारण ती दुधाची पिशवी रिकामी झाल्यास कच-यात फेकली जाणार नाही का ?मग याची पुर्वकल्पना अमुल दूध कंपनीच्या प्रशासकीय मंडळाच्या लक्षात का आली नाही ?एकीकडे अमूल दूध हे ध्वजाचा सन्मान करण्याच्या नावाखाली अवमान करते. त्यामुळे अमूल दुधला देशप्रेम काय असत हे शिकण्याची वेळ आली अस वाटत. कारण हीच कंपनी ‘अमुल दुध पिता हैं इंडिया’ ची जाहीरात करत कोट्यावधी रुपयांची माया जमा करते. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने ह्या कंपनीच्या उत्पादनावर बहिष्कार टाकणे हीच खरी देशभक्ती असून ती दाखवण्याची वेळ आली आहे. कारण हे दुध पाकीट फाडून त्यातील दूध काढून घेतल्यास ते पाकीट कचरा कुंडीत गेल्यास त्यावर असणारा तिरंगा ध्वज कुठे जाईल याचं उत्तर हर घर तिरंगा म्हणून बोंब ठोकरणारे निकरधारी देतील का ?गुजरातच्या मातीतून निघालेल्या भंगार पैदाईशी ह्या विघ्नसंतोषीच आहेत यात तिळमात्र शंका नाही. कारण बलात्काराच्या प्रकरणात जेलमध्ये सडत असलेला आसाराम व नारायण साई तसेच मद्याचे प्याले आपल्या घशात ओढणारा राम गणेश गडकरीने नाटकाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली हा गडकरी पण गुजरातीच होता. महाराष्ट्राला बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवून त्याला लागणारी रक्कम महाराष्ट्राच्या तिजोरीतून हडप लुटणारे गुजराती नाहीतर कोण आहेत ?अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जेव्हा गुजरातच्या दौ-यावर होते तेव्हा तिथे गरीबी झाकण्यासाठी ह्याच गुजरातच्या मेंदूतून भिंत उभारण्याची आयडीया आली होती. राष्ट्रध्वजाचा अवमान करणारा व देशातील सरकारी साधनसंपत्ती विकणारा विक्तुबाबा गुजरातीच आहे हा निव्वळ योगायोग समाजावा का ?
शिक्षणाने भलेही तुम्हाला पद पैसा मिळेल पण सदसद्विवेक बुध्दी येईलच हे सांगता येत नाही. कारण उच्च पदावर बसलेले औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या डोक्यात शेणकुडाचा भरणा आहे अस जर कोणी आडाणी माणूस म्हटला तर त्याच कुठे चुकणार आहे ?कारण हर घर तिरंगा च्या नावाखाली फसवी देशभक्ती दाखवताना खरा देशद्रोही उघडा नागडा होत आहे. त्याचे झाल अस की, एका सार्वजनिक कार्यक्रमात तिरंगा ध्वज लावला खरा पण त्यात अशोक चक्र हे कोणत्याही डोळे असलेल्या व्यक्तीला दिसत नव्हत कारण त्यावर ते छापलच नव्हत, हीच खुप मोठी शोकांतिका आहे. तो ध्वज हा अशोक चक्र विरहीत होता हे जर जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांना दिसल नसेल तर त्यांच्या डोळ्याला रेशिमबागेचा विषाणू चावला आहे असच म्हणाव लागेल. वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने तिरंगा बाईक रँली काढण्यात आली होती, त्याठिकाणी शासकीय सेवेतील कर्मचा-यांनी तिरंगा पायदळी घेऊन अवमान केला, हे फोटोत स्पष्ट दिसत. हे नितेश कराळे यांनी राष्ट्रध्वजाची अवहेलना म्हणत आपल्या फेसबुक वर शेअर केल आहे. प्रशासनच जर ध्वजाचा असा अवमान करणार असेल तर यांना शासकीय सेवेत राहण्याचा अधिकार आहे का ?ध्वजचा अवमान करणा-या जिल्हाधिकारी यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून यांची रवाणगी चार भिंतीच्या आत जेलमध्ये करून यांना निलंबीत करायला काय आडचण आहे ?२०१४ पुर्वी जतंरमंतर येथे मुक्कामी राहुन गांधीवादाचा आव आणणारे काही भामटे मात्र ध्वजाचा अवमान होत असताना त्याचा निषेध करताना कुठेच दिसत नाहीत म्हणून तर म्हणाव वाटत की, धोतराआड निकर घातलेल्या आण्णांची झोप झाली असेल तर त्यांना कोणीतरी सांगा, राष्ट्रीय चिन्ह व राष्ट्रीय ध्वज कलंकीत केला जात आहे.
यापुर्वीही एका ठिकाणी भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रामात ह्या रामदासी मानसिकतेच्या विकृतींनी भाजपाचा ध्वज फडकवून त्याठिकाणी राष्ट्रगीत वाजवले हा राष्ट्रगीताचा अवमान आहे. याच मानसिकतेचे सावरकर गोळवळकर व शामाप्रसाद मुखर्जी यांनी तीन रंग अपशकुन असतात म्हणून तो ध्वज नाकारला होता. त्यांच्याच लाळेंने प्रेरित झालेले आजचे सत्तेतील संघी आहेत. मात्र यांना आज कस काय अचानक तिरंगा ध्वजाविषयी आपुलकी वाटु लागली हे तर परशुरामच जाणो. पण या निकर परिधान केलेल्या संघ्याकडून देशहिताचे निर्णय, राष्ट्रीय ध्वज व चिन्हाच्या सन्मानांची अपेक्षा करणे म्हणजे वांझोट्या म्हशीच दुध काढण्यासारख आहे अस म्हटल तर काय चुकीच ठरणार आहे ?कारण प्रत्येक व्यक्ती हा राष्ट्रध्वजाचा सन्मान करत आलेलाच आहे त्यांना कोणी आजपर्यत मनाची खोटी बात ऐकवली नाही. मात्र यंदा मोदींनी वारंवार मनाची खोटी बात सांगून ध्वज लावण्याच आवाहण करून कोट्यावधींचा मलीदा गुजराती भांडवलदाराच्या पदारात पाडून देशभक्त असल्याच सिध्द करून दाखवण्याचा प्रयत्न केला खरा पण तो राष्ट्र ध्वजाचा बाजार मांडून मोदींनी देशभक्ती नव्हे तर दुकानदारी करत देशद्रोही असल्याचा एक सबळ पुरावा सादर केला. पण झोपेच सोंग घेऊन पडलेल्या जनतेला पुरावेच काय लाथा घालून उठवल तरी ते उठणार नाहीत हे मात्र निश्चित. त्यामुळे त्यांचे अंधभक्तही विना अशोक चक्राचा ध्वज मिरवताना दिसतात. त्यामुळे बहुजन समाजाला सांगाव वाटत की, संघ शाखेत पोसलेल्या विषारी सर्पाच जर तोंड ठेचायच असेल तर आधी बहुजन समाजाची एक काठी तयार करा. कारण हीच विचारांची काठी जेव्हा ह्या संघी सर्पाच्या थोबाडावर बसेल तेव्हा हा सर्प विषारी फुत्कार टाकणे सोडून देईल अन्यथा बहुजनातील रामदासी त्याचं विष पसरवत आहेत.
राष्ट्रगीत व राष्ट्र ध्वजचा अवमान केलेल्या व्यक्तीला सजा होऊ शकते. ‘द प्रिव्हेशन आँफ इंसल्टस टू नँशनल आँनर अँक्ट १९७१’ या कायद्यानूसार संबंधीत व्यक्तीवर पोलिसात गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच या कायद्यातंर्गत दोषींना तीन वर्षापर्यंत तुरूंगवास, दंड किंवा अशा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. त्यामुळे संबंधीत जिल्ह्यात जर कोणी ध्वज व राष्ट्रगीताचा अवमान केला तर त्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत पण ज्यांनी आजच अवमान केला त्या अमुल दूध, ध्वज छपाई करणारा गुजराती कंत्राटदार, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व त्यांचे समर्थक तसेच ध्वजावरून अशोक चक्र हटवणारे संघ समर्थक यांच्यावर सरकार वरील कायद्यातंर्गत गुन्हे दाखल करून त्यांना जर शिक्षा दिली जाणार नसेल तर यांना नारिकांनी पायतानाचे फटके द्यायला सुरूवात केल्यास कायदा हातात घेतला म्हणून बोंब ठोकू नये. म्हणून शेवटी म्हणाव वाटत की, केंद्र सरकारने राबवलेल्या हर घर तिरंगा मुळे देशात अनेक ठिकाणी राष्ट्रीय ध्वजाचा अवमान व अपमान होत आहे, पण या घटनेचा राळेगण सिध्दी येथिल धोतरातील जेम्स बाँड निषेध करताना का दिसत नाही ?

भट बोकड मोठा घरपोहोच मिळवण्यासाठी
संपर्क – रुक्माई प्रकाशन, बीड
मो. ९७६२६३६६६२

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *