साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना “भारतरत्न” देण्याची खासदार धैर्यशील माने यांची मागणी बद्दल सत्कार समस्त मातंग समाजात चैतन्य*
इचलकरंजी :- लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर ” भारतरत्न ” किताब केंद्रसरकरने द्यावा अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी लोकसभेत केली, या महत्वपूर्ण मागणिबाबत रवी रजपुते सोशल फौंडेशन तर्फे खासदार माने यांचा समस्त मातंग समाज व रवी रजपुते यांच्या वतीने सत्कार करण्यात आला, वडगाव येथे आयोजित कार्यक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा भेट देऊन व शाल श्रीफळ देऊन रवी रजपुते यांनी खासदार धैर्यशील माने यांचे अभिनंदन केले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी प्रतिकूल परिस्थिवर मात करून साहित्य क्षेत्रात मोठी कामगिरी केली,संयुक्त महाराष्ट्रातच्या लढ्यातही अण्णा भाऊंचे मोठे योगदान होते, त्यांना “भारतरत्न” देण्याची खासदार माने यांनी केलेली मागणी अत्यंत महत्वाची व कौतुकास्पद असल्याची भावना सत्काराच्या वेळी रवी रजपुते यांनी व्यक्त केली, यावेळी मा,नगरसेवक रवींद्र माने,मा, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, मा, नगरसेवक भाऊसो आवळे, मा, नगरसेवक दिलप मुथा, सूरज निंबाळकर, राज जगताप, हनोक कांबळे,शीतल हेगडे,दादू हेगडे, पीटर आवळे, उद्धव निंबाळकर, आकाश हेगडे,झाकीर जमादार,रोहित रजपुते, जयवंत चव्हाण,युवराज केर्ले व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते,
▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
Posted inकोल्हापूर
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना “भारतरत्न” देण्याची खासदार धैर्यशील माने यांची मागणी बद्दल सत्कार समस्त मातंग समाजात चैतन्य*
