घर घर तिरंगा..
शाळेतही उत्साहाने साजरा !

संपुर्ण भारत देशात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत आहे. शहरातील घरांवर शनिवार सकाळपासून राष्ट्रध्वज डौलाने फडकत होता. आबालवृद्धांच्या चेहर्यावर स्वातंत्र्य दिनाचा अपार उत्साह पाहायला मिळत आहे.
अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचा उत्साह शिगेला पोचला आहे. केंद्र सरकारने १३ ते १५ ऑगस्टदरम्यान देशवासियांनी आपापल्या घरी राष्ट्रध्वज उभारून देशप्रेम व्यक्त केले.
राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये 13 आँगस्ट ते 17 आँगस्ट या कालावधीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. व या कार्यक्रमाचा मुख्य कार्यक्रम म्हणजे 15 आँगस्ट रोजीचा ध्वजारोहण कार्यक्रम. मुंबईतील अंधेरी येथील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल या निवासी शाळेत स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव कार्यक्रम मोठय़ा उत्साहाने व आनंदाने साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थी मंत्रीमंडळाची स्थापना या दिवशी करण्यात आली. या प्रसंगी देशभक्तीपर गीते, एकांकिका भाषणे विद्यार्थ्यांनी सादर केली.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. गोविंदराजन श्रीनिवासन सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. क्रीडा शिक्षक विजय अवसरमोल सरांनी विद्यार्थी मंत्रीमंडळ प्रतिनिधी शपथविधी व संचालन याचे उत्कृष्ट नियोजन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन धरणी बारोट मँडम यांनी केले.