भारतीय स्वातंत्र्याचा ७५ व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव वर्षानिमित्य आज दि.15 ऑगस्ट 2022 रोजी ग्रामपंचायत प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला सदर कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्तावना उपसरपंच श्री. सुधीर पाटील यांनी केले. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाचे फोटो पूजन श्री. दैनिक महान कार्यचे वार्ताहर श्री. अजित लटके व ग्रा.प.सदस्य श्री. सहिफ मुजावर यांच्या हस्ते झाले.तसेच ध्वजस्तंभाचे पूजन व श्रीफळ ग्रामविकास अधिकारी श्री.जी.डी.आदलिंग यांनी केले, तसेच ध्वजारोहण कबनुर गावचे प्रथम नागरी सौ. शोभा पोवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर राष्ट्रगीत, झेंडा गीत झालेनंतर भारतीय संविधानाचे वाचन सरपंच सौ. शोभा पोवार यानी केले सदर कार्यक्रमास दे.भ.रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सह. साखर कारखानाचे संचालक श्री.प्रमोद पाटील, जवहार बँकेचे संचालक श्री.बबन केटकाळे, दि.आजरा अर्बन बँकेचे संचालक श्री.अशोक पाटील, ग्रा.प. सदस्य,सदस्या, गावचे मंडल अधिकारी जेरॉन गोन्सालवीस, गावकामगार तलाठी श्री.एस.डी.पाटील, माजी प.स.सदस्य श्री.जयकुमार काडाप्पा, माजी प.स.सभापती सौ.रेश्मा सनदी, माजी.ग्रा.प. उपसरपंच शंकर उर्फ जंबा पाटील, माजी ग्रा.प.सदस्य श्री.पापालाल सनदी, कार्यकर्ते श्री. शिवानंद स्वामी, श्री. संजय कट्टी, शंकर पोवार, श्री. बी.जी.देशमुख, श्री.रायबा कामत, श्री. गैबी मुजावर, खंडेराव परिट, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील ग्रामस्थ ,कुमार व कन्या विद्या मंदिरचे विद्यार्थी होते. तसेच सर्वांचे आभार सरपंच सौ. शोभा पोवार यांनी मानले.
Posted inकोल्हापूर
भारतीय स्वातंत्र्याचा ७५ व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव : कबनूर ग्रामपंचायत प्रांगणात ध्वजारोहण
