स्वातंत्र्याचे अमृत कोणी चाखले ?
✍️नवनाथ दत्तात्रय रेपे
भट बोकड मोठा पुस्तकाचे लेखक
मो. ९७६२६३६६६२
ये आझादी झुटी हैं,
देश की जनता भुकी है !
ही आण्णाभाऊनी दिलेली घोषणा जेव्हा केव्हाही आठवते तेव्हा खरच आपण स्वातंत्र्य झालोत का असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. कारण १५ आँगस्ट १९४७ रोजी देश स्वातंत्र्य झाल्याचा डांगोरा पिटून आंनदोत्सव साजरा केला जात होता, पण हे स्वातंत्र्य येथिल बहूजन समाजाला मिळाल आहे का ?कारण इंग्रज इथे येण्यापुर्वीच हा बहुजन समाज वर्णवर्चस्ववादी भटी व्यवस्थेचा गुलाम होता. त्यामुळे ही भटी व्यवस्था इंग्रजांनी गुलाम केली, म्हणजे बहुजन समाज हा गुलामांचा गुलाम म्हणजे डब्बल गुलाम झाला. जेव्हा इंग्रज भारत सोडुन गेले तेव्हा त्यांनी सरसकट स्वातंत्र्य न देता केवळ त्यांनी ब्राम्हणांना स्वातंत्र्य दिल. पण येथे भटी व्यवस्थेने जी वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था लादून ठेवली होती ती इंग्रज सरकारच्या जाण्याने नष्ट झाली नाही. त्यामुळे उघड होत की, इंग्रज देश सोडून गेलेल्या स्वातंत्र्यामुळे केवळ विदेशी ब्राम्हण स्वातंत्र्य झाले. पण भारत देशातील बहुजन समाज तसात ब्राम्हणांचा गुलाम राहीला. त्यामुळे १६ आँगस्ट १९४७ रोजी आण्णाभाऊंनी भर पावसात २० हजार लोकांचा मोर्चा मुंबई येथिल आझाद मैदानावर काढला होता, त्यावेळी त्यांनी जे उद्गार काढले होते ते आजही लागू होतात. कारण ह्या खोट्या स्वातंत्र्याने केवळ सत्ताधीस बदलले आहेत अस म्हटल तर काहीच चुकीच नाही. कारण इथे खरच लोकांना स्वातंत्र्य आहे का ?तर मुळीच नाही. कारण लोकांच्या मुलभूत गरजांची पुर्तता मागिल ७५ वर्षात करू न शकणारे लोक इव्हीएमच्या माध्यमातून सत्तेवर येऊन हुकुमशाही व्यवस्थेला मुजरे करतात, तेच लोक आज जेव्हा आम्हाला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करा म्हणतात तेव्हा मनात प्रश्न येतो की, आम्हाला ह्या स्वातंत्र्यानं काय दिल ?येथे विचार मांडले जात असताना भरदिवसा मुडदे पाडले जातात मग काय म्हणून आम्ही न मिळालेल्या स्वातंत्र्याच्या नावाखाली त्या उत्सवाने भरलेले अमृताचे माठ फोडावेत ?ज्यांना या सत्ता हस्तांतरण दिनाचा फायदा झाला त्यांनीच अमृत चाखले आहे.
आधुनिक भारतातील स्वातंत्र्याची दोन आंदोलने या पुस्तकात आपले मत व्यक्त करताना आर.डी. ओहोळ म्हणतात की, मला नेहमीच एक प्रश्न सतावित होता तो म्हणजे १५ आँगस्ट १९४७ ला सर्वच भारतीय स्वतंत्र होते तर मग भारतात एवढी विषमता, भेदभाव, गैरबरोबरी का ? एक श्रीमंत तर एक गरिब, एक तुपाशी तर एक उपाशी का ?एक रईस तर भिकारी का ? आजही खेड्यापाड्यातील लोक इंग्रजांचे राज्य बरे होते असे का म्हणतात ?…. अमर्त्य सेन यांच्या मतानुसार ज्यावेळी जगाचे उत्पन्न १०० रुपये होते. त्यावेळी भारताचे उत्पन्न ३१ रुपये होते. आज तोच भारत कर्जबाजारी का ?… शेतक-याला बायकोला साडी घ्यायला उसनवार करावी लागते आणि मुकेश अंबानी आपल्या बायकोला ३५०० कोटीचे हेलीकाँप्टर वाढदिवसाला भेट देतो हे कसे ?आज मूलनिवासी बहुजन समाजातील ८३ टक्के लोकांचे दरडोई उत्पन्न ६ ते २० रुपये आहे. १२.५ कोटी युवक बेरोजगार आहेत. १६ कोटी लोक झोपडपट्टीत राहतात. ७.५. कोटी बालके गिरणी कामगार आहेत. २५ टक्के लोकांना प्यायला शुध्द पाणी मिळत नसून महीलाही सुरक्षित नाहीत. ३० लाख लोक भीक मागतात तसे करणा-यात व्यापारी, पुजारी, पुढारी आणि कर्मचारी नाहीत फक्त शेतकरी, कष्टकरी, कामकरीच आहेत मग आम्ही स्वतंत्र कसे ?
बहुजन समाजाला येथिल वर्णव्यस्थेच्या हस्तकांनी गुलाम केले होते. नंतर येथे इंग्रज आले तेव्हा त्यांनी येथिल जो सत्ताधीस आहे त्याला गुलाम केले म्हणजेच पुर्वीच भटी व्यवस्थेचा गुलाम असलेला बहुजन समाज गुलालांचा गुलाम डब्बल गलाम झाला होता. पण इंग्रजांच्या काळात सैनिक भरतील शुद्राती शुद्रांना संधी होती, महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या शाळांना इंग्रज सरकार आर्थिक सहाय्य करत होते मग त्यातून बहुजन समाज सुशिक्षित होत होता. याचीच कळ येथिल ब्राम्हणी व्यवस्थेला सहन होत नव्हती. कारण येथिल मनुच्या वर्णव्यवस्थेने शुद्र अतिशुद्रांना शिक्षणबंदी केली होती. परंतू इंग्रजांच्या राजवटीत शुद्र अतिशुद्र शिक्षणाचे धडे गिरवू लागला होता. पण ह्या भटी व्यवस्थेने अशी काही मेख मारून ठेवली की, त्यांनी लिखाणात लिहून ठेवल की इंग्रज आपला शत्रु आहे, तोच पक्का समज येथिल बहुजन समाजाचा झाला पण खरेच इंग्रज आपले दुश्मन होते का ?या प्रश्नांचे उत्तरे शोधण्यासाठी ओहोळ डी.आर. हे काही प्रश्न करताना ते म्हणतात की, काय वर्णव्यवस्था, चातुर्वणर्य, जातिव्यवस्था अस्पृश्यता इंग्रजांनी निर्माण केली का ?महीलांना इंग्रजांनी गुलाम बनविले का ?छत्रपती शिवाजी महाराजांना शुद्र म्हणून राज्याभिषेक काय इंग्रजांनी नाकारला होता का ? तुकोबांना काय इंग्रजांनी अवमानित करून त्यांची गाथा पाण्यात बुडवली ?तुकोबांची हत्या करून काय त्यांना काल्पनिक विमानाने इंग्रजांनी वैकुंठाला पाठविले ? काय राजर्षी शाहु महाराजांना वेदोक्त मंत्राचा अधिकार इंग्रजांनी नाकारला ?राष्ट्रपिता जोतिबा फुलेंना काय इंग्रजांनी वरातीतून अवमानित करून हाकलून दिले ?काय राष्ट्रमाता सावित्रीमाई फुलेवर चिखल, दगड व शेणाचे गोळे काय इंग्रजांनी मारले ? अस्पृश्यांच्या कमरेला झाडू आणि तोंडाला मडके काय इंग्रजांनी बांधले ?त्यामुळे आपला खरा दुश्मन हा वेगळा होता हे बहूजन समाजाने समजून घेतले पाहीजे. कारण जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज आपला इतिहास कधीच घडवू शकत नाही अस डाँ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. कारण सत्ता हस्तांतरण दिनाच्या एक दिवस आधी एका बहुजन समाजातील विद्यार्थ्यांने पिण्याच्या पाण्याला स्पर्श केल्यामुळे शिक्षकांनी त्याला बेदम मारहाण केली त्यातच त्यांचा मृत्यू झाला. (सामना १४ आॅगस्ट २२) आजही जर आमच्या हाताने निर्जीव मडके आणि त्यातील पाणी विटाळले जात असेल आम्ही काय म्हणून या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे ढोल बडवत बसावे ?
युरेशियन ब्राम्हणांनी येथे जातीव्यवस्थेची पाळेमुळे घट्ट रोवली व त्यातून ते उच्चवर्णीय राहीले. मग त्यांनी इतर जातीची साखळी निर्माण करून त्या लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण केला की, मी यांच्यापेक्षा वरच्या वर्गातला आहे. यामुळे झाल अस की, या जाती व्यवस्थेच्या चिखालात ज्यांचे पाय रुतलेत तो प्रत्येकजण मी कोणाच्या पेक्षा तरी नीच जातीतला आहे, हे तो विसरून गेल्यामुळे ह्याच्यापेक्षा मी श्रेष्ट आहे. असाच विचार तो करू लागला, त्यामुळे ब्राम्हणी वर्चस्व अबाधित राहीले. पण सर्वात प्रथम ह्या ब्राम्हणी व्यवस्थेला हादरा देण्याच काम पुण्याच्या मातीत महात्मा जोतिबा फुलेंनी केल. कारण शुद्रांना शिक्षणाचा अधिकार नाही, अस ब्राम्हणी धर्मशास्त्र म्हणतात. त्या धर्मशास्त्राची शेकोटी पेटवून फुलेंनी १८४८ ला पहीली मुलींची शाळा सुरू केली. त्यात इयत्ता ३ रीत शिकणारी मुक्ता साळवे नावाची मुलगी आपल्या निबंधात आमचा धर्म कोणता आहे ?असा प्रश्न करून तिने ब्राम्हणांच्या थोबाडावर पायतानाचा फटका मारला, यालाच तर शिक्षण म्हणतात. नाहीतर हल्लीच्या शिक्षणात ‘शि’ क्षण म्हणजे क्षणभंगूर झाल आहे. कारण आजच्या शिक्षणातून रेशिमबाग व सदाशिव पेठेतील भटुर्ड्यांनी केवळ ब्राम्हणी विचारांचा मारा केला आहे. त्यामुळे आमच्या पीएचडी झालेल्यांची मती खुंटली पण यावर एकमात्र लस ती म्हणजे फुले शाहु आंबेकरांचे विचार आहेत. देशाला स्वातंत्र मिळून आज ७५ वर्ष पुर्ण झाली ती केवळ कागदावरच, कारण या स्वातंत्र्याच फलीत सामान्यांना तर भेटल नाहीच पण माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उद्धव ठाकरे या़ंना तरी भेटल का ?का तर यांना मंदीर प्रवेश नाकारला होता. मग हाच जर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असेल तर अवघड आहे. कारण इथे खर बोलण्या लिहण्यावर निर्बंध लादून त्यांंना गोळ्या घालून संपवल जात, पण जो मन की बात मधून सर्रासपणे खोट बोलतो त्याला मात्र गोळ्या न घालता डोक्यावर घेतल जात. यालाच हे स्वातंत्र्य दिन म्हणत असतील तर तो आमच्यासाठी नसून विदेशी ब्राम्हण व त्यांच्या हस्ताकांसाठीचा स्वातंत्र्य दिन आहे व आमच्या साठीचा केवळ सत्ता हस्तांतरण दिन आहे, अस म्हटल तरी चुकीच ठरणार नाही.
इंग्रज सरकार महात्मा फुलेंच्या शाळांना आर्थिक सहाय्य करत होते, हे विदेशी भटांना सहन होत नव्हते. त्यात इंग्रजांच्या इस्ट इंडिया कंपनीचा जो ‘कंपनी अँक्ट’ होता त्यानुसार त्यांनी इ.स.१७७४ ला नंदकुमार देव या युरेशियन ब्राम्हणास फाशी दिली, भारतीय इतिहासात युरेशियन ब्राम्हणाला फाशी द्यायची ही पहीलीच वेळ होती. हे पाहून येथिल इंग्रजांनचा गुलाम असलेला युरेशियन ब्राम्हण खवळला, तेव्हा त्यांनी इंग्रज भारतातून गेले पाहीजेत ही भुमिका घेतली. कारण हे इंग्रज इथे राहीले तर ते गुन्हेगारी ब्राम्हणांना अशाच शिक्षा देतील ही भिती युरेशियन ब्राम्हणांना वाटू लागली. कारण गुन्हा केलेल्या ब्राम्हणांची केवळ शेंडी कापायची अस मनुस्मृती सांगते मात्र इंग्रजांनी हा कायदा मोडून ब्राम्हण थेट फाशीला लटकवला होता. तर इंग्रजांनी दुसरे म्हणजे इ.स. १८५४ ला भारतात कलकत्ता, मद्रास व मुंबई येथे असे तीन विश्वविद्यालयांची स्थापना केली हे पाहून ब्राम्हणांनी इंग्रजांचे अभिनंदन करायला पाहीजे होते. पण झाल उलटच कारण बहुजनांना शिक्षणाचा अधिकार नाकारणा-या ब्राम्हणांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. (अधिक माहीतीसाठी वाचा आधुनिक भारतातील स्वातंत्र्याची दोन आंदोलने)
आमच्या बहुजन समाजाला १८५७ चा सशस्र उठाव हा रंगवून सांगितला पण याला ‘बहादूरशाहा जाफरचे बंड’ म्हटले पाहीजे असे डी.आर. ओहोळ म्हणतात तर महात्मा जोतिबा फुले या बंडाला ‘भटापांड्याचे बंड’ असे म्हणतात. तर तात्या टोपे या उठावातून फरार झाल्यानंतर कुठे प्रकट झाले हे विलास खरात यांनी नेमके कोण ?या संशोधन लेखात मांडले आहे. आज जे तुम्ही आम्ही स्वातंत्र्याच्या गप्पा मारता त्या केवळ वायफळ गप्पा आहेत ?अस जर कोण म्हटल तर त्याचे चुकते कुठे ?कारण गोविंद पानसरे, गौरी लंकेस, कलबुर्गी यांच्यासह जस्टीस लोहीया, माजी मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या दिवसाढवळ्या हत्या होऊनही त्यांच्या मृत्यू प्रकरणाची साधी चौकशी होत नाही, तर मग या स्वातंत्र्यान आमच्या हाती दिल काय ?काल परवा पुणे मुंबई हायवे वर रात्री मराठा समाजाचे नेते आ. विनायक मेटेंच्या गाडीचा अपघात झाला तेव्हा चालकाने जर १०० नंबर डायल केल्यावर काँल घेतला जात नसेल, एक तासाने जर अँब्युलन्स घटनास्थळी पोहोचत असेल तर आम्ही काय म्हणून हे आमच स्वातंत्र्य आहे म्हणाव ?आज बहूजन समाजातील नेत्यांची जर ही हालत असेल तर सामान्याचं काय ?याचा विचार स्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे लोक करतील तेव्हा आण्णाभाऊ डोळ्यासमोर नक्कीच उभे राहतील, नाहीतर आज भक्तांच्या डोळ्यांसमोर केवळ समलैगिक बैलजोड नथु विणू, आसाराम, नथुराम, रामरहीम, प्रदीप जोशी अन् चौकीदार यांच्या व्यतिरिक्त येत तरी कोण ?
भट बोकड मोठा हे पुस्तक घरपोहोच मिळेल
संपर्क – रुक्माई प्रकाशन, बीड
मो. ९७६२६३६६६२