दत्तवाड येथील नरभक्षक हिंस्त्र कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा – संतोष आठवले
जिल्हा पशूसंवर्धन उपआयुक्त पठाण यांना दिले निवेदन
कोल्हापूर : दि 19 ( विशेष प्रतिनीधी ) दत्तवाड तालुका शिरोळ येथे नरभक्षक हिंस्त्र कुत्र्याने तेरा वर्षी लहान मुलीवर जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले आहे यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अन्यथा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा संघर्षनायक राष्ट्रीय बहुजन मिशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष आठवले हुसेन मुजावर , समिर विजापूरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे
कोल्हापूर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पठाण यांना भेटून दत्तवाड येथील वारंवार नरभक्षक हिंस्त्र कुत्रे मानवी जीवितास धोका निर्माण करत आहेत मागील वर्षी शेतमजूर महिलेस व नवे दानवाड येथील शेतकरी आंबूपे अशा दोघांना नरभक्षक हिंस्र कुत्र्यानी हल्ला करून जीवे ठार मारले होते तर दत्तवाडयेथील शेतकरी बंदेनवाज अपराध यास गंभीर जखमी केले होते या संदर्भाची तक्रार आपले सरकार पोर्टलवर संघर्षनायक राष्ट्रीय बहूजन मिशनच्या वतीने देण्यात आले होती त्यास प्रशासनाकडून इथून पुढच्या काळामध्ये नरभक्षक हिंस्त्र कुत्र्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात येईल अशी लेखी पत्र देण्यात आले होते मात्र दिनांक 18 ऑगस्ट 2022 रोजी अपूर्वा अनिल शिरडोणे या 13 वर्षीय लहान मुलीचा नरभक्षक हिंस्त्र कुत्र्याने गंभीर जखमी करून लचके तोडले आहे भविष्यात सुद्धा अशा पद्धतीचे हल्ले मानवी वस्तीवर होण्याची दाट शक्यता असल्याने या नरभक्षक हिंसक कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अन्यथा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन उप आयुक्त पठाण यांना देण्यात आले आहे या निवेदनावर हूसेन मुजावर ,समीर विजापुरे ,संतोष आठवले यांची स्वाक्षरी आहे
.
Posted inकोल्हापूर
दत्तवाड येथील नरभक्षक हिंस्त्र कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा – संतोष आठवले
जिल्हा पशूसंवर्धन उपआयुक्त पठाण यांना दिले निवेदन
