आम्ही कोणाला काय म्हणावं ?
✍️नवनाथ दत्तात्रय रेपे
‘भट बोकड मोठा’ पुस्तकाचे लेखक
छत्रपती शिवाजी हे नुसते नाव जरी उच्चारले तरी हिंदुंच्या तेहतीस कोटी देवांची फलटण बाद होते असं प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे म्हणतात. पण आमच्या लोकांना या नावाची एवढी ताकद समजलीच नाही. त्यामुळे त्यांना काल्पनिक पात्राचा आधार घेऊन आपल्या दिवसाची सुरूवात किंवा नव्या व्यक्तीची भेट झाल्यास ते उच्चारून करावी लागते ही खुप मोठी शोकांतिका आहे. आमचा समाज खरच बुद्धीवान आहे का ?कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापुढे सर्वच जर काल्पनीक देवांची फलटण फक्त बाद होते तर मग त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावासोबत कोण्यातरी कलोकल्पीत मुर्तीच नाव का जोडल जात याचा विचार आपण कधी करणार आहोत ? म्हणून तर मराठा सेवा संघाने जय भवानी या जयघोषाला छेद देत त्याऐवजी ‘जय जिजाऊ जय शिवराय’ अशी घोषणा दिली. ती आज प्रत्येकाच्या मनात खोलवर गेली आहे. ज्याने कधीच आपल्या पत्नीचा स्विकार केला नाही तो पुराणात एक आणि ज्याने कधीच आपल्या बायकोचा स्विकार केला नाही तो दुसरा सत्तेत बसला आहे. त्यांचीच पिलावळ सध्या तुम्ही एकमेकांना हे म्हणा ते म्हणा म्हणून ज्ञान हेपलताना दिसत आहे. पण आम्ही काॅलवर बोलताना किंवा सकाळी एकमेकांना भेटल्यावर काय म्हणावं हे आम्हाला सांगण्याचा अधिकार ह्या अर्धनारी नटेश्वरांना आहे का ?याच भान या संघोट्यांनी ठेवाव. कारण देशातील कार्यभार हा संविधानूसार चालतो तो कोण्या फेकू, झोलाछाप किंवा चौकीदाराच्या मतानुसार, मनानुसार चालत नाही. पण ज्यांच्या विचारधारेमुळे आजपर्यंत केवळ जातीय दंगली घडल्या त्या हिटलरी विचारांचे वारसदार व त्यांचे हस्तक मात्र शासकीय निमशासकीय कार्यालयात कर्मचा-यांनी वंदे मातरम् म्हणा अस का म्हणून सांगत आहेत ?काॅल उचलल्यास काय म्हणावं याचं शिक्षण मुनगंटीवार यांच्याकडून घेण्याइतपत समाज येडा नाही असं मला वाटतं. कारण या देशात दंगली कोण घडवत याचे भान आणि ज्ञान बहुजन समाजाला आले आहे, त्यामुळे धंदे मातरम्, दंगे मातरम् च्या पिलावळींनी वंदे मातरम् ची भाषा बोलू नये. त्यांच्या तोंडी ती शोधुनही दिसत नाही. कारण महीलेच्या नाकातच मोती शोभून दिसतो, तोच मोती पुरुषाने घातला तर त्याचा हिजडा झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे अशा हिजड्यांनी आम्हाला हे म्हणा ते म्हणा म्हणून तत्वज्ञान हेपलू नये.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाले त्यामुळे स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करत असल्याचं औचित्य साधत सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ‘राज्यातील सरकारी कर्मचारी फोनवर संभाषणाची सुरुवात ‘हॅलो’ने नाही तर ‘वंदे मातरम्’ने करतील. सांस्कृतिक विभागाचा मी पहिला संकल्प महाराष्ट्रात इथून जाहीर करतोय. हॅलो नाही तर वंदे मातरम् बोला. त्याचा शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येईल.’ (न्यूज १८ लोकमत १४ आॅगस्ट २२) या वक्तव्याचा अनेक राजकीय नेत्यांसह रझा अकादमीने देखील यावर तीव्र आक्षेप घेतला. तेव्हा मुनगंटीवार म्हटले की, आपण हॅलोऐवजी केवळ ‘वंदे मातरम्’ हाच शब्द वापरा, असं म्हटलं नाही, रझा अकादमीला विरोध करण्याचा पूर्ण अधिकार आहे. इंग्रजांनी किंवा विदेशातून आलेल्या ‘हॅलो’ शब्दाऐवजी ‘वंदे मातरम्’ शब्द वापरावा, हे अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आमच्या विभागाचं सुरू केलेलं अभियान आहे. एका कवीने फार छान लिहिलंय, देवाच्या मुखातून निघालेल्या वेद मंत्रापेक्षा स्वातंत्र्यवीरांच्या तोंडून निघालेले वंदे मातरम् हे शब्द आमच्यासाठी प्राणप्रिय आणि पवित्र आहेत. ‘भारत माता की जय’ किंवा ‘वंदे मातरम्’ म्हणायचं की नाही ? हे रझा अकादमीने ठरवावं. पण महाराष्ट्राच्या साडे तेरा कोटी लोकांपैकी बहुसंख्य लोकं हॅलो या शब्दाला पर्यायी शब्द ‘वंदे मातरम्’ वापरत असतील तर रझा अकादमीला कोणता शब्द वापरायचा आहे ? (लोकसत्ता १५ आॅगस्ट २२) एखादा व्यक्ती मंत्री झाला म्हणजे तो बुध्दीने परिपक्व आहे असं समजणे वेडगळपणाचे लक्षण आहे ? कारण कर्मचा-यांनी सकाळी काय म्हणावं ?याचा निर्णय घेण्याचा नैतिक अधिकार मुनगंटीवार यांना आहे का ?लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणा-या ह्या संघी मानसिकता असणा-या लोकांच्या डोक्यात कधी गाय गोबर, मंदीर मस्जिद तर कधी मुर्ती, बुरखा, नमाज, भोंगा ह्या गोष्टी व्यतिरिक्त आहे तरी काय ?जे विदेशी आहेत त्यांच्या तालावर लुंगी डान्स करणा-या मुनगंटीवार यांनी लोकांना हे म्हणा ते म्हणा याच आभाळ हेपलू नये. म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
‘गो माता की जय म्हणत
गाईचं आताड काढतात
वंदे मातरम् म्हणत म्हणत
आईचे वस्त्र फेडतात’.
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याच समर्थन करताना प्राजक्ता माळी म्हणते की, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव चिरायू होवो. ह्या कामी माझं आयूष्य खर्ची पडावं. ह्या कामी सर्व देशवासीयांनी झटावं. हो आजपासून फोनवर हॅलो बंद वंदे मातरम् सुरु. देव देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती. ही भावना कधीही मरू नये हीच प्रार्थना. (लोकसत्ता १५ आॅगस्ट २०२२) प्राजक्ता माळी यांच आयुष्य कुठं आणि कधी खर्ची होते हे रानबाजार वेबसीरीज मध्ये सर्वांनी पाहीले आहे. आम्ही फोनवरती एकमेकांना काय बोलायच हे नंगानाच करणा-या प्राजक्ता माळी यांचेकडून शिकण्याची गरजच काय ?देव देश आणि धर्मासाठी आयुष्य खर्ची करा म्हणणारी प्राजक्ता माळी रानबाजार मध्ये पैशासाठी आपला देह झिजवताना सर्वांनी उघड्या डोळ्यांनी नागडी पाहीली आहे. त्यामुळे हीने कितीही आभाळ हेपलले तरी ते व्यर्थ आहे. कारण धर्मासाठी बहुजन समाजातील तरुणांनी का मरावे ?जे धर्माच्या नावावर मलीदा चाखतात त्यांनीच धर्म वाचवण्यासाठी मरायला काय अडचण आहे ?तसेच हिंदू महासंघाचे आनंद दवे म्हणाले की, यांना वंदे मातरमची अडचण नाही, तर हिंदूंना जे आवडतं त्या गोष्टींना आडवं येण्याचा यांचा स्वभाव आहे. उद्या हे घटना मानायला पण नकार देतील. त्यामुळे हे लाड आता नकोच. (न्यूज १८ लोकमत १६ आॅगस्ट २२) विदेशी ब्राम्हण दवेंना सांगावं वाटतं की, रामायण हे काल्पनीक आहे हा निकाल पण न्यायलानेच दिला होता. राज्यघटनेचा आदर ब्राम्हण व रेशिम बागेचे समर्थक वगळता प्रत्येक भारतीय करतो, पण जेव्हा जंतर मंतर वर हीच राज्यघटना दहन केली जात होती, तेव्हा दवे तुम्ही रामदासांचा लंगोट घालून काय सज्जनगडावर मनाचे श्लोक पठण करत होते का ? त्यामुळे आम्ही आता भटांचे काय म्हणून ऐकावे, आजपर्यंत आम्ही भटांच ऐकत आलोत म्हणून तर सारा सत्यानाश झाला आहे. त्यामुळे दवेंनी आता आभाळ हेपलणे सोडून द्यावे अन्यथा जागा झालेला बहुजन समाज दवे, देशपांडे, जोशी, कुलकर्णी, भिडे, भागवत यांना हेपलून काढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
‘शरम तर नाही पण म्हणावे
लागतील बेशरम
पर्शुरामाची औलाद सुध्दा
म्हणू लागली ‘वंदे मातरम्’.
खा. रावसाहेब दानवेंच नाव गावच्या मध्यवर्ती ठिकाणी घेतलं तर त्यांना कोळसा, जालण्याच जांभुळ असं म्हणून लोक फिदीफिदी हासतात. ते खा. रावसाहेब दानवे म्हणाले की, फोनवर नमस्कार ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणण्यात गैर काय ?ज्याला देशाप्रती स्वाभिमान आहे ते वंदे मातरम् म्हणतील. (लोकमत १६ आॅगस्ट २२) इतरांना देशभक्तीची प्रमाणत्रे वाटप करण्याचे टेंडर काय भाजपच्या बहुजनातील पाळीव प्राण्यांनी घेतले आहे का ?ज्यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवाज शरीफांच्या तोंडी केक भरवून पाकीस्तानमध्ये मिरवत होते तेव्हा रावसाहेब दानवे काय प्रदीप जोशींचे धक्के खाण्यात व्यस्त होते का ?कारण शत्रुराष्टात जाऊन गोलगप्पे खाणारा देशभक्त कसा ?याच उत्तर साले दानवे देतील का ?भाजपाकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून केला जात असून त्याचा जोरदार विरोध होतोय, हे पाहुन मा. सुधीर मुनगंटीवार म्हणतात की, हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणण्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. वंदे मातरमला विरोध करणे म्हणजे संविधानाला विरोध करण्यासारखे आहे. (लोकसत्ता १६ आॅगस्ट २२) आज जे संविधान समर्थनाची भाषा करतात ते बधीर ? मुनगंटीवार मागे जंतर मंतर येथे संविधानाची होळी होत असताना कुठे प्रदीप जोशींची पप्पी घेण्यात व्यस्त होते का ?कलम १९ नुसार आम्ही काय बोलावं हा अधिकार भारतीय राज्यघटनेने बहाल केला असून त्यावर जर हे ‘भट’गुंटीवार गदा आणणार असतील तर यांच्यासारखा गदा ?कोणीच नाही असं म्हटलं तर काय चुकीचे आहे ?म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
‘भगवे झेंडे काळी टोपी
काळे कार्यक्रम
मुखात ‘वंदे मातरम’
करणी ‘दंगे मातरम्’.
मा. मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा निषेध करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, माणसे एकमेकांना भेटल्यानंतर ‘नमस्कार’ म्हणून संभाषण करतात. काॅलवर बोलताना ‘हॅलो’ हा शब्द सगळ्यांच्याच तोंडात असतो. गावाकडेचे काहीजण ‘राम राम’ तर काही ‘जय शिवराय’ जय भीम म्हणतात. तर अनेक जण ‘जय ज्योती’ ने करतात. प्रश्न असा आहे कि, संभाषणाची सुरुवात वंदे मातरम ने करावीच लागेल हा फतवा कशासाठी आहे. या फतव्यातून तुम्ही काय साधू इच्छिता. संविधानात भाषा स्वातंत्र्य आणि व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य असे दोन्ही हक्क अबाधित ठेवण्यात आले. हे हक्क हिरावून घेणारे तुम्ही कोण ?ते तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही. तेव्हा आम्ही काय म्हणावे हे तुम्ही आम्हांला सांगू शकत नाही. आणि तुमचे आम्ही ऐकणारही नाही. एवढेच सांगा, कि नमस्कार म्हटल्यावर किती दिवस जेलची शिक्षा देणार आहात ? (सरकारनामा १५ आॅगस्ट २०२२) मा. आव्हाड बोलले ते योग्य आहे. त्यामुळे बहुजन समाजाला सांगावं वाटतं की, संघी मानसिकतेतून निघालेल्या नरकुंडात स्वत:ला वाहुन घेऊ नका. कारण आपल्या महापुरुषांच्या नावातच एवढी ताकद आहे की, ते नाव जर चार चौघात घेतलं तर तुमच्या आसपास असलेला छुपा संघी चड्डी पिवळी करून घेतल्याशिवाय राहत नाही. कारण जय जिजाऊ जय शिवराय जय भीम या नावाची ताकद त्यांना माहीत आहे. कारण आपल्या बापालाच आपण बाप म्हटलं पाहीजे इतरांचा गोरा गोमटा दिसणारा बाप आपल्या कधीही कामी येणार नाही. तेव्हा आपल्या महापुरुषांच्या नावाची ताकद ओळखा. कारण तुम्ही जर त्यांचं एकुण तसे वर्तन करणार असाल तर आपण कोणाचे तरी गुलाम होत आहोत हे उघड होत.
भट बोकड मोठा पुस्तक घरपोहोच मिळवण्यासाठी
संपर्क – रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)
मो. ९७६२६३६६६२