सभासदांना व ग्राहकांना नम्र व तत्पर सेवा देणारी जिल्ह्यातील अग्रेसर पत गुडाळेश्वर पत संस्था.. चेअरमन.अभिजीत पाटील यांचे प्रतिपादन.
( पैशावर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वासावर पैसा ठेवा या ब्रीदवाक्या मुळे संस्थेचा चढता आलेख…..!)
41 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी मिळीत संपन्न..
गुडाळ वार्ताहर/ संभाजी कांबळे
गुडाळ तालुका राधानगरी येथील श्री गुडाळेश्वर ग्रामीण बिगर पतसंस्थेची 41 वी सर्वसाधारण वार्षिक सभा खेळी मिळत संपन्न झाली यावेळी संस्थेचे चेअरमन अभिजीत पाटील म्हणाले की पैशावर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वासावर पैसा ठेवा या ब्रीद वाक्यामुळे संस्थेचा सभासदांचा असणारा विश्वास आणि ठेवीदारांचा ओघ पाहता संस्थेचा आलेख वाढत आहे ते आपणास पाहावयास मिळते चालू झाली 31 /03/ 2022 अखेर ढोबळ नफा 1 कोटी 17 लाख 76 हजार 900 इतका झाला असून तरतुदी करून 64 लाख 16 हजार पाचशे नफा इतका झाला आहे …संस्थेच्या ठेवी 31/0 3/2022 अखेर 49 कोटी 37 लाख 97 हजार 700 इतक्या जमा झाल्या असून एक कोटी 21 लाख 56 हजार 429… .इतकी वाढ झाली आहे. स्थापनेपासून 15% डिव्हिडंट देणारी व ऑडिट वर्ग अ, मिळवणारीकोल्हापूर जिल्ह्यातील अग्रेसर नावारूपाने आलेली संस्था म्हणजे गुडाळेश्वर प तसंस्था. होय असे प्रतिपादन अभिजीत पाटील यांनी केले .यावेळी संस्थेचे व्यवस्थापक डी जी पाटील यांनी अहवाल वाचन करताना नमूद केले की ,रिझर्व फंड, बुडीत फंड, एनपीए व निधीची शंभर टक्के गुंतवणूक करणारी संस्था. संस्थेची सो मालकीची सर्व सोयींनी युक्त सुसज्ज इमारत व संगणकृत सेवा देणारी अग्रेसर पत.
//संस्था शेअर भांडवल तीन कोटी 32 लाख 39 हजार 600, राखीव निधी फंड, दोन कोटी 90 लाख वीस हजार तीनशे संस्थेच्या ठेवी 49 कोटी 37 लाख 97 हजार 700 संस्थेची गुंतवणूक 27 कोटी 70 लाख 97 हजार 800, संस्थेने दिलेली कर्जे तीस कोटी चार लाख 17 हजार सहाशे, संस्थेची वार्षिक उलाढाल 225 कोटी 65 लाख 5 हजार 700 . संस्थेचे खेळते भांडवल 58 कोटी 75 लाख 74 हजार दोनशे, संस्थेचा नफा 64 लाख 16 हजार 500, डिव्हिडंट पंधरा टक्के ऑडिट वर्ग अ,,
आरोग्य शिबीर ,रक्तदान मोफत शालेय गोरगरीब मुलांना शालेय वाटप.शिबिर ,भूकंपग्रस्तांना व नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदतीचे सहकार्य करणारी पतसंस्था. सोने जिनस गहाण ठेवून कॅश क्रेडिट कर्ज देणारी पतसंस्था…. संस्थेचे संस्थापक चेअरमन ए डी पाटील म्हणाले की ठेवीचा वाढता आलेखम्हणजे पतसंस्थेचा पारदर्शक कारभार सामान्य ग्राहकाचा ठेवीदारांचा व सभासदांचा पतसंस्थेवरील असणारा विश्वास उत्तम सेवा यामुळे ती वाढ अशीच राहणार असा विश्वास व्यक्त करत संस्थेचे उन्नती घडविण्यासाठी संचालक मंडळ कर्मचारी वर्ग यादी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल त्यांचे भरभरून कौतुक केले..
यावेळी गुणवंत कर्मचारी गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रांमध्ये मी कामगार कारखान्यातून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी व बँकेतून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी विकास सेवा संस्थेचे पदाधिकारीव नावीन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या गुणी.जनांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी व्हा चेअरमन ईश्वरा शंकरपाटील, संचालक अनंत अण्णा तेली. पांडुरंग बळवंत जाधव ,दीपक पांडुरंग चरापले हिंदुराव पाटील, दत्तात्रय शंकर पाटील, दत्तात्रय ज्ञानू पोवार वैशाली डोंगळे , मालन एकनाथ पोवार, गुडाळ शाखेचे मॅनेजर दत्तात्रय गुंडू पाटील कॅशियर आनंदा अर्जुना मोहिते, वसुली अधिकारी पंडित बळवंत पाटील व सर्व कर्मचारी . भोगावती शाखेचे मॅनेजर विठ्ठल पांडुरंग पाटील कॅशियर मनोज मारुती पाटील व सर्व स्टाफ व कुर शाखा मॅनेजर प्रवीण पांडुरंग माळवी व सर्व स्टाफ गुडाळेश्वर सेवा सोसायटी चेअरमन इंद्रजीत पाटील, मा चेअरमन डॉक्टर ए.बी.माळवी. माझी चेअरमन आनंदा माळवी माजी उपसरपंच आर के पाटील,संजय सिंह मोहिते. एम एस पाटील,शामराव चौगले. यशवंत पाटील, केशव पाटील, वाय डी पाटील ,जी आर पाटील, श्रीपती कांबळे पत्रकार रामचंद्र चौगले, सुरेश साबळे, सागर धुंदरे नामदेव कुसाळे संभाजी कांबळे व संचालक मंडळ व सर्व संस्थेचे विविध पदाधिकारी.सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते… कार्यक्रमाचे आभार ज्येष्ठ संचालक अनंत तेली यांनी मांडले