अखिल बुधवार पेठ देवदासी संस्थेच्या वतीने संतुलन संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा..
अखिल बुधवार पेठ देवदासी संस्था संस्थापक डॉ. पूजा यादव स्मुर्ती दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संतुलन संस्थेचे संस्थापक Adv.बी.एम.रेगे व संचालिका Adv.पल्लवी रेगे यांना खाणकामगारांच्या हक्कासाठी रचनात्मक संघर्ष करणाऱ्या निरंतर सेवेबद्दल तर देवदासी महिलांना परिसर स्वच्छतेचे धडे देऊन सामाजिक सेवेत सक्रीय करणाऱ्या तेजस्वी सेवेकरी उत्कृष्ट कर्तव्यदक्ष पुरस्कार डॉ.सदानंद मोरे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे परिसर स्वच्छ ठेऊन एक आदर्श निर्माण करणाऱ्या महिलांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अखिल बुधवार पेठ देवदासी संस्था संस्थेचे अध्यक्ष प्रकाशदादा यादव, शांतीलाल सुरतवाला, आनंद सराफ, दत्ताभाऊ साखरे, दादा पासलकर, गणेश चव्हाण, वंदनाताई भुजबळ आदि उपस्थित होते. पुरस्काराचे वाचन भोलाशेठ वांजळे यांनी केले, त्यांनी गेली २५ वर्ष संस्थेच्या कार्याचा आढावा मांडला. सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ यांनी दगडखाण कामगारांच्या घराच्या प्रत्येक दगड अथवा विटेला Adv. पल्लवी रेगे यांचा हात असल्याचे मत मांडले.त्यामुळे “अस्सल सोन्याची पुरस्कार रुपी पारख झाली” असे गौरव उद्गार त्यांनी काढले.
आपल्या पुरस्काराला उत्तर देतांना Adv. बस्तू रेगे यांनी कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच देवदासी आणि दगडखाण कामगार या वंचित घटकाला पुरस्कार अर्पण केला. आपल्या कार्याची सुरुवात ते आजच्या सद्य स्थितीत संतुलन संस्थेच्या माध्यामातून केलेल्या कार्याची माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भोलाशेठ वांजळे यांनी केले तर आभार सुरेश कांबळे यांनी मांडले. यावेळी मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्यकर्ते, देवदासी महिला आदि उपस्थित होते.
Posted inपुणे
अखिल बुधवार पेठ देवदासी संस्थेच्या वतीने संतुलन संस्थेस उत्कृष्ट कर्तव्यदक्ष पुरस्कारांने सन्मानित
