पर्यावरणपुरक गणेशोत्सव!
राज्यात साजरा.
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
बाप्पा गणेश म्हणजे विद्येचे दैवत ! गणेशोत्सव म्हणजे आनंदाचे उधाणच. महाराष्ट्रातील अनेक गणेश उत्सव मंडळाने कोरोनाच्या दोन वर्षांच्या संकटा नंतर मोठ्या आनंदाने व उत्साहाने गणेश उत्सव साजरा करण्याचे ठरविले. पण हे करत असतानाच सामाजिक बांधिलकी व पर्यावरण रक्षणासाठीही पाऊल उचलले आहे हे लक्षात आले. चोख सुरक्षा व्यवस्था आणि सुरक्षित पर्यावरण याचा वसा केवळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानेच नाही तर घरगुती गणेश उत्सवातही अनेकांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत आपल्या घरातील गणपती बाप्पाच्या मुर्तीत व सजावटीत आकर्षक व मनमोहक बदल केले अशाच घरगुती गणपतीबाप्पाच्या दर्शन व मनोगत.
पर्यावरण पूरक गणपती हा शाडूच्या मातीपासून बनवला जातो. ही मूर्ती अत्यंत लोभस आणि मनोवेधक असते. बादलीभर पाण्यात ही मूर्ती सहज विरघळते. असे मत हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी शाळेचे मुख्याध्यापक श्री. गोविंदराजन श्रीनिवासन यांनी सांगितले अशा मूर्तीचे विसर्जन घरी केले जाते यामुळे ध्वनी प्रदुषण व जल प्रदूषण टाळता येते अशी पुस्ती स्काऊटचे सहाय्यक आयुक्त जितेंद्र महाजन सरांनी व्यक्त केले. इंग्रजी विभाग प्रमुख श्रीमती दिपिका जैन मॅडमच्या घरी केवळ गणपती बाप्पाची मूर्तीच नव्हे तर गणेश उत्सवाची आरस व सजावट सुध्दा इको फ्रेंडली म्हणजेच पर्यावरणपुरक होती. निसर्गातील विविध रंगांची रंगबेरंगी फुलांचा वापर करून सुंदर सजावट करण्यात आली होती. उत्सव साजरा करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येतो, सर्व धर्माचे, धर्माचे लोक एकत्र येतात एक सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मता जागृत करण्याचे कार्य आपण उत्सवातही करत असतो अशावेळी पर्यावरण रक्षणासाठी एकत्र झाले पाहिजे व तो संदेश देण्यासाठी कृती करण्याची गरज आहे म्हणूनच आमच्या घरी नेहमीच शाडूच्या मातीची गणेश मूर्ती व फुलांची सजावट केली जाते असे मत दिपिका जैन मँडमनी व्यक्त केले. शिवसेना शाखा प्रमुख दिपक सणस यांच्या घरी या वर्षी पहिल्यांदाच गणपती बाप्पांचे आगमन झाले होते. जातीय सलोखा व स्नेहभावना जपणारा हा गणेशोत्सव आपल्या देशाची व धर्माची शान आहे. मांगल्याचे प्रतिक व विद्येची दैवता असलेला गणपती बाप्पाचा उत्सव राज्यातच नव्हे तर आता देशातही अनेक राज्यांत साजरा होत आहे. उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व धार्मिक कार्ये होत असतात अशी भावना व्यक्त केली. शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या पाच दिवसांची सुट्टी व उत्सवकाळात परीक्षा न घेण्याचा निर्णय यामुळे सर्वचजण गणेशोत्सवाच्या आनंद घेत आहेत.


