गणेशोत्सवाच्या काळात राजकीय लगबग
बाप्पाच्या चरणी नेते लिन की दीन
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ५ सप्टेंबरला गणेशोत्सवानिमित्त मुंबईचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यामध्ये ते महाराष्टाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी अद्याप निर्णय झालेला नाही. अमित शाह हे भारतीय जनता पक्षाचा देशातील एक मोठा चेहरा आहे मुंबई महानगर पालिका निवडणूक जवळ आली आहे. या पाश्र्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र व मुंबई अध्यक्ष बदलण्यात आले आहेत. निवडणूक राजकीय व्युहरचना करण्यात “मास्टर माईंड” असलले अमीत शहा गणपतीच्या दर्शनाला मुंबईत येत आहेत . त्यांची भेट ही आगामी काळात येणाऱ्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे. अमित शाह मुंबईच्या सर्वात लोकप्रिय गणेशोत्सव मंडळापैकी एक लालबागच्या राजाचे दर्शन घेतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईच्या “राजा”चे शिवतीर्थावर दर्शन घेतले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री “विनोद तावडे व महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष या सर्वांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट देऊन गणेशोत्सव काळात बाप्पाचे दर्शन घेतले व राजकीय चर्चा न करता फक्त तब्येतीची विचारपूसही केली. त्यांच्या विचारपुसीचा कार्यक्रमाचा राजकीय संबंध नाही असे खुलासे प्रसार माध्यमांनी दिले आहेत. गणेशोत्सव म्हणजे राजकीय खलबत्तांचे व्यासपीठ. याच पार्श्वभूमीवर केंद्रिय मंत्री, नेतेमंडळी राज्यातील दौरा करत आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या भेटी नक्कीच राजकीय आहेत.
मुंबई महानगर पालिका ही देशातील सर्वात मोठी आर्थिक संपन्नता असलेल्या पालिकांपैकी एक आहे. मुंबई गेली पंचवीस वर्षे उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. ही निवडणूक सर्व पक्षांसाठी नेहमीच महत्त्वाची आहे. महाराष्ट्राची सुत्रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली आहेत. यामुळेच देशाची आर्थिक नाडी असलेली मुंबई महानगर पालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.