सेनापती कापशी चे शिक्षक विजय परिट सर यांची जिल्हा परिषदेकडून विशेष पुरस्कारासाठी निवड
प्रतिनिधी/ रमेशकुमार मिठारे
कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील रहिवासी असलेले जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक विजय साताप्पा परिट सर यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जिल्हा शिक्षक पुरस्कार – २०२२ विशेष पुरस्कार साठी निवड झाली आहे.जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातुन एक शिक्षक या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.शिक्षक, विजय परिट सर हे कागल तालुक्यातील पंडित नेहरू विद्यामंदिर वडगाव या ठिकाणी “विषय शिक्षक” या पदावर कार्यरत असुन ते दोन्ही पायाने दिव्यांग असूनही त्यांची क्रीडा क्षेत्रात जिल्हास्तरावर अनेक मुलांनी यश संपादन केलेला आहे. शिष्यवृत्ती सातवी व आठवी मध्ये मुलं चमकलेले आहेत तसेच आठवी मध्ये एन. एम. एम. एस. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये विद्यार्थी यशसंपादन केले असुन वर्षाला 12 हजार सलग चार वर्षे 48 हजार रुपये शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.यात परिट सर यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर अनेक मुलांना सारथी संस्थेमार्फत रूपये 9600 चे शिष्यवृत्ती मिळवून दिलेली आहेत.शाळेत विविध प्रकारचे उपक्रम घेऊन मुलांना प्रोत्साहित करतात. सेनापती कापशी येथील आर.के. देशपांडे नाट्य अकॅडमी मार्फत व्याख्यानमाला व व्यावसायिक नाटकाचे प्रयोग सुद्धा केले जातात त्यामध्ये हीरीरीने भाग घेऊन समाज प्रबोधनाचे काम सुद्धा करत असुन सरांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. याचीच दखल घेत कोल्हापूर जिल्हा परिषद पुरस्कार निवड समितीने कागल तालुक्यातुन त्यांची विशेष पुरस्कारसाठी निवड केली आहे.या निवडीमुळे परिसरातून विजय परिट सरांचे कौतुक होत आहे.सदर निवड प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या राजर्षी छत्रपती सभागृहात १ सप्टेंबर रोजी पार पडली.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी -एकनाथ आंबीकर, प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी -आशा उबाळे, आद्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य -सी.वाय कांबळे , शिक्षण तज्ञ -सुनिलकुमार लवटे,बी.बी.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.