पृथ्वीराज पाटील चे नीट परीक्षेत धवल यश!
गुडाळ : वार्ताहर
आवळी बुद्रुक ता. राधानगरी येथील भोगावती चे माजी संचालक अण्णासाहेब पाटील आणि कृषी महाविद्यालयाचे निवृत्त प्रो. रामचंद्र पाडेकर यांचा नातू कु. पृथ्वीराज उत्तम पाटील याने 2022 च्या नीट परीक्षेत 750 पैकी 645 मार्क्स मिळवून धवल यश संपादन केले.
सरवडे येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. उत्तम पाटील आणि डॉ. वैशाली पाटील यांचा सुपुत्र असलेला पृथ्वीराज हा बोरवडे येथील इनोव्हेटिव्ह पब्लिक स्कूलचा विद्यार्थी आहे.
त्यास इनोव्हेटिव्ह चे संस्थापक संभाजी साठे, मार्गदर्शक प्रा. विनय गुप्ता, प्रा. मनोज कुमार, प्रा. श्रीवास्तव, प्रा .केशव सिंह, प्रा.बात्रा ,प्रा .बि.के. राय यांचे मार्गदर्शन लाभले.