11 सप्टेंबर रोजी सांगली निवारा भवन येथे बांधकाम कामगारांचा निवारा हक्क भव्य मेळावा संपन्न!
सांगली जिल्ह्यामध्ये नोंदीत बांधकाम कामगारांची संख्या 65000 पेक्षाही जास्त आहे. या सर्व 65 हजार बांधकाम कामगारांच्यापैकी ज्या कामगारांना स्वतःचे पक्के घर नाही अशा सर्व कामगारांना घरकुले बांधून देणार अशी महत्त्वाची घोषणा कामगार मंत्री श्री सुरेशभाऊ खाडे यांनी केलेली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाचे या मेळाव्यामध्ये स्वागत करण्यात आले. कामगार मंत्री यांनी घोषित केल्यानुसार सांगली जिल्ह्यातील ज्या शासकीय मालकीच्या जमीनी आहेत त्या जमिनीवर नोंदीत बांधकाम कामगारांचे घर प्रकल्प उभे केले जाणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम या प्रकल्पाची सुरुवात सांगली जिल्ह्यातून होणार आहे. म्हणूनच सांगली जिल्ह्यातील खऱ्याखुऱ्या बांधकाम कामगारांनी अजूनही जास्तीत जास्त बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करावी असे आवाहन या मेळाव्यास मार्गदर्शन करीत असताना ज्येष्ठ कामगार नेते कॉ शंकर पुजारी यांनी केले. त्यांनी असेही सांगितले की संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये 65 हजार बांधकाम कामगारांचा घर सर्वे सरकारी कामगार अधिकारी यांचे मार्फत सुरू केलेला आहे या सर्वेसाठी कामगारांनी शासकीय प्रतिनिधींना सहकार्य करावे असेही त्यांनी सांगितले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांच्या नेत्या कॉ सुमन पुजारी होत्या.
या मेळाव्यामध्ये बोलताना निवारा बांधकाम कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी प्राध्यापिका शरयू बडवे यांनी सांगितले की, ग्रामीण भागामध्ये ज्यांना स्वतःचे पक्के घर नाही असे सर्व नोंदीत बांधकाम कामगार घरकुलासाठी योजनेनुसार दोन लाख रुपये मिळावेत यासाठी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याकडे अर्ज करू शकतात. आज पर्यंत सांगली जिल्ह्यातील 200 पेक्षा जास्त नोंदीत बांधकाम कामगारांनी सहायक कामगार आयुक्त यांच्याकडे अर्ज केलेले आहेत. त्या अर्जांची तपासणी होऊन मंजूर करण्याची प्रक्रिया १३ सप्टेंबर रोजी बैठक होऊन केली जाणार आहे. तरी अजूनही घर मागणीसाठी ग्रामीण भागातून अर्ज करावेत असे प्रा. शरयू बडवे यांनी सांगितले.
त्यानंतर बोलताना युनियनचे सचिव कॉ विशाल बडवे यांनी सांगितले की. मिरज येथे २३० फ्लॅट्स (घरकुले)भीमपलास प्रकल्प बांधकाम सुरू असून पाचव्या मजल्यापर्यंत बांधकाम आलेले आहे. या ठिकाणी आतापर्यंत 90 बांधकाम कामगारांनी फ्लॅट्स बुकिंग केलेले आहेत. यानंतरही ज्या नोंदीत बांधकाम कामगारांना मिरज येथे फ्लॅट्स बुकिंग करायचे असल्यास त्यांनी संघटनेशी संपर्क करावे असे त्यांनी आवाहन केले.
या मेळाव्यामध्ये संघटनेस ई सेवा केंद्र मंजूर करून मिळवून दिल्याबद्दल कॉ महादेव कांबळे यांनी परिश्रम घेतले त्याबद्दल त्यांचा कॉ सुमन पुजारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मेलाव्यामध्ये खालील कार्यकर्त्यांनी आपले विचार व्यक्त केले. कॉ संतोष बेलदार, शांता पवार, विद्या भोरे, सोनल चव्हाण, अलका नलवडे, अर्चना बेळंकी, चारुशीला मगदूम, अशोक घाडगे, सुहास कदम, बाबासाहेब पाकजादे, विनोद पानबुडे, अजित खटावकर श्री सुरेश सुतार, अश्विनी कांबळे व वैभव बडवे. शेवटी प्रा. शरयू बडवे यांनी सर्वांचे आभार मानल्यानंतर मेळावा समाप्त झाला.
Posted inसांगली
11 सप्टेंबर रोजी सांगली निवारा भवन येथे बांधकाम कामगारांचा निवारा हक्क भव्य मेळावा संपन्न!
