जिल्हा परिषद नागपूर येथे आयुष्यमान भारत दिवस साजरा
नंददत डेकाटे प्रतिनिधी नागपूर
आयुष्यमान भारत दिवस जिल्हा परिषद नागपूर येथे साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाला जिल्हा परिषद नागपूर च्या अध्यक्षा सौ. रश्मीताई श्यामकुमार बर्वे अध्यक्ष म्हणून उपस्तित होत्या.मा. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत पार पाडला.
सदर कार्यक्रमा दरम्यान मा. जिल्हाधिकारी महोदय यांनी या योजनेचा लाभ SECC च्या यादी नुसार सर्व जनतेला देण्यात येणार असून सदर चा लाभ मिळण्या करिता जनतेला कार्ड वाटप करुन जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घेण्याबाबत आव्हान केले.या कार्यक्रमात प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाचे कार्ड लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात जिल्हा परिषद नागपूर च्या उपाध्यक्ष तथा सभापती आरोग्य सौ. सुमित्राताई कुमार, सो.उज्वलाताई बोडारे सभापती महिला बाल कल्याण, श्रीमती भारतीताई पाटील सभापती शिक्षण व अर्थ, सो. नेमावती मार्ट सभापती समाज कल्याण व डॉ. दिपक सेलोकर जिल्हा आरोग्य अधिकारी हे उपस्थित होते. तसेच श्री. सुभाष गणोरकर कार्यकारी अभियंता श्री विपुल जाधव उपमुख्य कार्यकारी अधिकारी ब श्रीमती कुमार मॅडम शिक्षण अधिकारी हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर यांनी केले व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुरेश मोटे व आभार प्रदर्शन डॉ. विश्वदिप नगरकर यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी डॉ. रेवती सावळे माता बाल संगोपन अधिकारी, डॉ. सचिन हेमक व इतर अधिकारी / कर्मचारी यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाकरिता तालुका आरोग्य अधिकारी, BEO, CDPO, MS व NGO चे प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.