प्रा आ केंद्र ठिकपूर्ली अंतर्गत उपकेंद्र आणाजे येथे ज्येष्ठ नागरिक व माता मेळावा संपन्न..
गुडाळ वार्ताहर /संभाजी कांबळे
अणाजे तालुका राधानगरी येथे
ज्येष्ठ नागरिक मोफत तपासणी शिबिर तसेच माता सुरक्षित तर घर सुरक्षित* मोहिमेअंतर्गत प्रा आ केंद्र ठिकपूर्ली अंतर्गत उपकेंद्र आणाजे येथे ज्येष्ठ नागरिक व माता मेळावा व तपासणी करण्यात आली या यावेळी उच्च रक्तदाब , शुगर कॅन्सर याविषयी माहिती व उपचार याविषयी
तालुक्यांमध्ये आरोग्य कर्मचारी स्टाफ कमी असताना सुद्धा6 प्राथमिक आरोग्य केंद्र व 38 उपकेंद्र मध्ये सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे व सर्व वैद्यकीय अधिकारी सुपरवायझर स्टाफ समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य कर्मचारी यांनी स्टाफ यांच्या समावेश घेऊन सर्व आरोग्य आरोग्य कार्यक्रम उत्कृष्ट्या राबवल्याबद्दलया
पद्धतीचे कामगिरी केल्याबद्दल तालुका आरोग्य अधिकारी मा डॉ आर आर शेट्ये आपल्या मनोगत भरभरून कौतुक व्यक्त केले… व तसेच डॉक्टर विक्रम पाटील यांनी 13 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी, माता सुरक्षित तर घर सुरक्षित, आरोग्य माता तपासणी शिबिर, 0 ते 6 वयोगटातील बालक तपासणी आयुष्यमान भारत कार्ड काढणे इत्यादी कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र ठीकपुलीं व उपकेंद्र आणाजे आयुर्वेद दवाखाना आणाजे या ठिकाणी 75 ज्येष्ठ नागरिकांची तपासणी केली व 25 गरोदर मातांची तपासणी केली अशी माहिती सांगितली…
यावेळी तालुका आरोग्य विस्तार अधिकारी माननीय आर एस पाटील वैद्यकीय अधिकारी डॉ प्रिया गुरव, समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर विक्रम पाटील, सरपंच मोहन पाटील, पोलीस पाटील संदीप पाटील ,आरोग्य सेवक चंद्रकांत पारखे, आरोग्य सेविका प्राजक्ता कडोळकर , आरोग्यपरिचर धनाजी चव्हाण आशा स्वयं सेविका सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व आशा वर्कस गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक व गरोदर माता उपस्थित होते ,
डॉक्टर विक्रम पाटील यांनी केले तर आभार चंद्रकांत पारखे यांनी मांडले
ओळ,, मेळाव्याचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आर आर शेटे आरोग्य विस्तार अधिकारी एस पाटील डॉक्टर प्रिया गुरव डॉक्टर विक्रम पाटील सरपंच मोहन पाटील आदी मान्यवर