जिल्हाधिकाऱ्यांना समज द्यावी अन्यथा प्रशासकीय बातम्यांसह कार्यक्रमांवर बहिष्कार

जिल्हाधिकाऱ्यांना समज द्यावी अन्यथा प्रशासकीय बातम्यांसह कार्यक्रमांवर बहिष्कार

जिल्हाधिकाऱ्यांना समज द्यावी अन्यथा प्रशासकीय बातम्यांसह कार्यक्रमांवर बहिष्कार

कोल्हापूर प्रेस क्लबचा इशारा, पालकमंत्र्यांना निवेदन

कोल्हापूर शहर आणि कोल्हापूरच्या पत्रकारांकडून नेहमीच पुरोगामीत्व जपत, विकासकामांना प्रोत्साहन दिलं जातं. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि पत्रकार यांच्या समन्वयातून अनेक चांगली कामं कोल्हापूर जिल्ह्याने करून दाखवली आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी पत्रकारांचे प्रयत्न नेहमीच सुरू असतात, पण गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे प्रशासन आणि पत्रकारांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्री अंबाबाई मंदिरात झालेल्या एका कार्यक्रमाबाबत काही पत्रकारांनी जिल्हाधिकारी रेखावार यांना विचारणा केली. त्यावर योग्य स्पष्टिकरण देण्याऐवजी रेखावार यांनी कोल्हापूरच्या पत्रकारांचीच लाज काढण्याचे काम केले. जणू काही कोल्हापूरचे पत्रकार विकासकामांधील अडथळे आहेत, स्वस्त मानसिकतेचे आहेत, अशा शब्दात पत्रकारांचा अपमान केला…यापुढे असे प्रकार खपवून घेणार नाही, प्रसंगी काळ्या फिती बांधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करू असा इशारा कोल्हापूर प्रेस क्लबकडून देण्यात आला आहे…अनेकदा जिल्हाधिकारी कार्यालयात रेखावार यांच्याकडून पत्रकार आणि प्रेस फोटोग्राफरना अपमानास्पद वागणूक मिळाली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मंत्र्यांच्या दौ-यांमध्येही रेखावार यांच्याकडून योग्य नियोजन केले जात नाही. पत्रकार आणि मंत्रीमहोदय एकत्र येऊ नयेत, अशीच त्यांची भूमिका दिसते. मनमानी कारभार आणि पत्रकारांना अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल कोल्हापूर प्रेस क्लबने जिल्हाधिकारी रेखावार यांचा जाहीर निषेध नोंदवला आहे. यानंतरही त्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा होणार नसेल तर, आम्ही वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार आहोत. तसेच प्रशासकीय बातम्यांवर बहिष्कार टाकण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरणार नाही. करी कृपया कोल्हापूरचे पालकमंत्री या नात्याने आपण संबंधित प्रकाराची गांभिर्याने दखल घेऊन, जिल्हाधिकारी रेखावार यांना समज द्यावी. असे निवेदन पालकमंत्री दीपक केसरकर यांना दिले आहे…यावेळी कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मिस्त्री, उपाध्यक्ष विजय केसरकर यांच्यासह प्रेस क्लबचे सहकारी उपस्थित होते…

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *