भारतीय प्रवासी सप्ताहानिमित्त ट्रेड विंग्स लिमिटेड प्रायोजित म्युझिक लव्हर्स ग्रुप यांच्यामार्फत “हम है राही प्यार के” हा एक बहारदार संगीतमय कार्यक्रम रविवार दि. 8 जानेवारी रोजी शाहू स्मारक भवन येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात म्युझिक लव्हर्स ग्रुपच्या कलाकारानी चित्रपटातील मालगाडी ते विमान प्रवास करताना चित्रीत झालेल्या हिंदी सुमधूर गीता नचा नजराणा प्रेक्षकांसाठी सादर केला. प्रवासी भारतीय दिवस ९ जानेवारीला साजरा केला जातो. कारण ९ जानेवारी १९१५ मध्ये महात्मा गांधी, दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले होते. भारताच्या विकासासाठी परदेशी भारतीय समुदायाने जे योगदान दिले आहे ते दर्शवणे हे या सप्ताहाचे मूळ उद्दिष्ट आहे.म्युझिक लव्हर्स हा ग्रुप नेहमीच विविध दर्जेदार व सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यक्रम करत आला आहे. रविवार दि. 8 जानेवारी रोजी भारतीय प्रवासी दिनानमित्त या ग्रुपने “हम है राही प्यार के” हा एक बहारदार संगीतमय कार्यक्रम सादर केला.या दिवसाच्या संकल्पनेनुसार गाण्याची थीम होती. तसेच समाजातील जे दांपत्य एकमेकांच्या साथीने घरी आणि नोकरी/व्यवसाय च्या ठिकाणी एकत्र सफर करून आपला जीवनप्रवास प्रामाणिकपणे व्यतीत करत आहेत, अशा चार जीवनसाथींचा सन्मान “सन्मान हमसफरचा” या सामाजिक कार्यक्रमात करण्यात आला. त्यामध्ये मार्व्हलर्स इंजिनिअरींग प्रा.लि. चे संग्राम पाटील व उत्कर्षा पाटील, चार्टर्ड अकौटंट क्षेत्रात असणारे तुषार अंतूरकर व धनश्री अंतूरकर, आरटीओ इन्सपेक्टर निलेश ठोंबरे व डॉ. पूजा ठोंबरे, जग सफारी करणारे डेंटल सर्जन डॉ. राजीव पतके व स्त्री रोगतज्ञ डॉ. प्राची पतके, सायकल वरून नुकतेच कन्याकुमारी अशी सफर करून आलेले 57 वर्षाचे अनिल कुंभार अशा दिग्गजांचा यां कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे माजी पर्यावरणशास्त्र प्रमुख डॉ. जय सामंत व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या रिटार्यड प्रोफेसर अनुराधा सामंत हे होते .या कार्यक्रमात ग्रुपचे कलाकार शिरीष पाटील, संजीव पाटील, उमेश साळोखे, आशुतोष साळोखे, सुरेश कांदेकर, शेखर तिवले, प्रियांका वालावलकर, श्रध्दा गुळवणी, साक्षी पवार, मोनिका बकरे, पूजा रणदिवे, जास्वंदी कुलकर्णी यांनी गाण्याचे सादरीकरण केले. तसेच कार्यक्रमाचे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश गुळवणी व जास्वंदी कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रायोजक ट्रेडविंग्ज लि. असून एस न्यूज चॅनल माध्यम प्रयोजक आहे.कोल्हापूर मधील ट्रेड विंग्स चे सर्वेसर्वा श्री बळीराम वराडे यांचाही खास सन्मान करण्यात आला. “हम है राही प्यार के” या नवीन वर्षातील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व सुमधूर गाण्यांच्या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतल्याबद्दल सर्वांचे म्युझिक लव्हर्स ग्रुप तर्फे आभार मानण्यात आले.
Posted inBlog
भारतीय प्रवासी सप्ताहानिमित्त”हम है राही प्यार के” हा एक बहारदार संगीतमय कार्यक्रम कोल्हापूरात संपन्न
