कुरुंदवाड प्रतिनिधी : सत्यशोधक चळवळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून इलेक्ट्रिकल, प्रिंट मीडिया, यूट्यूब चैनल .न्यूज पोर्टल, डिजिटल मीडिया मध्ये कार्य करणाऱ्या व समाज परिवर्तन घडवणाऱ्या पत्रकारांचा सत्कार तसेच समाजामधील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
कुरुंदवाड तालुका शिरोळ येथील भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयामध्ये हा समारंभ संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुरुंदवाड नगरपालिकेचे नगरसेवक उदय डांगे होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ साहित्यिका नीलम माणगावे यांनी मार्गदर्शन केले कुरुंदवाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी आशिष चव्हाण कष्टकरी शेतमजूर संघटनेचे नेते सुरेश सासणे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी जगन्नाथ बापू ठोकळे नगरसेवक सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका राजकुमार कृष्णा गोरे, शंभूराजे उर्फ संभाजी आप्पासो काटकर ,सौ गीता कैलाश मुधोळकर ,डॉक्टर वाशिम जावेद मुजावर, एडवोकेट प्रवीण पांडुरंग गोंधळे ,संजयराव दर्याप्पा कांबळे ,डॉक्टर विशाल रामगोंडा पाटील . सौ सुवर्णा प्रकाश पाटील ,सचिन विश्वनाथ पाटील, प्रकाश तातोबा कांबळे तारदाळ ,विकास मारुती गायकवाड खोतवाडी, डॉक्टर दीपक सिद्धार्थ कांबळे रुई .बबलू माणिक कांबळे कसबा सांगाव . डॉक्टर विजयालक्ष्मी हेमंत पगारे नांदणी ,बाबासो गणपतराव कांबळे शिरोळ ,अमरसिंह अशोकराव कांबळे शिरोळ आधी ना उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच विश्वास कांबळे संपादक दलितमित्र ,रवींद्र कांबळे संपादक इंडियाचा आवाज, विजय धंगेकर संपादक लोणारी टाइम्स, संतोष आठवले संपादक संघर्षनायक मीडिया, राजू म्हेत्रे संपादक महाराष्ट्र आपला न्यूज, दत्तात्रेय कदम संपादक समाजकार्य न्यूज .विकास गायकवाड संपादक जनसंमान्याचा प्रहार न्यूज .सौ ,प्रभावती भिर्डीकर पत्रकार महाराष्ट्र आपला न्यूज ,प्रवीण गायकवाड पत्रकार दैनिक महानकार्य .रोहित कांबळे पत्रकार इंडिया चा आवाज आधी पत्रकारांचा ही सन्मान करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक एडवोकेट ममतेश आवळे यांनी केले तर आभार एडवोकेट राहुलराज हरिश्चंद्र कांबळे यांनी मांडले


