महायुतीतून बहुजन समाजाला न्याय व सन्मान मिळेल : राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे

<em>महायुतीतून बहुजन समाजाला न्याय व सन्मान मिळेल : राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे</em>

महायुतीतून बहुजन समाजाला न्याय व सन्मान मिळेल : राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे

पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या महायुतीमुळे संपूर्ण राज्यातील फुले, शाहू,आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण…

नागपूर : प्रा. जोगेंद्र कवाडे यांची पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये महायुती झाली असता शहरात दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी यांनी एकत्र येऊन एकच जल्लोष केला.

पीपल्स रिपब्लिकन पार्टी , मुख्यालय, आनंद नगर सीताबर्डी, नागपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरविले. यावेळी जोरदार घोषणांनी भीमशक्ती व शिवशक्तीचा गजर करण्यात आला. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप भाई कवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या जल्लोष प्रसंगी बाळासाहेबाचे शिवसेना या पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते.

यावेळी जयदीपभाई कवाडे म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारमध्ये बहुजन समाजाला न्याय मिळाला नाही. मात्र या महायुतीतून बहुजन समाजाला न्याय व सन्मान मिळेल. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी भीमशक्ती व शिवशक्तीचा नारा दिला असून स्थानिक पातळीवर दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुकींना समोरच जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राच्या राजकारणाला या महायुतीतून एक नवी दिशा मिळाली आहे. भीमशक्ती शिवशक्ती च्या एकत्रितरणातून बहुजन समाजाला बळ मिळणार आहे. शहर व जिल्ह्यात दोन्ही पक्ष एकत्रित कार्य करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी बालासाहेब शिवसेनेचे नागपुर जिल्हा संघटक मिलिंद देशमुख,प्रदेश संघटक कपिल लिंगायत,शहर अध्यक्ष कैलाश बोंबले,ग्रामीण जिलाध्यक्ष नरेंद्र डोंगरे,अभय चव्हाण,रवी बानमारे,निडू भगत,बापू भोंगाडे,दिलीप पाटील,अरुण साखरकर,सुनील मेश्राम,प्रफुल डेंगे,शितल बोरकर,अभिषेक चव्हाण,संजय खांडेकर,सोहेल खान,सुनीता शिंदे,प्रतिभा नानवटकर,सुधा म्हस्के,अनिता थुळ,जॉयस क्रिस्टोफर,वंदना सफेकर, सुचिता कोठाँगळे,सोनिया मेश्राम यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *