सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांची मागील सर्व मानधनातील व इतर थकबाकी त्वरित देण्यात यावी. तसेच गटप्रवर्तक महिलांच्या तक्रारीबाबतचे निवेदन सांगली जिल्हा आरोग्य अधिकारी श्री माने यांना देण्यात आले.
सांगली जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गटप्रवर्तक महिलांच्याकडून ओपीडीसाठी तासंतास बसवणे व रुग्णांना औषध देणे इत्यादी कामे सक्तीने करून घेतली जातात. वास्तविक हे काम गटप्रवर्तक महिलांचे नाही.
गटप्रवर्तक महिलांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व लाभ देण्याची महाराष्ट्र शासनाची तयारी नाही. परंतु दुसऱ्या बाजूस मात्र गटप्रवर्तक महिलाना दररोज प्राथमिक आरोग्य केंद्रावर येण्याची सक्ती केली जात आहे. तसेच सक्तीने त्यांच्याकडून मस्टवर सह्या घेतल्या जात आहेत हे करणे राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या ठरवून दिलेल्या नियमाच्या विरुद्ध आहे.
या निवेदनाबाबत बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी श्री माने यांनी शिष्टमंडळास सांगितले की, याबाबतचे आदेश त्वरित काढून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना कळविण्यात येईल. तसेच मागील थकबाकी काढण्याबद्दलची प्रक्रिया सुरू आहे लवकरच सर्व आशा व गटप्रवर्तकांना थकीत मानधन मिळेल.
महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाच्या शिष्टमंडळामध्ये कॉ शंकर पुजारी,कॉ सुमन पुजारी व रोहिणी खोत यांचा समावेश होता.
Posted inसांगली
सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांची मागील सर्व मानधनातील व इतर थकबाकी त्वरित देण्यात यावी. तसेच गटप्रवर्तक महिलांच्या तक्रारीबाबतचे निवेदन सांगली जिल्हा आरोग्य अधिकारी श्री माने यांना देण्यात आले.
