रुईचे माजी सरपंच जयसिंगराव कांबळे संघर्षनायक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
इचलकरंजी प्रतिनिधी : पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना, संघर्षनायक मीडिया व समाजभूषण हरिश्चंद्र कांबळे स्मृती प्रतिष्ठान यांच्या वतीने रुई तालुका हातकलंगले येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच जयसिंगराव कांबळे यांना मान्यवरांच्या शुभहस्ते संघर्षनायक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला
सोमवारी इचलकरंजी येथील हॉटेल भरते किचन सभागृह येथे पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी संघर्षनायक मीडियाचे संपादक संतोष आठवले होते. प्रमुख पाहुणे पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज मुल्ला सर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत मुळे ( पूणे ) ,दयावान सरकार ग्रुपचे सर्वेसर्वा संदीपभाई निकुंभ ( मुंबई ), अॅड . राहुलराज हरिश्चंद्र कांबळे ,ज्येष्ठ साहित्यिक अण्णा धागाटे ( पुणे ) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच जयसिंगराव कांबळे यांना सन्मान चिन्ह . मानपत्र, पुष्पगुच्छ कोल्हापुरी मानाचा फेटा देऊन संघर्षनायक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जयसिंगराव कांबळे हे गेले 35 वर्षे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत .आज पर्यंत तीस हजार कामगार, उपेक्षित, वृद्ध ,विधवा परितकत्या महिला यांना संजय गांधी पेन्शन योजनेचा लाभ मिळवून दिला आहे .घरकुलांच्या प्रश्नासंदर्भात सुद्धा इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजना आदी घरकुलांचा लाभ शेकडो कुटुंबांना मिळवून देऊन हक्काचा निवारा त् प्राप्त करून दिला आहे हजारो गरिबातील गरीब कुटुंबाला अंत्योदय योजने मध्ये नावे समाविष्ट करून अल्प दरामध्ये धान्य मिळवून देण्याचे कार्य केले आहे . धम्मकार्यामध्ये देखील त्यानी धम्मदीक्षा सुवर्ण महोत्सवी समिती हातकणंगले तालुक्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे जेतवन बुद्ध विहार प्रथम अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता बुद्धविहाराच्या बांधकामाची सुरुवात त्यांनी केले आहे
यावेळी श्रीकांत मोरे ,दिलावर नदाफ ,जयसिंग तराळ, महावीर कमलाकर ,उत्तम कांबळे ,मयूर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते स्वागत त्र्यंबक दातार यांनी केले तर आभार राजेंद्र मोहिते यांनी मांनले