राष्ट्रहिताचे ,समाज हिताचे आणि जनतेच्या हिताचे कार्य करणाऱ्यांना संघर्षनायक पुरस्कार – फिरोज मुल्ला सर यांचे प्रतिपादन

राष्ट्रहिताचे ,समाज हिताचे आणि जनतेच्या हिताचे कार्य करणाऱ्यांना संघर्षनायक पुरस्कार – फिरोज मुल्ला सर यांचे प्रतिपादन

♦️संघर्षनायक राष्ट्रीय पुरस्कार 2023 वितरण सोहळा संपन्न

♦️सुधाकर मधुकर वायदंडे ,दादासाहेब यादव ,बापूसाहेब घुले ,दगडू माने, प्रियाताई वैद्य ,सुनील सरवदे, जयसिंगराव कांबळे ,शाहीर रफिक पटेल आदींच्यासह 13 पुरस्कार कर्त्यांना केले सन्मानित

♦️दयावान सरकारचे प्रमुख संदीपभाई निकुंभ यांची विशेष उपस्थिती

इचलकरंजी : पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना .संघर्षनायक मीडिया समाज भूषण हरिश्चंद्र कांबळे स्मृती प्रतिष्ठान यांच्यावतीने देण्यात येणाऱ्या संघर्षनायक राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा. इचलकरंजी येथील हॉटेल भरते किचन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला
पॅंथर आर्मी स्वराज क्रांती सेनेची राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज मुल्ला सर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत मुळे, दयावान सरकार ग्रुपचे प्रमुख संदीपभाई निकुंभ, ज्येष्ठ साहित्यिक अण्णा धागाटे ,अॅड . राहुलराज कांबळे यांच्या शुभ हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना संघर्षनायक राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण करून सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संघर्षनायक मीडियाचे मुख्य संपादक संतोष आठवले होते.
फिरोज मुल्ला सर पूढे म्हणाले
निस्वार्थी आणि प्रामाणिकपणे समाजसेवा करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या पाठीवर शब्बासकीची थाप देऊन त्यांना बळ देण्याचे काम संघर्षनायक पुरस्कार देऊन करीत आहोत महाराष्ट्र भुषण अशा मोठ्या पुरस्कार कार्यक्रमात लोकांचे जीव जतात हे फार र्दुदैवु घटना आहे आणि राजकीय फायदेसाठी पुरस्कार देणे महाराष्ट्र भुषण पुरस्काराचा आपमान आहे पण आम्ही संघर्षनायक पुरस्कार देऊन जीवीत हानी तर करत नाही आणि करोडो रूपयांची उदलपट्टी पण होत नाही समाजामध्ये संघर्षनायक घडने काळाची गरज आहे कारण सरकार फक्त थापा मारतय जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अपयशी ठरत आहे.सर्व जातीधर्माचा आदर सन्मान झालाच पाहिजे हा देश संविधानाच्या आधारावर चालत आहे म्हणून प्रत्येक भारतीय माणसाने संविधान वाचल पाहिजे त्याच संरक्षण केले पाहिजे आणि ते वाचवले पाहिजे सर्व महखपुरूषांनी कधी जात पाहिली नाही आणि आपण पण जाती घट्ट करू नये महापुरूषांच्या विचार घेऊन काम केले पाहिजे भारत एकसंघ आहे आणि तो राहील असे विचार देऊन लोकांना संबोधित केले यावेळी संघर्षशील नेते दादासाहेब यादव मुंबई, सी डब्ल्यू सी चे संपादक सुनील सरवदे, प्रियाताई वैद्य, शाहीर रफिक पटेल यांनी मनोगत व्यक्त केले
दयावान सरकार ग्रुपच्या धडाडीच्या नेत्या प्रियाताई वैद्य ( मुंबई ) ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जयसिंगराव कांबळे (माजी सरपंच रुई ) CWC न्यूज चैनल संपादक सुनील सरवदे ( मुंबई ) ज्येष्ठ संघर्षशिल नेते दादासाहेब यादव ( मुंबई ), आदिवासी पारधी हक्क अभियानाचे नेते व दलित महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधाकर मधुकर वायदंडे ( सांगली ) ,शाहीर रफिक पटेल, ( कोल्हापूर ) बुद्धराष्ट्र प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष अजित दादा गादेकर ( सोलापूर ), महाराष्ट्र सामाजिक परिवर्तन परिषद संस्थापक अध्यक्ष व उद्योजक प्रमोद कदम (तिळवणी ),ज्येष्ठ पत्रकार दगडू माने ( शिरोळ ), ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब घुले (इचलकरंजी )मच्छिंद्र बनसोडे (पुणे ) राष्ट्रीय जलतरणपटू ज्योतीराम बरगे जनशक्ती असंघटित कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश तडाखे, इंजिनीयर शब्बीर फरास ( जयसिंपूर ) ज्येष्ठ साहित्यिका कवियत्री सौ सुवर्णा पवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जावळे ,पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे हातकलंगले लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष विद्याधर कांबळे ,चिकोडी तालुका बसवा टीव्ही चे प्रतिनिधी शितल कुडचे ,शिरदवाड ग्रामपंचायत सदस्य सचिन वंजीरे, दलित महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष हुसेन मुजावर ,सामाजिक कार्यकर्ते राहुल तेलसिंगे इचलकरंजी आदिना संघर्षनायक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
यावेळी पॅंथर आर्मी स्वराज क्रांती सेना मुंबई प्रदेश संघटक मीराताई बावस्कर पिंपरी चिंचवड महिला शहर अध्यक्षा ज्योतीताई झरेकर, नंदाताई दणाने, पुणे शहर संघटक जावेदभाई शेख,सिध्दार्थ बनसोडे
आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते स्वागत त्रिंबक दातार यांनी केले तर आभार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मोहिते यांनी मानले

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *